CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
02-04-2024
शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखने तगडी कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, लाखो चाहत्यांच्या हृदयात वसलेल्या शाहरूखचे नेटवर्थ 5000 कोटी रुपये आहे.
1991 साली शाहरुखने त्याची गर्लफ्रेंडन गौरी खानशी लग्नं केलं. 1997 मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा आर्यनचा तर 2000 साली त्यांची लाडकी लेक सुहानाचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तब्बल 13 वर्षांनी शाहरुख खान आणि गौरी पुन्हा आई-वडील बनले. तिसऱ्यांदा सरोगसीद्वारे जन्मलेल्या अबरामचे त्यांनी खान कुटुंबात जल्लोषात स्वागत केले.
मुलासाठी तगडी फी भरतो शाहरुख खान
अनेक उद्योगपती, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी यांच्याप्रमाणे शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम हासुद्धा भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये शिकतो. अबराम हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे. आत्तापर्यंत त्याने शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. त्यांच्या शाळेच्या ॲन्युअल फंक्शनमधील अबरामने सहभाग घेतल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी किड्सही या शाळेत शिकतात. मात्र स्टार किड्सच्या या शाळेची फी ऐकून तर लोकांचे डोळेच विस्फारतील.
किती आहे धीरूभाई अंबानी स्कूलची फी ?
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी प्रत्येक इयत्तेनुसार बदलते. रिपोर्ट्सनुसार, एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंतचे मासिक शुल्क सुमारे 1.70 लाख रुपये आहे. आणि 8 वी ते 10 वी पर्यंतची दर महिन्याची फी ही 4.48 लाख रुपये आहे. तर 11वी आणि 12वी फी सुमारे 9.65 लाख रुपये आहे. शाळेच्या फी रचनेनुसार, अब्रामची वार्षिक फी सुमारे 20.40 लाख रुपये आहे.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची भारतातील सर्वोच्च शाळांमधील एक अशी गणना केली जाते. 2003 साली मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी स्थापन केली होती. तेव्हापासून ते आयबी वर्ल्ड स्कूल आहे. 1,30,000 चौरस फुटांवर पसरलेल्या या शाळेत आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण शिक्षण सुविधा आहेत. शाळेची इमारत ७ मजली आहे ज्यामध्ये अनेक वर्ग, सुंदर खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, टेरेस गार्डन, छतावरील बाग, टेनिस कोर्टही आहे, असे समजते.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments