STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
09-01-2024
बी.एड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024 - 2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (RCI) सचिव विकास त्रिवेदी यांनी हे विशेष परिपत्रक जारी केले आहे.
*काय आहे विशेष बीएड अभ्यासक्रम?*
विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम (एनसीटीईच्या चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रमासारखा) ऑफर करायचा असेल त्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे आरसीआयने म्हटले आहे.
एनसीटीई विशेष बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरसीआय हा अभ्यासक्रम राबवणार आहे. एनसीटीईचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तयार केला जात आहे. या संदर्भात डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठ, लखनौचे प्रवक्ते डॉ. यशवंत वीरोदय यांनी बीएड (विशेष शिक्षण) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या भवितव्याबाबतच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments