संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
16-01-2024
उन्हाळी धानाच्या पह्यांचे करताहेत नुकसान
मोहटोला (किन्हाळा) : वाढोणा जंगल परिसरात एक जंगली हत्ती विद्युत शॉकमुळे गतप्राण झाला. ती हत्तीण होती. त्यानंतर हा कळप भगवानपूर जंगलमार्गे विहीरगाव- पिंपळगाव (ह.) जंगलव्याप्त भागातील भीमनखोजी येथील परिसरात स्थिरावला आहे. रात्रीच्या वेळेस शेतशिवारात चराईसाठी निघत असतो. पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. रब्बी पिकांकरिता दहा दिवसांपूर्वी
पन्हे टाकण्यात आले. आता पन्हे जमिनीच्या वर आली असून, हिरवीगार आहेत. हत्तींनी पन्ह्यांची नासधूस करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या चिंतित भर पडत आहे. बाजारातून विकत घेऊन आणलेली बिजाई आहे. आता परत पन्हे टाकले तर ते येणार कधी? आणि टाकून झाल्यानंतर पुन्हा हत्तींनी तुडविले तर रोवणी करायची नाही काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सुरुवातीलाच असे नुकसान होत असल्याने आता पुढे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नुकसान होऊनही पंचनामा करण्यास वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला नुकसानभरपाई मिळत नसेल तर जंगलातील हत्तींचा कळप शेतशिवारात येणार नाही अशीउपाययोजना वनविभागाने करावी, अशी मागणी होत आहे. सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत.
क्षेत्र सहायक म्हणतात.. पन्हे पुन्हा येतात
नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत शेतकरी वनक्षेत्र सहायक कैलास अंबादे यांना फोन करतात तेव्हा, हत्तींनी पायदळी तुडवलेले पन्हे पुन्हा मोठे होतील. पन्हे पायदळी तुडवल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पिके दोन-तीन फुटांचे झाले असते तर पाहणी करून पंचनामा करता आला असता व नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असता. अशी प्रतिक्रिया देत आहेत.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments