संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
31-12-2023
Gadchiroli news : अलीकडच्या काळात बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. प्रामुख्याने मद्यपानामुळे लिव्हर अर्थात यकृत खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अति मद्यप्राशन केल्यामुळे शरीर अनेक रोगांना बळी पडत असल्याचेही दिसून येत आहे. प्रामुख्याने यकृतावर याचा सर्वाधिक परिणाम होतो, तसेच, किडनीवरही मद्य परिणामकारक ठरू शकते. नियमित मद्यपान करणे म्हणजे अकाली मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे मद्य प्राशन करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. अति मद्यप्राशन केल्यामुळे अनेक आजारांना तरुण बळी पडत आहेत. प्रामुख्याने यकृतावर परिणाम होणे, हृदयविकाराचा धोकाही मद्यपानामुळे वाढू शकतो. अनेक वेळा मद्यपी रस्त्याच्या कडेला दिसून येतात. यामुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागतो.
अल्कोहोलिक सिरोसिसची लक्षणे अल्कोहोलिक हेपेटायटीससारखीचअसतात, तसेच अल्कोहोलिक सिरोसिसमुळे यकृतामध्ये उच्च रक्तदाब, पोटात द्रव साचणे, रक्तातील विषाचे प्रमाण वाढल्याने मेंदूला नुकसान होणे, संसर्गाचा धोका वाढणे, किडनी निकामी होणे आणि यकृताचा कर्करोग असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
यकृत कशामुळे होते खराब?
मद्यप्राशनामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. अनेकजण यकृत खराब होईपर्यंत मद्य प्राशन करतात. त्यामुळे शेवटी शरीर अनेक आजारांना बळी पडलेले असते. अशा परिस्थितीत उपचारासही प्रतिसाद देत नाही.
यकृत खराब झाल्याची लक्षणे काय?
पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्त्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.
अति मद्यप्राशनाने होतात हे आजार
अति मद्यप्राशन केल्यामुळे शरीर अनेक रोगांना बळी पडते. प्रामुख्याने यकृतावर याचा सर्वाधिक परिणाम होतो. तसेच, किडनीवरही मद्य परिणामकारक ठरू शकते. नियमित मद्यपान करणे म्हणजे अकाली मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मेंदूचे नुकसान सोबतच यकृताच्या आजारासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments