ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
20-01-2024
आष्टी - मागील काही महिन्यांपासून मूलचेरा व अहेरी तालुक्यात धुमाकुळ घालून दोघांचा बळी घेणाऱ्या व कित्येकांना जखमी करणाऱ्या नरभक्षी वाघीणीस अखेर काल दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या रेंगेवाही नियत क्षेत्र क्रमांक २७० मध्ये पिंजऱ्यात जेरबंदकरण्यास वनविभागास यश प्राप्त झाले आहे. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चमुने ही कामगिरी केली.
या नरभक्षी वाघीणीने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरे मारली होती. तसेच दोन मनुष्यांना गंभिर जखमी केले तर दोन महिलांना ठार मारले होते, यामुळे मूलचेरा व अहेरी तालुक्यात या वाघीणीची प्रचंड दहशत होती. वाघामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला होता.
दिनांक १६ जानेवारी २०२४ पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील चमु, मार्कडा (कं), पेडीगुडम, चामोर्शी, घोट, वन्यजीवचपराळा, गस्ती पथक आलापल्ली या वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी यांनी सदर वाघीणीवर पाळत ठेवली होती. मानव जिवास धोका ठरलेल्या वाघीणीस जेरबंद करण्यासाठी रितसर परवानीगी घेवुन मार्कंडा वनपरिक्षेत्रातील रेगेवाही उपक्षेत्रांतर्गत रेंगेबाही नियतक्षेत्रातील महाराष्ट्र वनविकास महामंडळास हस्तांतरीत केलेल्या वनखंड क्र. २७० मध्ये रात्री १० वाजताच्या सुमारास ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी डांट करुन वाघीणीस बेशुद्ध केले. यानंतर यशस्वीरित्या तिला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश प्राप्त झाले.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली कामगिरी फत्ते
नरभक्षक मादी वाघीणीस जेरबंद करण्यासाठी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे परुावैद्यकीय अधिकारी तथा रॅपीड रेस्क्यु टिम प्रमुख डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर अजय मराठे, रॅपीड रेस्क्यू टीमचे सदस्य दिपेश डी. टेंभुर्णे, योगेश डी. लाकडे, गुरुनानक वी. ढोरे, वसीम शेख, विकास एस. ताजने, प्रफुल एन. वाटगुरे, ए.डी. कोरपे, ए. एम. दांडेकर त्याच प्रमाणे आलापल्लीचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी पी. डी डी. बुधनवार, आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी आर. एस. डेगरे, मार्कंडा कं. च्या वनपरीक्षेत्र अधिकारी भारती राऊत, रेगेवाही उपक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक मांडावकर, वनरक्षक शेरकी, बागडे, परसवार, निमगडे, कोकनरे, हजारे, गोवर्धन, दंडिकवार, लिपटे, बारशिंगे, आये, मेश्राम, क्षेत्र सहाय्यक भंडारवार, क्षेत्र सहयक आर. एस. आत्राम, क्षेत्रीय कर्मचारी, वनमजुर तसेच अहेरी, चामोर्शी, घोट, चपराळा वन्यजीव, चौडमपल्ली (वन्यजीव) या वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी कामगिरी फत्ते केली.
आतापर्यंत 60 पार केली आहे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे परुावैद्यकीय अधिकारी तथा रॅपीड रेस्क्यु टिमप्रमुख डॉ. आर. एस. खोब्रागडे व त्यांच्या चमुने आतापर्यंत गडचिरोली, चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातील तब्बल ६२ वाघांना सुरक्षितरित्या जेरबंद करण्याची कामगिरी पार पाडली आहे. याबद्दल चमुचे कौतुक केले जात आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments