अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
14-01-2024
विहिरगाव-पिपंळगाव शेतशिवारात धुडगूस
गडचिरोली . कुरखेडा तालुक्यातील वाढोणा शेतशिवारात 31 डिसेंबर रोजी विद्युत शॉक लागल्याने एका मादीचा हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर जंगली हत्तींचा कळप शोकमग्न अवस्थेत होता. मागील 15 दिवस हत्तींचा कळपाकडून कोणतीही नुकसान झाल्याची घटना समोर आली नव्हती. दरम्यान, देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहिरगाव-पिंपळगाव शेतशिवारात हत्तींनी प्रवेश करून पिकांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री उघडकीस आली आहे. पंधरा दिवस शांत असलेला कळप पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी 31 डिसेंबर रोजी वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी वाढोणा येथील शेतकऱ्यानेकुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याने या कुंपणाला स्पर्श झाल्याने कळपातील एका मादी हत्तीचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हत्तींचा कळप शांत झाला होता. त्यानंतर कुरखेडा व देसाईगंज तालुक्यात हत्तींकडून कोणतेही नुकसान झाले नव्हते. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहिरगाव- पिंपळगाव शेतशिवारात दाखल झाला. येथे दाखल होताच हत्तींनी रब्बी पिकाचे नुकसान केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तींचा कळप पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून हत्तींच्या कळपावर देखरेख ठेवली जात आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments