बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
29-12-2023
दोन जण जखमी; पवनी-कहांडला मार्गावरील घटना
पवनी, (वा.). जंगलातून जात असलेल्या दुचाकीस्वारांवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना पवनी कऱ्हांडला मार्गावर घडली. हल्ला केल्यानंतर जवळच असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी दोघांना वाचविले. त्यानंतर वाघ हा जंगलाच्या दिशेन पळून गेला. राहुल हेमराज गेडाम (41) आणि रवींद्र मारुती वाघमारे (35) दोन्ही रा. खापरी असे जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच खापरीचे उपसरपंच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उमरेड-कहांडला- पवनी अभयारण्याअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे
या गावांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. जंगलातून ये-जा करणाऱ्यांवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. ग्रामस्थ भीतीने ये-जा करीत आहेत. जखमी राहूल गेडाम व रवींद्र वाघमारे हे पवनीवरून खापरी गावाकडे येत असताना जंगलातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली. यात दोघेही दुचाकीसह खाली पडले.
वाघ त्यांच्यावर हल्ला करण्याच्या बेतात असताना वनकर्मचारी धावून आले आणि त्यांनी वाघाला पळवून लावले. यामुळे दोघांचे प्राण वाचले. वनरक्षकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रकरणाचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ठोकळ करीत आहेत. आमची शेती ही जंगलात असल्याने आम्ही तिथे पिके घेऊ शकतो. मात्र विकू शकत नाही. जनावरे पिकांची नासाडी करीत आहेत. शासन आमचे पुनर्वसन करीत नाही. आम्हाला मरायला सोडले आहे.
या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे ग्रामस्थ भीतीने या मार्गावरून ये-जा करतात. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष पहायला मिळत आहे. बांते, उपसरपंच खापरी गावातील लोक ये-जा करताना गेटवर एण्ट्री करीत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांची मदत करता येत नाही. घटनेची संपूर्ण चौकशी करून जखमींना पूर्ण मदत केली जाईल.
- ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments