बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
21-01-2024
मुंबईः देशातील विरोधी पक्षातील सरकार तसेच नेत्यांविरोधात ईडी, सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अचानक दोन्ही तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र हे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची आत्तापासून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे का? अशी शंका यावी इतक्या वेगाने ही कारवाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया अचानक वाढल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष्य ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील नेते आहेत.
विरोधी ठाकरे अन् शरद पवार गट टार्गेट !
किशोरी पेडणेकर आणि रोहित पवारांना एकाच दिवशी नोटीस अजित पवार सत्तेत सामील होण्यापूर्वी त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार तसेच चौकशी सुरु असताना त्या चौकशीचे आणि होणऱ्या गंभीर आरोपांचे काय झाले? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच आता शरद पवार गटातील आणि ठाकरे गटातील उर्वरित नेत्यांवर ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू झाला आहे. आज एकाच दिवसात ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांना सुद्धा बारामती अॅग्रो प्रकरणात ईडीवरून समन्स बजावण्यात आले आहे. एकाच दिवशी विरोधी पक्षातील दोन नेत्यांना -नागपूर/अमरावती विभाग वर ईडीकडून नोटीस आल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments