नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
31-12-2023
अतिसेवनामुळे आजारांचा धोका; नियंत्रण ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला
गडचिरोली . जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तळलेल्या पदार्थांसह फास्ट फुडमध्ये आधीचे मिठाची मात्रा अधिक असते. मात्र अनेकजण वरुन मीठ खाण्याचे शौकीन असतात. आवश्यकतपेक्षा जास्त मिठाचे सेवन रक्तदाब, मधुमेहासोबतच हार्ट अटॅकसारख्या धोक्यांना आमंत्रण देणारे ठरते. म्हणून मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. अलीकडे बहुतांश नागरिक आरोग्याविषयी जागरुक झाले आहेत. मात्र, चटपटीत खाद्यपदार्थ खाण्याची वेळ आली तर अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतीत पदार्थावर ताव मारतात. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विशेष करुन तळलेले पदार्थ, फास्ट फुड सेवनाचे प्रमाणत अधिक आहे. अशा पदार्थांमध्ये तेलासोबतच मिठाचे प्रमाणही अधिक असते. शिवाय, अनेकांना जेवतांना वरुन मीठ घेण्याची सवय असते. या सवयीमुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू लागते. परिणामी वजन वाढणे, रक्तदाबाची समस्या उद्भवते, त्यामुळे शरीरातीलकोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅकपॅरालिसीसचा अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. तसेच मधुमेहाचाही धोका नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक मीठ खाण्याची सवय बदलणे गरजेचे आहे, अन्यथा दवाखान्याच्या चकरा मारण्याची वेळ येऊ शकते.
दररोज 5 ग्रॅम सोडियमची गरज
मानवी शरीराला इतर घटकांसोबतच सोडियमचीदेखील गरज असते. साधरणतः दिवसाला 5 ते 7 ग्रॅम सोडियमची मानवी शरीराला गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कुठलेही मीट चांगलेच आहे. मात्र ते कसे व किती प्रमाणात सेवन करावे हे महत्वाचे आहे. अधिकचा वापर झाल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रमाणातच मिठ वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
अति मीठ, तेल आरोग्यास घातक
विशेषतः मसाल्याच्या भाज्या, लोणचे, फास्ट फुडच्या माध्यमातून मिठाचे अधिक सेवन केले जाते. या पदार्थामध्ये मिठासोबतच तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या दोन्ही पदार्थाचे अधिक सेवन आरोग्यासाठी घातक ठरते. जवळपास 80 टक्के लोक तेलकट व तिखट पदार्थ खातात. तर्रीयुक्त व मसालेदार भाजी बनविण्यावर भर असतो. मात्र अती मिठ व तेल माणसाच्या आरोग्यासाठी काही दिवसांनी धोकादायक ठरतो.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments