बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
09-02-2024
चणा कटाईसाठी आलेल्या मजुरांची वाहतूक करणारी टाटा सुमो उलटली : सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ अपघात
नांद/बेसूर : चणा कटाईसाठी आलेल्या महिला मजूर परतीच्या वाटेला असताना त्यांना घेऊन जाणारी टाटा सुमो गाडी अनियंत्रित होऊन उलटली.
यात तिघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालकासह १३ महिला जखमी झाल्या आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिसर्ती चौकी हद्दीतील सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला, रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बामळे तिघीही रा. खरबी (माहेर) ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर अशी मृत महिलांची नावे आहेत.
तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली. जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,
संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत अडकिने, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.
सध्या उमरेड-भिवापूर तालुक्यात चणा कटाईचे काम सुरू आहे. मजुरांच्या अभावामुळे बाहेर
जिल्ह्यातील मजुरांची स्थानिक शेतकरी रोज ने-आण करीत असतात, पोटाची खळगी भरण्यासाठी रोज शंभर ते दोनशे किलोमीटरचा जीवघेणा प्रवास हे मजूर करतात.
अशातच गुरुवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी (माहेर) जि. चंद्रपूर येवून चणा कटाईसाठी वायगाव (गाँड)ता. उमरेड येथील शुभम राऊत यांच्या शेतात एम. एब.३३-ए-१९४७ टाटा सुमो गाडीमध्ये चालक पकडून एकूण १७ महिला मजूर आल्या होत्या.
जखमींना नागपुरात हलविले
अपघात झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमीना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची
माहिती मिळताच चंद्रपूर जि.प. चे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनीही घटनास्थळी दाखल होत महिलांच्या प्रकृतीची कृतीची माहिती घेतली. सदर अपघाताची नोंद बेला पोलिसांनी घेतली आहे.
अपघाताचा तपास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, बेला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव बाडगीरकर, कुणाल ठाकूर, चाबा नेवारे करीत आहेत.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments