RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
20-01-2024
गडचिरोली : शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके आदी निविष्ठांची पूर्ती कृषी सेवा केंद्रांमार्फत केली जाते; परंतु त्यांच्याकडून शेतकऱ्यांना अनेकदा योग्य सेवा दिली जात नाही. यामुळे कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त होतात. शिवाय कृषी विभागाने केलेल्या तपासणीत सदोष आढळलेल्या जिल्ह्यातील एकूण १३ कृषी केंद्रांवर मागील खरीप हंगामात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन, मका, व अन्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामातील लागवड क्षेत्र अधिक असल्याने कृषी विभागसुद्धा बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीवर लक्ष ठेवून असतो. मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची विशेष नजर होती. साठा पुस्तक न बाळगणे, पॉस मशीनवर विक्री न करणे, रेकॉर्ड न ठेवणे, तक्रारी आदी कारणांमुळे १३ कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी मागील खरीप हंगामात निलंबित केले होते. गुणनियंत्रक कक्षाच्या पथकाद्वारे ठिकठिकाणच्या कृषी केंद्रांवर धाड टाकून नमुने गोळा केले होते.
कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. खरीप हंगामात पथकाने धडक कारवाई करून तपासणी केली तसेच आवश्यक प्रकरणात कोर्ट केस व अन्य कार्यवाही केली. कृषी केंद्रांकडून फसवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नक्कीच तक्रार करावी.
- संजय मेश्राम, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments