समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
08-03-2024
आरमोरी: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे उखाडा निर्माण झाला आहे परंतु विजेचा लपंडाव मागील काही दिवसापासून मोहझरी,शिवणी ,सुकाळा, नागरवाही, देलनवाडी, मानापुर, अंगारा , मालेवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग सुरू केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली आहे त्या धान्याला पाणी देण्याकरिता विजेची अत्यंत आवश्यकता असते परंतु लोडशेडिंगच्या नावाखाली काही तासाकरिता विज बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक हातात येतात की नाही अशी शंका या विजमुळे निर्माण झालेली आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरीक घरोघरी पंखे लावून आराम करत असतात परंतु विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता संपूर्ण आरमोरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने लोडशेडिंगच्या विरोधामध्ये एक निवेदन सादर करून महावितरणकडे देण्याचे करावे जेणेकरून हा विजेचा लपंडाव बंद होईल याकरिता सर्व ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.
आपल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होत असून सुद्धा स्थानिक पातळीवर विजेची कमतरता दाखवून वेळोवेळी लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. म्हणजे आपल्या विदर्भात वीज तयार होऊन सुद्धा येथील लोकांना अंधारामध्ये जीवन काढावे लागत आहे ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विजेच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभे करून महावितरणला वीज सुरू ठेवण्याकरिता आग्रहाची भूमिका घ्यावी .
वरील बाबीचा गंभीरपणे महावितरणने विचार करून आरमोरी तालुक्यातील सर्व गावाला वीज 24 घंटे विज पुरवठा करावा अशी मागणी आरमोरी तालुक्यातील सर्व नागरिकांची प्रमुख मागणी आहे. अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments