अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
06-01-2024
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या समर्थकांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यात दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. शिधावाटप (रेशन) घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील शाहजहान यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी अधिकारी आले होते. ईडीचे अधिकारी सकाळी संदेशखळी भागातील शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने तृणमूलच्या समर्थकांनी त्यांना घेराव घातला, अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यासाठी अनेक वेळा शेख यांना बोलावले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शेख यांच्या समर्थकांनी हल्ला केला. हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
शेतकयांच्या खात्यात अवघे ४५० रुपये, तरी ईडीने पाठवली नोटीस
तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना खात्यात अवघे ४५० रुपये असताना ईडीची नोटीस मिळाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गदारोळ उडाला.
त्यानंतर ईडीने हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जुलै २०२३ रोजी त्यांना नोटीस जारी करण्यात आली होती.
आम्ही तामिळनाडू वन विभागाने १२ जुलै २०२१ रोजी पाठवलेल्या पत्राच्या आधारे कन्नय्यान आणि कृष्णन यांच्या विरोधात मनी लॉड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. वन विभागाचा खटला दोन रानटी म्हशीच्या हत्येशी संबंधित होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments