बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
06-03-2024
गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी थाॅमस शेडमाके.
गडचिरोली : जिल्ह्यातील राजकारणात आंबेडकरी पक्षांचे महत्त्व ठळकपणे असते. मात्र प्रस्थापित पक्ष आंबेडकरी पक्षांना दुय्यम वागणूक देतात. अशा परिस्थितीत राजकीय स्तरावर बहुजन - आंबेडकरी चळवळीचे राजकारण ताकदीने उभे व्हावे व निवडणूकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले.
स्थानिक सर्किट हाऊस येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मुख्य मार्गदर्शक जिल्हा प्रभारी राज बन्सोड, तर विशेष अतिथी म्हणून प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बिआरएसपीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. महिला आघाडीच्या गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी सविता बांबोळे, तालुका उपाध्यक्ष पदी पौर्णिमा मेश्राम, गडचिरोली महिला शहराध्यक्ष पदी विद्या कांबळे, शहर सचिव म्हणून प्रतिमा करमे, उपाध्यक्ष म्हणून रेखा कुंभारे, कोषाध्यक्ष पदी सोनाशी लभाने, संघटक पदी आवळती वाळके तसेच गडचिरोली बिआरएसपी तालुकाध्यक्ष पदी 'थामस शेडमाके' व तालुका सचिव पदी 'चंद्रकांत रायपुरे', शहराध्यक्ष पदी प्रतीक डांगे, सचिव पदी नागसेन खोब्रागडे, उपाध्यक्ष पदी मिलिंद खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत पक्षाची पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १५ मार्च रोजी कांशीरामजी जयंती निमित्त नागपूर येथे होणाऱ्या चुनावी महारॅली करीता जिल्ह्यातून ३ हजार कार्यकर्ते सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. व २२ मार्च रोजी 'बिआरएसपी महिला मेळावा' गडचिरोलीत आयोजित करण्याबाबतही या बैठकीत नियोजन करण्यात आले. वडसा, आरमोरी, मुरमाडी, पोटेगाव, पारडी सह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाच्या सभा विविध ठिकाणी आयोजित होणार असल्याची माहिती राज बन्सोड यांनी या बैठकीत दिली.
या बैठकीला पक्षाचे जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद वाळके, सचिव जितेंद्र बांबोळे, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रफुल रायपुरे, घनश्याम खोब्रागडे, करुणा खोब्रागडे, निर्मला बोरकर, शोभा खोब्रागडे, वंदना खेवले, गोकुळ ढवळे, सुनील बांबोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. ०५ मार्च २०२४
_________________
राज बन्सोड
जिल्हाप्रभारी BRSP
गडचिरोली
8806757873
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments