ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
05-01-2024
Chimur bhisi news चिमूर: भिसी येथील वसंता विजय लोहकरे ( ३५) या शेतकऱ्यांने खाजगी बँक वा सावकारांकडून शेती च्या खर्चाकरिता लाखो रूपयाचे कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी अतीवृष्टी व पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पन्न कमी व खर्च मोठ्या प्रमाणात झाल्याने मृतक शेतकरी चिंतेत होता. यामुळे वसंता विजय लोहकरे याने मागील आठवड्यात बुधवार ला सायंकाळी ५ वाजताचे सुमारास भिसी शहरालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यातविषारी औषध प्राशन केले होते.
त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याचेवर पहिल्यांदा भिसी, उमरेड व नंतर नागपुर येथे वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र सोमवार च्या पहाटे वसंता लोहकरे विजय याची उपचारादरम्यान पाण ज्योत मालविली. मृतकाचे पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास भिसी चे ठाणेदार पकाश राऊत यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments