CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
29-12-2023
चंद्रपूर, :. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला प्रतिहेक्टर 20 हजार रुपये बोनस जाहीर केला. पण याचा लाभ शासनाच्या एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्यांना मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो. 2021 पर्यंत शासनाकडून धानाला प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर केला जात होता. पण मागील वर्षापासून शासनाने प्रति हेक्टर बोनस जाहीर करण्यास सुरूवात केली. मागील वर्षी शासनाने ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ दिला होता. यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री केली तरच बोनस मिळेल, असे सांगितले नव्हते.
मात्र, यंदा यासंदर्भात आदेश आला नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोनसची घोषणा केली. मात्र, याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. मागील वर्षीप्रमाणेच ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना बोनसचा लाभ मिळेल, असे सांगितले जात आहे.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments