बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
14-01-2024
आरमोरी – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण) ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बगडे, वय ३६ वर्षे (वर्ग-३) यांना १,५०० रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार हे मु. पो. वैरागड ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तकारदार यांचे मौजा सोनपूर सर्व्हे क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असून ते कमी करुन ३ पोल केल्याचा मोबदला म्हणून आरोपी महेंद्र डोमाजी बगडे यांनी तकारीस ५,०००/- रुपयांची मागणी केली. तकारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान मौजा सोनपूर सव्हें क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता विद्युत पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असतांना ते ३ पर्यंत कमी करुन दिल्याच्या मोबदला म्हणून आरोपी महेंद्र डोमाजी बगडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण), कार्यालय आरमोरी यांनी ५,०००/- रुपयांची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व तडजोडीअंती १,५००/- रुपये स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे, आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बगडे यांचे आरमोरी येथील निवासस्थानाची अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मुकडून झडती घेण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूर यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जौंजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके व चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments