संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
30-12-2023
.
दिल्ली, . आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. चंदा कोचर यांच्या विरोधात दिल्लीत एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात त्यांच्यासह इतर 9 जणांवर टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या लोकांमुळे 27 कोटींचे नुकसान झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 2009चे हे प्रकरण नुकतेच प्रकाशात आले. १ डिसेंबरला पतियाळा हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना तपास सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 20 डिसेंबरला फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांचा हवाला देऊन एफआयआर नोंदवला. कोचर यांच्या व्हिडीओकॉन कर्ज - फसवणूक प्रकरणाची आधीच चौकशी सुरू आहे. एफआयआरमध्ये चंदा कोचर, संदीप बक्षी (सीईओ आणि एमडी आयसीआयसीआय बँक), विजय झगडे (माजी व्यवस्थापक आयसीआयसीआयबँक), मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या ग्लोबल ट्रेड सर्व्हिसेस युनिटचे अनामित अधिकारी, अतुल कुमार गोयल (एमडी-सीईओ, पंजाब नॅशनल बँक) यांचा समावेश आहे. याशिवाय के. के. बोर्डिया (माजी जीएम, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स), अखिला सिन्हा (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख), मनोज सक्सेना (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख) आणि के.के. भाटिया (ओबीसीचे माजी मुख्य व्यवस्थापक) यांचीही नावे आहे.
पी अँड आर ओव्हरसीज कंपनीची तक्रार
पी अँड आर ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड (टोमॅटो मॅजिक) चे संचालक शम्मी अहलुवालिया यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी खरा दस्तऐवज म्हणून परदेशी बँकेकडून 'लेटर ऑफ क्रेडिट' (एलओसी) पास करण्याचा कट रचला होता. टोमॅटो पेस्टच्या निर्यात ऑर्डरसाठी महत्त्वाची एलओसी, रॉयल बैंक ऑफ स्कॉटलंड (आरबीएस) द्वारे जारी करण्यात आली होती; परंतु नंतर हे उघड झाले की, ते आरबीएस अलायन्स नावाच्या स्थानिक रशियन बँकेकडून जारी केले गेले होते, जे त्यांच्याखराब प्रतिष्ठेसाठी ओळखली जाते
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments