संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
13-02-2024
सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा; पाणी आले काय अन् न आले काय?
चंद्रपूर : सद्य:स्थितीत सोशल मीडिया हे प्रभावी व्यासपीठ म्हणून समोर येत आहे. मात्र, आजची तरुणाई सोशल मीडियावर केवळ वायफळ चर्चा अन् चॅटिंग करण्यात गुंग दिसून येते. केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा, मॅरिज अनिवर्रसरीच्या शुभेच्छा देण्यातच तरुणाई धन्यता मानत आहे. याउलट देशातील, शहरातील समस्यांवर चर्चाच होताना दिसून येत नाही.
द्विटर, व्हॉटसअॅप यावर एखादी समस्या टाकली तर बऱ्याचदा तिची सोडवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, अनेक जागरूक नागरिक शहरातील विविध समस्यांचे फोटो टाकून त्यावर चर्चा करताना दिसतात. बऱ्याचदा तर राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींवरसुद्धा चर्चा केली जाते. सर्वांत मोठ्या प्रमाणातसोशल मीडियाचा वापर तरुणाईच करीत असतानासुद्धा या चर्चेमध्ये आजचा तरुण सहभागी झालेला दिसूनयेत नाही. केवळ आपल्या मित्र- मैत्रिणीसोबतच चॅटिंग करणे, एकमेकांच्या वाढदिवसासंदर्भात स्टेटस ठेवणे, इन्स्टावर रिल्स बनविणे यामध्ये हे तरुण गुंतले असल्याचे दिसून येत आहे.मात्र, ही अत्यंत गंभीर अन् चिंतेची बाब असल्याचे सुज्ञ व्यक्तींचे म्हणणे आहे.
या प्रश्नांवर सोशल मीडियावर आवाज कुठे?
*शहरातील पाणी समस्या :
चंद्रपूर शहरात अद्यापही बऱ्याच भागात अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. मात्र त्याची चर्चाच होताना दिसून येत नाही.
*वाढलेली बेरोजगारी :
जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ना नोकरी, ना उद्योगासाठी भांडवल तरीही तरुण सोशल मीडियावर शांतच आहे.
*शेतमालाला भाव नाही:
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान, कापूस, सोयाबीनला अत्यल्प भाव आहे. तरीही त्याबाबत चर्चा होताना दिसून येत नाही.
तलाठी भरतीसंदर्भात किती ओरड झाली. आंदोलने निवेदन दिले काय फलित झाले, शासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याने चर्चा करून फायदाच काय?
- प्रतिश नागोसे, तरुण
शुभेच्छा अन् चॅटिंगसाठीच वापर
सोशल मीडियाचा वापर आता लहान थोरांपासून ज्येष्ठ नागरिकसुद्धा करताना दिसून येत आहेत. मात्र, यात आवश्यक विषयावर बगल देऊन आजकाल वाढदिवस, मॅरिज अनिवर्रसरीच्या शुभेच्छा किंवा मित्र मैत्रिणीसोबत चॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.
■ बऱ्याचदा राज्यापासून देश-विदेशांतील प्रश्नांवर, राजकारणावर सोशल मीडियात पोटतिडकीने मते माडली जातात. पण, स्थानिक प्रश्नाविषयी गांभीर्य दिसून येत नाही.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments