RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
10-01-2024
जावेद अख्तर त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. ते वक्तव्य करताना अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा त्यांची वक्तव्य चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमात महिलांना दिलेल्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे.
आत्तापर्यंत श्रीदेवी आणि माधुरी सारख्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री बॉलिवूडमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र कधीही त्यांना मोठी भूमिका मिळाली नाही. याचबरोबर त्यांनी शाहरुखच्या जब तक है जान सिनेमावर देखील संताप व्यक्त केला आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा वेगवेगळ्या राष्ट्रीयतेच्या लोकांसोबत झोपण्याबद्दल बोलत आहे. यावर जावेद अख्तर म्हणाले की, 'आजकाल चित्रपट निर्मात्यांना सशक्त असणं काय असतं हेच कळत नाही, त्यामुळेच अशा भूमिका नायिका मिळत आहेत'
टॅलेंटेड एक्ट्रेसला नाही मिळत आयकॉनिक रोल
आजकाल सिनेमात महिला सशक्तिकरण ज्याप्रकारे दाखवलं जातं जावेद अख्तर त्यावर नाराज आहेत. एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर म्हणाले आहेत की, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित सारख्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री येवून गेल्या. पण त्यांना कधीच मोठ्या भूमिका मिळाल्या नाही. मदर इंडिया, बंदिनी, सुजाता आणि साहिब बीवी और गुलाम सारख्या आयकॉनिक ठरलेल्या चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या नाहीत. यश चोप्रा यांनी फार चांगले नाही पण चांगले चित्रपट केले. संपूर्ण कारकिर्दीत कम्प्लीट मूवीज बनवले.
जावेद अख्तर पुढे म्हणाले, आजचे सिने निर्माते सशक्त महिलाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना कळत नाही की खरच सशक्त महिला कोण आहे? यश चोप्रांच्या चित्रपटाचे उदाहरण देताना ते म्हणाले, त्यांच्या जब तक है जान या चित्रपटाची नायिका म्हणते, 'शादी के पहले में पूरी दुनिया में अलग-अलग एक्सेंट वाले मर्दों के साथ सोऊंगी' असं ती म्हणते. एवढी मेहनत करायची काय गरज आहे?
जावेद अख्तर पुढे म्हणाले, सशक्त होण्यासाठी तुम्हाला इतकं हार्ड वर्क करण्याची गरज नाही. यात त्यांना मॉडर्न महिला दिसते. सशक्त महिला म्हणजे काय त्यांना माहित नाही. त्यामुळे महिलांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत. सिनेमात हिरो गाणं गातो, डान्स करतो किंवा अॅक्शन करतो तेव्हाच चित्रपट पूर्ण होतो, असं यावेळी जावेद अख्तर म्हणाले. चित्रपटात कोणताही कॉन्टेंट नसल्याचे त्यांनी सांगितलं चित्रपट निर्माते आणि लेखकांना कॉन्टेंट काय आहे हे समजत नाही कारण समाजच त्याबद्दल स्पष्ट नाही. लोकांना आवडेल अशा कॉन्टेंटवर चित्रपट बनवता येत नाही. असं जावेद अख्तर त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments