STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
12-02-2024
मुलचेरा : केंद्र व तालुकास्तरीय मुले क्रीडा स्पर्धेच्या नियोजनात हयगय तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी मुलचेराचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम यांना निलंबित केले. त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेआहेत
मुलचेरा पंचायत समितीचेगटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शिक्षण विस्तारअधिकारी नेताजी मेश्राम यांच्याकडे गट साधन केंद्राचा प्रभार आला. गटशिक्षणाधिकारी पदावर ते महिनाभरापासून कार्यरत होते.दरम्यान केंद्रस्तरीय, तालुकास्तरीयक्रीडा स्पर्धेचे योग्य नियोजन केले नाही तसेच प्रत्यक्षात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले नाहीत.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसुद्धा केली नाही, कार्यालयात गैरहजेरी असा ठपका ठेवत मेश्राम यांच्यावर सीईओ आयुषी सिंह यांनी निलंबनाची कारवाई केली
पंधरा दिवसांपासून कार्यालयाला दांडी
नेताजी मेश्राम यांनी कर्तव्यात कसूर तर केलीच, शिवाय ते मागील १५ दिवसांपासून गटसाधन केंद्राच्या कार्यालयात गैरहजर राहत होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सीईओ आयुषी सिंह यांनी मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणामुळे कारवाई झाल्याने अन्य अधिकाऱ्यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे.
.
.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments