समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
12-02-2024
सत्र न्यायालयाचा निर्णय : एकूण ६५ हजार रुपये दंडही ठोठावला
नागपूर : कोंढाळी पोलिसांवर घातक हल्ला करणाऱ्या सर्व दहा आरोपींना गुरुवारी दोन वर्षे सहा महिने कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली व एकूण ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.
आरोपींमध्ये शेख शरीफ शेख अझीझ, सरफराज शेख जब्बार शेख, शेख इकबाल शेख सत्तार, शेख जाहीद शेख समदानी, मो. सईद शेख अझीझ, शेख राशीद शेख अझीझ, शेख मुख्तार शेख सत्तार, सलमान शेख गफार शेख, सूरज ऊर्फ भोदू रमेश राऊत व शेख गफार शेख भुरू यांचा समावेश आहे. वर्धा रोडवरील सायखोड वस्तीमध्ये अवैध दारूचा साठा असल्याची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळाली
होती. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर व त्यांचे सहकारी १६ मे २०१८ रोजी शहानिशा करण्यासाठी सायखोड वस्तीमध्ये गेले असता आरोपींनी त्यांना घेरून लाठ्या व दगडांनी घातक हल्ला केला. दरम्यान, आरोपी मारो सालो को, खतम करो, असे ओरडत होते. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. एल. बी. शेंदरे यांनी कामकाज पाहिले.
अशी आहे पूर्ण शिक्षा
• प्रत्येकाला भादंवि कलम १४३ अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास.
• कलम 147 अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड.
• कलम १४८ अंतर्गत एक वर्ष सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड.
• कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षे सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड.
• कलम ३२३ अंतर्गत सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड.
• कलम ३३२ अंतर्गत एक वर्ष सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड,
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments