STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
20-01-2024
वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन तीन तासानंतर सुटका
तळोधी, (बा.). नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर परिसरातील गोसेखुर्द कालव्यात रानगवा पडल्याची घटना गुरूवारी सकाळी उजेडात आली. त्याच्या बचावासाठी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन रावविले. तीन तासाच्या प्रयत्नाने त्यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. धावपळीमध्ये काही नागरिक जखमी झाले.
रात्रीच हा रानगवा ओपन कालव्यात पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही बाब सकाळी उघडकीस आली. याची माहिती मिळताच वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 9 वाजता पासून रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली.
दोराचे साहाय्याने तीन तासानंतर सुखरुप बाहेर काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळीवनपरिक्षेत्रधिकारी हजारे, स्बाब संस्थाचे यश कायरकर, वनरक्षक गुरूदेव नवघडे,व नागरिक उपस्थित होते.
धावपळीत नागरिकांना दुखापत
कालव्यात पडलेला रानगवा वनविभाग, स्वाब संस्था, तथा स्थानिक नागरिकांचे सहकार्याने नहरा बाहेर काढल्यानंतर दोराने बांधलेला रानगवा पिसाळलेल्या अवस्थेत झाला. परिनामी उपस्थित नागरिकांची एकच धावपळ उडाली. आणि या धावपळीत रानगवा हल्ला करेल म्हणून सैरावैरा नागरिक पळू लागले त्यात ज्ञानेश्वर पडोळे यांचा पायाला गंभीर दुखापत झाली.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments