बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
20-01-2024
बहीण थोडक्यात बचावली, परिसरात खळबळ
नागपूर. घराला आग लागल्याने दोन चिमुकले जिवंत जळाले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत घडली. घटनेच्या वेळी मुलांची मोठी बहीणही तेथे होती, मात्र तिने वेळीच घरातून बाहेर पळ काढल्याने थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह गिट्टीखदान पोलिस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. दोन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत दोन्ही चिमुक्ल्यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. देवांश रंजीत उईके (7) आणि प्रभास रंजीत उईके (2) रा. गौरखेडे कॉम्प्लेक्ससमोर, सेमिनरी हिल्स, अशी होरपळलेल्या मुलांची नावे आहेत. आमदार विकास ठाकरे आणि कमलेश चौधरी यांनीही घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती मिळाली आहे.
रंजीत आणि दीपाली उईके तीन मुलांसह सेमिनरी हिल्स परिसरात गौरखेडे कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. त्यांना देवांश आणि प्रभास अशी मुले आणि एक 11 वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तिन्ही मुले घरात खेळत होती. वडील कामावरून परतायचे होते, तर आई शेजारच्या घरी गेली होती. देवांश आणि प्रभास आतल्या खोलीत कुत्र्यासोबत खेळत होते तर मुलगी बाहेरच्या खोलीत होती. या दरम्यान अचानक घराला आग लागली. मुलीने आरडा-ओरड करीत बाहेर पळ काढला. मात्र दोन्ही मुले आतल्या खोलीत असल्याने अडकून पडली. त्यांना निघताच आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
आगीचे कारण अस्पष्ट
या घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश सागडे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी घटनेची सूचना अग्निशमन विभागाला दिली. विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दोन्ही मुलांचे जळून खाक झालेले मृतदेहच बाहेर काढण्यात आले. या आगीत कुत्र्याचाही होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून परिसरात कुणी सिलिंडर लिकेज तर कुणी शेकोटीमुळे आग लागल्याचे सांगत होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments