संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
10-01-2024
गडचिरोली : महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात ९ जानेवारी रोजी येथे झाली. यावेळी जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटर अंतरावरील सिरोंचा पर्यंतच्या महिलांना बोलावण्यात आले होते. पण, पाण्यावाचून विद्यार्थी, महिलांच्या घशाला कोरड पडली होती. चार तासांपेक्षा अधिक वेळ ताटकळत बसावे लागले, काहींना उन्हात रांगेत थांबावे लागले, त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. चारशे बस, शेकडो खासगी वाहनांतून हजारो महिलांना ९ जानेवारी रोजी शहरातील एमआयडीसी परिसरातील कोटगल रोड मैदानावर एकाच छताखाली एकत्रित आणले. मात्र, हजारोंच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन कोलमडले. सकाळी ११ वाजेच्यानियोजित कार्यक्रमासाठी १० वाजेपासून गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मान्यवरांचे आगमन दुपारी दोन वाजता झाले. त्यामुळे महिला-विद्यार्थी ताटकळून गेले होते. पाण्यासाठी महिला, विद्यार्थी आसन सोडून धावाधाव करताना दिसून आले. ओरड वाढल्यानंतर जार द्वारे पाण्याची व्यवस्था केली. पण, काही महिलांना पाणी मिळाले तर काहींना मिळाले नाही.
शाईच्या पेनाचीही पोलिसांनी घेतली धास्ती
दरम्यान, कार्यक्रमस्थळी प्रवेश देताना पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली अडवणूक केल्याचे दिसून आले. अनेक महिलांच्या पर्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. • शाईफेकीच्या घटनांच्या धास्तीने अनेक जणांकडून पेन देखील काढून घेतले. काही महिला लहानग्यांना घेऊन आल्या होत्या, त्यांचेही हाल झाले.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments