निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
01-01-2024
यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ प्रणालीचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला असून, सध्या आपल्या देशात सुमारे ४० कोटी लोक भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, ॲमेझॉन पे यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपचा वापर करतात.
परिणामत: २०२३ या वर्षात १६ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार ‘यूपीआय’द्वारे झाले आहेत. ही प्रणाली आणखी ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ‘एनपीसीआय’ यात काही बदल करीत आहे व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी २०१४ पासून होणार आहे.
‘यूपीआय’मधील बदल
१) आपल्या मोबाईलमधील ‘यूपीआय’ अॅपद्वारे एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत एकही व्यवहार झाला नसेल, तर आपले ‘यूपीआय’ अॅप सुरक्षिततेसाठी निलंबित केले जाईल.
२) एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. मात्र, हॉस्पिटल किंवा एखाद्या शैक्षिणिक संस्थेस जास्तीतजास्त पाच लाख रुपये इतके पेमेंट एका दिवसात करता येईल.
३) बँक खाते ज्याच्या नावाने असेल तेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे आपले वापरात नसलेले सीम कार्ड मोबाईल कंपनीने दुसऱ्या कोणास दिले, तरी त्याचा गैरवापर होणार नाही.
४) बँक खातेदाराचे आर्थिक व्यवहार व सिबिल स्कोअर विचारात घेऊन खातेदारास क्रेडिट लाईन देता येऊ शकेल. याचा वापर क्रेडिट कार्डसारखा करता येईल.
६) ‘एटीएम’वर क्यूआर कोड स्कॅन करून रोख रक्कम काढता येईल.
७) स्मार्टफोनमधील ‘एनएफसी’ (निअर फिल्ड कम्युनिकेशन) क्षमतेचा वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन न करता एकावेळी ५०० रुपयांपर्यंत परंतु, दिवसभरात चार हजार रुपयांइतके पेमेंट ‘यूपीआय’द्वारे करता येईल. संभाव्य बदल
या वर्षभरात ‘यूपीआय’चा वापर करून सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या रकमेचे गैरव्यवहार झाले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे असे गैरव्यवहार टाळण्याच्या उद्देशाने काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्यांदा
एखाद्यास दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणार असू, तर ती रक्कम हस्तांतर होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल. त्यापुढील व्यवहार लगेचच पूर्ण होतील. या बदलाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. वरील बदलांमुळे ‘यूपीआय’ सुविधा नक्कीच अधिक ग्राहकाभिमुख होईल.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments