संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
17-01-2024
जळगाव : लग्न लावून देत नसल्याच्यारागातून आईसमोर मुलानेच वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना यावल तालुक्यातील पिळोदा येथे घडली. रतन तानसिंग कोळी (वय ७३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे राहणारे वयोवृद्ध व्यक्ति रतन तानसिंग कोळी (वय ७३) हे आपल्या घरात झोपलेले असतांना १४ जानेवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा देवानंद रतन कोळी (वय-२८) यांने बडील बारंवार सांगुन देखील लग्न लावुन देत नाही किंवा लग्नासाठी पैसे देत नाही. याकारणाने लोखंडी कुन्हाडीने डोक्यात वार करून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी मुलगा देवानंद वडीलांकडे काही दिवसांपासून वारंवार माझे लग्न करून द्या, अशी मागणी करीत होता. मात्र याविषयाकडे वडिलांनी टाळाटाळ केल्याने संप्तत तरुणाने वडिलांचा लोखंडी कुन्हाडीने डोक्यावर वार करून खुन केल्याचे समोर आले आहे. याप्रकारामुळे पिळोदा गाव व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आईच्या फिर्यादीवरून गुन्हा
याबाबत संशयित आरोपी मुलगा देवानंद कोळी याच्या विरुद्ध आई शुबाबाई रतन कोळी (वय ६०) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, १४ रोजी रात्रीचे जेवण करुन आम्ही झोपलो. घराचे पुढे ओसरीत पती रतन तानसिंग हे खाटेवर, मी घरात झोपले व दुस-या खोलीत मुलगा देवानंद झोपला. रात्री ११ वाजेचे सुमारास मी घरात खाटेवर झोपण्यासाठी पडलेली असताना, मुलगा देवानंद हा माझे समोर त्याचे हातात कुन्हाड
घेवुन घराबाहेर ओसरीत गेला व त्यांनी माझे समोर माझे पती रतन तानसिंग कोळी यांचे डोक्यात २ ते ३ कु-हाडीचे वार केले. त्यामुळे रतन तानसिंग यांचे डोके 'फुटले व मोठा प्रमाणात रक्त स्त्राव होवुन ते जागीच मयत झाले. मी मुलगा देवानंद यास थाबविण्याचा प्रयत्न केला, तो पर्यंत त्याने पतीचे डोके कु-हाडीने फोडले होते. त्यांनतर देवांनद हा बाहेर पळुन जात असताना, मी मोठ्याने आरडा ओरड केली. त्यामुळे शेजारी राहणारे संदीप जयसिंग कोळी, रविंद्र तानसिंग कोळी व जयसिंग तानसिंग कोळी हे आले व त्यांनी पतीना पाहीले. त्यांनी मुलगा देवानंदचा पाठलाग केला, असे म्हटले आहे. मयत रतन कोळी सोबत राहते व घरकाम करते.
रतन कोळीची पहिली पत्नी सुमारे ४० वर्षापुर्वी मयत झाली. त्यांनतर माझे त्यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांना पहील्या पत्नी पासुन ३ मुली असुन त्यांची लग्न झालेली आहेत. त्या सासरी नांदत आहेत, पती रतन कोळी यांच्या पासुन मला २ मुले प्रविण (वय ३५ वर्ष) व लहान मुलगा देवांनद (वय २८) अशी दोन मुले आहेत. प्रविणचे लग्न झाले असुन तो पत्नी सौ. भावनासह जळगाव येथे राहतो. संशयित आरोपी लहान मुलगा देवानंद हा अविवाहीत असुन तो मजुरी करतो, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू
दरम्यान मयत रतन कोळी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी देवानंद कोळी यास पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमदर्शनी वडील लग्न करुन देत नसल्याचे कारण समोर आले असले, तरी पोलीस या घटनेमागे आणखी दुसरा काही प्रकार आहे का? याविषयी चौकशी करीत आहेत. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरचे डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस पथकाने भेट देवून तपासचक्रे फिरवली आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments