निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
07-01-2024
चौगान: क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईने आज महिलांची प्रगती झाली आपल्या ज्ञानामुळे तुम्ही सर्वच क्षेत्रात भरारी घेतली तुम्ही सक्षम झालात तेव्हा भगिनींनो आता देशातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध लढायला शिका अन्यायाचा प्रतिकार करायला शिका असे दलीत मित्र प्राचार्य डी. के. मेश्राम यांनी महिलांना आवाहन केले.
रमाई महिला मंडळ तथा बौध्द समाज चौगान द्वारा आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्याने बौद्ध भीम गीते सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी प्रा. डी. के. मेश्राम बोलत होते. ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष खेमराजभाऊ तिडके यांचा अध्यक्ष ते खाली जिल्हा परिषद चंद्रपूर चे माझी समाज कल्याण सभापती प्राचार्य डॉ. राजेश भाऊ कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सह उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद भाऊ मोटघरे आणि उपाध्यक्ष विजुभाऊ भागडकर उद्योजक मुंबई, ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सुनीता ताई तिडके मॅडम, रंजुबाई मेश्राम, व प्रमुख अतिथी म्हणून कृ. उ. बा. समिती चे संचालक किशोर राऊत हिरालाल बन्सोड सर, सुनील लिंगायत धनराज राहाटे आतिश बनसोड राजेंद्र गुनसेट्टीवर तसेच सरपंच उमेशभाऊ धोटे, अखीलभाऊ कांबळे, अरूनभाऊ गेडाम, राकेश लिंगायत सुविधा ताई मेश्राम मिनक्षिताई शिवणकर, पंकजभाऊ तिडके, दिवाकरजी मातेरे, किशोरभाऊ तिडके, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते प्रा. डॉ. कांबळे सर यांनी सांगितले की अजूनही सावित्री बाई फुले या घरा घरात पोहचल्या नाही त्या एका विशिष्ट समाजाच्या नसून देशातील समग्र महिलांच्या मार्गदर्शिका आहेत. त्यांच्याच पुण्याईने आज महिला ताठ मानेने जगत आहेत परंतु त्या काळातील सावित्रीबाई ची शाळा अजूनही उपेक्षित आहे. पुण्यातील जनतेला त्याची शाळा कुठ आहे हे अजूनही माहीत नसल्याची खंत कांबळे सरांनी व्यक्त केली. सुनीता ताई तिडके मॅडम नी सावित्री बाई चा इतिहास सांगितला धोटे सरपंच यांनी सुद्धा आपले विचार मांडले प्रमोद मोटघरे यांनी सुद्धा सावित्री बाई विषयी माहिती दिली आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष खमराज भाऊ तिडके यांनी विस्तृत मार्गदर्शनातून क्रांती सूर्य ज्योतीबांनी सावित्री बाई फुलेंना कसे सक्षम बनविले आणि त्यांनी त्या अत्यंत कठीण परिस्थितीत महीलांना कसे साक्षर केले या विषयी उदरणा सहित पठऊन दिले. सावित्री बाई फुलेंचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन तसे महिलांनी आचरान करावे असे अध्यक्ष भाषणातून आपले विचार व्यक्त केले.
रात्रौ बुद्ध भीम गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले बौध्द समाजाचे सहकार्य मिळाले.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments