संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
15-07-2024
आरमोरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली, मात्र केलेल्या कामाची मजुरी मिळाली नसल्याने हजारो शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
आरमोरी तालुक्यात कोणताच मोठा उद्योग नसल्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकरी शेतमजुरांच्या रिकाम्या हातांना काही प्रमाणात रोहयोच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असते. ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या माध्यमातून तालुक्यात मजगी, पाणंद रस्ते, बोडी, तलाव खोलीकरण, वनतलाव बांधकाम करणे, नैसर्गिक रोपांचे एकेरीकरण, मिश्र रोपवाटिका तयार करणे आदी विविध कामे करण्यात आली. मात्र केलेल्या कामाची मजुरी दोन ते तीन महिने होऊनही मजुराच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. सध्या तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. मात्र केलेल्या कामाची मजुरी थकल्याने खत, रोवणी मजुरांची मजुरी कुठून करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. केलेल्या कामाची मजुरी अजूनपर्यंत मिळाली नसल्यामुळे मजुरांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
मजुरांचा कामावर येण्यास नकार
आदिवासी भागातील ग्रामसभांना अनेक गावांत मिश्र रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू करावयाचे आहे. मात्र मजुरी थकल्याने मजूर कामावर येण्यासाठी नकार देत आहेत, त्यामुळे रोहयोंतर्गत केलेल्या कामाची मजुरी देण्यात यावी. प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामसभा येंगाडाचे ग्रामरोजगार सेवक मुन्नासिंग चंदेल यांनी केली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments