RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
25-01-2024
नवी दिल्ली : पत्नीच्या 'असमंजस वृत्ती'मुळे मानसिक क्रौर्याचा सामना करत असलेल्या पतीला अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली.
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पतीच्या याचिकेवर घटस्फोट नाकारणारा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करत घटस्फोटाला परवानगी दिली. आपल्यामुळे जोडीदाराला जर शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर चुकीचे वागणे ही एक मानसिक क्रूरताच आहे, असे कोटनि यावेळी म्हटले.
पतीने कोणत्या ना कोणत्या मार्गाने संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पतीचे महिला मैत्रिणींशी अवैध संबंध असल्याचा पत्नीचा बिनबुडाचा आरोप होता. या आरोपामुळे पतीच्या मनावर विपरित परिणाम झाला. हे एक मानसिक क्रौर्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
१६ वर्षे एकत्र राहिले
या जोडप्याने २००१ मध्ये लग्न केले आणि १६ वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले. पतीने वकील रावी बिरबल यांच्यामार्फत पत्नीवर क्रूरतेचा आरोप केला, तर पत्नीने हुंडा मागितल्याचा दावा केला. खंडपीठाने म्हटले की, या जोडप्यामध्ये वैवाहिक नात्यात जो आपलेपणा आहे ते नाही. जर याला व्यापकपणे पाहिले तर हा पतीवर करण्यात येत असलेला अत्याचार, क्रूरता होती.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments