संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
19-07-2024
ढाकाः बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा नोकर जहांगीर आलम याच्याकडे २८४ कोटी रुपयांची संपत्ती आढळली आहे. आलमकडे एक खासगी हेलिकॉप्टरसुद्धा आहे. जहांगीर हा शेख हसीना यांच्या घरात पाहुण्यांना पाणी देण्याचे काम करत होता. जहांगीरने हसीना यांच्या कार्यालयात आणि घरात काम करत असल्याचे सांगून अनेक लोकांकडून लाच घेतली होती. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळायचा. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान हसीना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
परंतु हे प्रकरण समोर येण्याआधीच जहांगीर परदेशात पळून गेला आहे. बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान हसीना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने नुकतीच देशाच्या माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments