STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
31-12-2023
गडचिरोली : जिल्हयात रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश करीत धुमाकुळ माजवला असुन कुरखेडा तालुक्यातील वाढोना येथील शेतशिवारात करंट लागुन मादा हत्तीचा मृत्यु झाल्याची घटना आज रविवार 31 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्हयात प्रवेश केलेल्या रानटी हत्तीने धुकाकुळ माजवला आहे. अशातच हत्तीच्या हल्ल्यात वर्षभरात चार जणांचा बळी गेला आहे तसेच शेतक-यांच्या शेतमालाचे व घरांना नुकसान पोहचविले आहे. आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला हत्तीने तुडवुन ठार केल्याची घटना 29 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर हत्तीचा कळप हा कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. दरम्यान तालुक्यातील वाढोणा येथे एका हत्तीचा करंट लागुन मृत्यु झाल्याची घटना रविवार 31 डिसेंबर रोजी उघकीस आली आहे. सदर घटनने वनविभागात खळबळ उडाली असुन वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळावरून विद्युत वायरचा बंडल आढळून आला असून शेतात वीजप्रवाह सोडण्यात आला होता त्यामुळे हत्तीचा मृत्यू झाल्याचे कळते. विजेचा प्रवाह सोडणाऱ्यास ताब्यात घेतले असून कारवाई करण्यात येईल अशी माहीती आहे.
घटनास्थळी नागरिकांचा आक्रोश
करंट लागुन हत्तीचा मृत्यु झाल्याची माहिती परिसरात पसरतात नागरिकांनी गर्दी केली होती. तर हत्तीनी केलेल्या नुकसानीपासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी परिसरात हत्तीच कळप वावरत असताना वनकर्मचारी भिरकूनही पाहत नसल्याचा आरोप करत वनविभागाप्रती संताप व्यक्त करतांना दिसुन येत होते. नागरिकाचा आक्रोश बघता पोलीसानाच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments