अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
13-02-2024
मुंबई : पश्चिम बंगाल, पंजाब बिहारमध्ये सुद्धा भाजपच्या मनासारख्या घटना घडून इंडिया आघाडीची शकले पडत असताना आता दिल्लीचे लक्ष्य महाराष्ट्राकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी फोडण्याचे डावपेच आखले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणांना हाताशी धरून उध्दव आणि पवारांच्या शिल्लक आमदारांना सुद्धा भाजपमध्ये आणायचे आणि नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेते गळाला लावून उरल्या सुरल्या आघाडीला सुरुंग लावण्याची तयारी सुरू आहे.
ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी वेगळी चूल मांडल्याने भाजपमध्ये सध्या खुशीचे वातावरण आहे. राममंदिर आणि कलम ३७० मुळे २०२४ मध्ये आमचा विजय निश्चित झाला असून आम्हाला आता वेध लागले आहेत ते २०२९ असा भाजपचा सध्या प्रचार प्रसार सुरू आहे. मात्र भाजप हा देशात असा एकमेव पक्ष आहे जो वर्षाचे ३६५ दिवस फक्त राजकारण करतो. आपल्या विरोधकांना किंचितही मोकळीक राहता कामा नये, असा विचार करत असतो.याच मुळे आता त्यांनी महाराष्ट्रात आघाडीची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे मिशन यशस्वी होताना दिसत नसल्याने भाजप पक्षश्रेष्ठी अस्वस्थ आहेत. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांचा तसेच भाजप आणि खासगी यंत्रणांचा अहवाल हा भाजपचे मिशन यशस्वी होत नसल्याचे सांगत आहे. महाविकास आघाडी ४८ पैकी किमान २५ ते ३० जागा मिळवतील, असा अंदाज सांगितला जात आहे. उध्दव ठाकरे यांची सहानभुती कायम असून शरद पवार आपले सारे कसब पणाला लावत आहेत. काँग्रेस सुद्धा अजून डळमळीत झालेली नसल्याने भाजपचे निवडणूक रणनीतिकार नवीन चाल खेळण्याचे डावपेच आखत आहेत. उध्दव ठाकरे यांना यापुढे कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळवू द्यायची नाही आणि यासाठी भाजप नेते तसेच प्रवक्ते यांनी मातोश्रीवर आधी सडकून टीका करणे बंद करावी, असे आदेश निघाले आहेत. यामुळे गेले काही महिने सतत टीकेचा आसूड घेऊन उभे असलेले नारायण राणे आणि त्यांची दोन चिरंजीव निलेश आणि नितेश राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना सध्या थोडे शांत बसण्यास सांगण्यात आल्याचे कळते. यामुळे गेले काही महाराष्ट्रातील.. उध्दव आणि आदित्य यांच्यावर होणारी टीका आता कमी झाली आहे. याबरोबर किरीट सोमय्या सुद्धा शांतचित्त झाल्याचे दिसत आहे.
टीकेच्या आघाडीवर एक पाऊल मागे घेताना तपास यंत्रणा मात्र आघाडीची कोंडी करताना दिसत आहेत. आमदार रवींद्र वायकर आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून अनिल परब, संजय राऊत यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना अटक झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनप्रकरणी चौकशीला बोलावले जाऊ शकते. आदित्य यांना अटक केली तर राज्यात मातोश्रीला निवडणुकीत आणखी फायदा होईल, या शक्यतेने फक्त चौकशीचा फास फेकण्याचा विचार केला जात आहे, असे समजते.
दुसऱ्या बाजुला रोहित पवार यांची चौकशी झाल्यानंतर आता पवारांचे आणखी कोण नेते चौकशीच्या रडारवर आणता येतील आणि कोण फुटू शकतील, याचा सुद्धा भाजपकडून विचार केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा भाजपने आशा सोडलेली नाही. हे कमी म्हणून की काय काँग्रेसचे नेते आपल्या बाजूने वळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्यासयासह निवडणुकीच्या तोंडावर काही महत्वाचे काँग्रेस नेते आपल्याकडे येतील, यासाठी भाजपडावपेच आखत असल्याचे कळते.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments