रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
24-03-2024
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर गडचिरोली - चिमुर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची जागा कुणाला मिळणार यांची उत्सुकता सिगेला पोहचली आहे. सदर जागेवर राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सुरवातीपासुनच दावा ठोकला आहे. तर भाजपाचे दोनदा खासदार राहीलेले खासदार अशोक नेतेही प्रबळ दावेदार आहेत . तसेच नव्याने डॉ. मिलिंद नरोटे , नुकत्याच भाजपात प्रवेश करणाऱ्या डॉ. नितिन कोडवते आमदार डॉ. देवराव होळी आदि नावाची चर्चा असताना राष्ट्रवादी कांग्रेसचे राजे धर्मराव बाबा आत्राम यांचे पारडे महायुतीत जड होत होते. परंतु वरिष्ठ भाजपा नेते,उमेदवाराची निवड करतांना सर्व शक्यता पडताडूनच पाहिल्या नंतरच भाजपा की राष्ट्रवादी यांचा योग्य विचार करूनच उमेदवारांची निवड करणार असल्याचे कळते. अन्यता सदर जागा हातुन जायची व ४०० पार म्हणता म्हणता आकडा २०० वर यायचा म्हणुन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढावे अशी भाजपाकडून गुगली टाकण्यात आली परंतु राष्ट्रवादीचे सर्वासर्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते नाकारली व चिमुर लोकसभेसाठी उमेदवार राष्ट्रवादीचाच असे ठणकावुन सांगीतल्या चे कळते . म्हणुनच महायुतीत उमेदवारावरून ताणाताणी सुरच आहे. त्यामुळे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जावून गृहमंत्री अमीत शहा यांची भेट घेतली. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अंतर्गत कलह निर्माण करून विधमान खासदार अशोक नेते यांना तिकीट देऊ नये नवख्या माणसाला संधि घ्यावी असे वरिष्ठांना सांगुन जनू दिशाभुल केल्याचे बोलल्या जात होते. अश्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २६ ला गडचिरोली येत असुन भाजपाच्या स्थानिक मुख्य कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीसी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचा संदेश देण्याकरीता येत असल्याचे कळते . व याच दिवशी महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन भरतेवेळी त्यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांचे गडचिरोली येणे भाजपाला बळ देण्यासाठी ठरणार कि राष्ट्रवादीला हे अजुनही गुलदस्त्यातच आहे. भाजपाला एकेक सिट चे महत्व आहे म्हणुन भाजपाचे नेते फुकुन पाणी पित आहेत . महायुतीत सदर जागा भाजपाकडे कायम राहील्यास खासदार अशोक नेते शिवाय पर्याय नाही कारण इडिआ आघाडीने डॉ. नामदेव किरसान च्या रुपाने तगडा उमेदवार दिलेलाआहे. याचेही भान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार डॉ. गजभे यांनी १ लाख ११ हजार मते घेतली होती. हिच मते त्यावेळेस कांग्रेसला मिळाली असती तर कांग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडीस निवडुन आले असते यात शंकाच नव्हती .अश्या अनेक बाबीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस योग्य निर्णय घेणार असल्याचे भाजप गोठात बोलल्या जात आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments