ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
17-02-2024
तत्काळ नुकसानभरपाईची मागणी
मक्यासह कारले पीक उद्ध्वस्त
देसाईगंज, (ता. प्र.). मागील दोन महिन्यांपासून जंगली हत्तींनी तालुक्यात ठाण मांडले आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यातील कोंढाळा, शिवराजपूर परिसरात पिकांची नासधूस केल्यानंतर बुधवारी रात्रीच्या सुमारास याच भागातील शंकरनगर परिसरात जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून उभ्या मक्याच्या पिकासह कारल्याचे प्रचंड नुकसान केले आहे.
22 च्या संख्येत असलेल्या जंगली - हत्तींनी मागील दोन महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील घनदाट जंगलात ठाण मांडले आहे. हत्तींनी डोंगरगाव, चिखली, रिठ, शिवराजपूर, कोंढाळा - परिसरात फिरुन शेतकऱ्यांचे अतोनात - नुकसान केले. 11 फेब्रुवारी रोजी हत्तींनी - उसेगाव जंगल परिसरात मोर्चा वळविला - होता. मंगळवारी हत्ती कक्ष क्रं. 91 मध्ये आढळून आले होते. यावेळी इंटियाडोह - धरच्या पाण्यावर रोवणी झालेल्या धानात हत्तींनी धुडगूस घालून मोठ्या प्रमाणातनुकसान केले होते.
तर बुधवारच्या रात्री शंकरनगर गाव परिसराकडे हत्तींनी मोर्चा वळविला. निरंजन महिंद्र हलदार, रविन बाला, सुजय विश्वास, बिधान मंडल, निर्मल मिस्त्री, गौरंग मिस्त्री, कृष्णा माझी, समीर विश्वास या शेतकऱ्यांच्या कारले, मक्याच्या पिकांमध्ये कळप शिरला. या हत्तींनी पिक फस्त करण्यासोबत पायदळी तुडवल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
20 ते 22 हत्तींचा कळप रात्रीच्या वेळी शेतात शिरतात. यापूर्वीसुद्धा डिसेंबर 2023 मध्ये हत्तींनी शंकरनगर येथे एका महिलेला ठार केले होते. त्यामुळे हत्तींच्या वाट्याला जाण्याची हिंमत शेतकरी करताना दिसत नाहीत. मात्र हत्तींमुळे झालेल्या नुकसानाची तत्काळ भरपाई देऊन हत्तींना पिटाळून लावण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments