नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
25-12-2023
गडचिरोली, : . धानोरा तालुक्यातील सोडे येथे मुलींच्या शासकीय आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणात 23 डिसेंबरला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मुख्याध्यापक व अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढले. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. सोडे येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते. याठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थिनी शिक्षण घेतात. सध्या 380 मुली व दहा मुले आश्रमशाळेत शिकतात. 20 डिसेंबर दुपारी जेवणानंतर मुलींना अचानक मळमळ,
उलटी, पोटदुखी असा त्रास सुरु झाला. दुसऱ्या दिवशीही 17 मुलींना सकाळच्या नाश्त्यानंतर त्रास जाणवल्याने धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची एकूण संख्या 126 वर पोहोचली. दरम्यान, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहूल कुमार मीणा यांनी सोडे
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. आर. मंडलवार व वसतिगृह अधीक्षक राजेश लांडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 22 डिसेंबर रोजी त्यांचा खुलासा आला. तो अमान्य करीत 23 डिसेंबरला दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले, अशी माहिती राहुलकुमार मीणा यांनी दिली.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments