निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
15-01-2024
प्रतिनिधी : दिलीप अहिनवे
मुरबाड, दि. १५ : मुरबाड तालुक्यातील कोळींब गावात मंंदार कृषी तंत्र विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला . कल्याण मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ तसेच कट्टर शिवसैनिकांचे वाढदिवस देखील येथे केक कापून साजरे करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा व विविध उपक्रमात यश संपादन केले त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती बाळ हरदास, श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोटे, उपाध्यक्षा विजयाताई पोटे, पालघर जिल्ह्यातील ग्रामसेविका व शाळेची माजी विद्यार्थिनी जना माळी-तांबडे, संस्थेच्या प्राचार्या निलाक्षी शिंदे, स्थानिक सरपंच राजेश भोईर, उपसरपंच संंकेत पाठारे, बहुसंख्य ज्येष्ठ तसेच कट्टर शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री चैतन्य शिक्षण प्रसारक संस्था कल्याण संचालित, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यता प्राप्त मंदार कृषी तंत्र विद्यालय कोळींब येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व ज्येष्ठ तसेच कट्टर शिवसैनिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांचे प्रथम औक्षण करण्यात आले. बिगुलवर कडक सलामी देण्यात आली. लेझीम पथकाने पाहुण्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत वाजत गाजत आणले. पाहुण्यांची चहापानाची उत्तम व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. पाहुण्यांना कृषी विद्यालयाचा संपुर्ण परिसर फेरफटका मारुन दाखवण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमधील विविध सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तमोत्तम कलाकृती सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. चांगल्या कलाकृती सादर केलेल्या विद्यार्थ्यांना रसिकांनी रोख स्वरुपात बक्षिसे दिली. विद्यार्थ्यांनी १००% सहभाग नोंदवून मनमुराद आनंद लुटला. मागील महिन्यात क्रीडास्पर्धा आयोजित केल्या होत्या. १०० मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रस्सी खेच व रिले या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा विजयाताई पोटे, शाळेच्या प्राचार्या निलाक्षी शिंदे, प्रशिक्षक संजय मुकणे, ओमकार चिमटे, मंगेश पवार, सुवर्णा गावित, श्रावणी जाधव, नेहा खरात, महेंद्र ढमाले, केदार गावडे, दिलीप अहिनवे व सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या निलाक्षी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन भरत दळवी यांनी तर शेवटी सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोटे यांनी मानले.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments