संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
20-01-2024
वैरागड - येथील ग्रामपंचायत जवळील इंधिरा गांधी चौकात होत असलेल्या अतिक्रमण करणाऱ्यांची तलाठी कार्यालय मार्फत चौकशी करण्यात आली.
येथील मच्छिपालन सहकारी संस्था जवळील इंदिरा गांधी चौकात होत असलेल्या अतिक्रमण बाबत भंडारेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डोनू कांबळे यांनी सत्यदास आत्राम, गिरीश बोधनकार, प्रवीण आणि रुपमांगण कांबळे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.
या अनुषंगाने वैरागड तलाठी कार्यालय मार्फत मोका चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान सत्यदास आत्राम यांचे आपल्याच जागेवर गाव नमुना ८ मालमत्ता क्रं. ७०३ अन्वये नवीन घर बांधकाम होत आहे. प्रवीण आणि रुखमांगण कांबळे यांच्या घराचे अतिक्रमण त्याचप्रमाणे गिरीश बोधनकारयांचा १० वर्षापासून शांताबाई पदा यांच्या घरी धान खरेदी विक्री व्यवसाय सुरू आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवून समोरची कार्यवाही करण्यात येईल असे तलाठी रासेकर यांनी सांगितले.
मंडळ अधिकारी कुमरे, तलाठी एस. एस. रासेकर, कोतवाल जितेंद्र कांबळे यांनी मोका चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर, मच्छीपालन सहकारी संस्थेचे सचिव गजानन धनकर, जनार्दन बोधनकार, मारोती मुंगिकोल्हे, जनार्दन मेहरे, डोनु कांबळे, सत्यदास आत्राम, गिरीश बोधनकार, रुपमांगण कांबळे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments