अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
18-01-2024
कढोली : आदिवासी विकास महामंडळ उपअभिकर्ता म्हणून जिल्ह्यातील आविका संस्था हमीभावाने धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तीनुसार हमीभावाने धान खरेदी करावी लागते. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे ४० किलोंवर १ किलो अधिक धानाची भरती घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
आविका संस्था कढोली केंद्रावर सावलखेडा, भगवानपूर, वाढोना, कढोली, जांभळी, वासी, कोसी या गावांतील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते
धान कढोली येथे खरेदी केली जाते. त्यानंतर कढोली येथील शेड व गोदामातील भरती झाली की, सालवखेडा येथील पटाच्या जागेवरbधान खरेदी केली जाते.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून 'लोकमत'ने हमीभाव केंद्रावर भेट दिली. नियमानुसार बारदाना गृहीत धरून ४०.६०० किलो एवढे धान मोजायला पाहिजे. मात्र, एका शेतकऱ्याचे धान मोजत असताना नोंद केली असता एका बारदाण्यात ४१.५०० किलो धान खरेदी केली जात असल्याचे दिसून आले. म्हणजेच एका क्विंटलमागे एक किलो धान अधिक घेतले जात आहेत. शेतकऱ्यांची मागील अनेक दिवसांपासून तक्रार होती; पण व्यवस्थापकाविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हते. याबाबत आता शेतकरी बोलत आहेत.
उपप्रादेशिक व्यवस्थापकांची चुप्पी
याबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांच्याशी संपर्क केला असता केंद्रावर अधिकची धान घेतले जाते का? याबाबत आपण विपणन निरीक्षक यांना विचारणा करून आपल्याला माहिती देतो, असे सांगितले पण त्यानंतर माहिती दिली नाही.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments