संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
20-01-2024
देसाईगंज : तालुक्यातील कुरुड येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटातील बोडेगाव वैनगंगा घाटातून रेती तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढले जात आहे. अशातच देसाईगंज महसूल विभाग गाढ झोपेत असल्याने शासनास लाखो रुपयांचा चुना आहे. नदी पात्रात मोठे खड्डे तयार झाले आहे.
रेती तस्करांची दिवसेंदिवस ताकद वाढत चालली असल्याने रात्रीबरोबरच दिवसाढवळ्या व सकाळच्या सुमारासही खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. गावातील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नहराच्या मार्गाने तसेच गावामधून ट्रॅक्टर वा इतर साधनांद्वारे नदी रेती घाटातून रेतीतस्करी केली जात आहे
रेती तस्करांमुळे 'गावकरी झाले त्रस्त अन् रेती तस्कर मस्त' असे हल्ली दिसून येत आहे. काही रेती तस्करांचा म्होरक्या कोण कुठून येत आहे, याची माहिती पुरविण्याचे काम करतो. काही रेती तस्करांनी नवनवीन ट्रॅक्टरसुद्धा खरेदी केले आहेत. रेती तस्करांची एवढी हिंमत, ताकद वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आहे.
याबाबत देसाईगंजचे तहसीलदार प्रीती डुडुलकर यांना विचारणा केली असता, रेती तस्करी थांबविण्यासाठी दोन पथके तयार केले आहेत. सदर पथके गस्त घालत आहेत. तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments