CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
04-03-2024
• मुंबई, . पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्याच्या उद्देशाने भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. शनिवारी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी पुन्हा सत्तेवर येणार नाही. मात्र जनादेशाच्या विरोधात ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजपा जिंकू शकतो. तसे झाल्यास देशात प्रचंड असंतोष निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरू केलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ खुला संवाद अभियानाच्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, उद्योजक, शेतकरीआणि कामगारांमध्ये असंतोष आहे. लोकांमध्ये सरकारबद्दल अविश्वास आहे. 'फोडाफाडी करा आणि राज्य करा' हे फार काळ टिकणार नाही. ते कितीही मोठे हुकूमशहा असले तरी ती जनतेसमोर चालणार नाही. जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.
'जुमला'चे नाव आता 'गॅरंटी'
भाजपाला भारतीय जुमला पक्षसंबोधत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजपाने ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि शहरांची नावे बदलली, त्याचप्रमाणे आता 'जुमला'चे नाव बदलून 'गॅरंटी' ठेवले आहे, असा टोलाही त्यांनी हाणला
ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना उमेदवारी
भाजपाच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे नाव नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि अमित शहा यांना कोणी ओळखत नव्हते तेव्हापासून नितीन गडकरी यांचे नाव आपण ऐकत आहोत. बाळासाहेबांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे महामार्ग त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला. घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या भाजपाच्या यादीतील 34 नेत्यांच्या वंशजांना तिकीट देण्यात आले. तसेच ज्यांच्यावर आरोप केले, असे नेते भाजपाच्या कुशीत बसताच त्यांनाही उमेदवारी देण्यात आली. हिच मोदींची हमी आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments