नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
01-02-2024
दोन हत्ती कळपातून भरकटले अन् रोवणीचे पन्हें तुडविले !
शेतकरी दहशतीत : देसाईगंज तालुक्यात पुन्हा धुमाकूळ सुरू
देसाईगंज : रानटी हत्तींच्या कळपाचा देसाईगंज तालुक्यातील वडसा वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून वावर आहे. हा कळप अधूनमधून कधी जंगलात तर कधी शेतशिवारात येत असतो. दरम्यान रविवार व सोमवारी हत्तींनी रोवणीला आलेले धानाचे पन्हे तुडविले. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये पुन्हा हत्तीविषयी दहशत निर्माण झाली आहे.
वडसा वनपरिक्षेत्रात हत्तींचा वावर महिनाभरापासून आहे. रविवारी रात्री कळपातील दोन हत्ती भरकटले. हे हत्ती चिखली गाव परिसरात दाखल झाले व त्यांनी रोवणीला आलेले पीक पायाखाली तुडविले. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी दोन हत्ती दिसल्याने चिखलीसह परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. रानटी हत्तींचा कळप वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक ८०, ८१, ८२ ते वन उपविभागाच्या ८४, ८५ जंगलात वावरत आहे. हत्तींच्या ह्या कळपाने चिखली परिसरात एन्ट्री करून धान पन्हे तुडविले. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सोमवारी वनविभागाच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला.
गोंगाटामुळे हत्ती बिथरले?
वडसा वनपरिक्षेत्रातील काही कक्ष हे एफडीसीएमच्या अधिकार कक्षेत येतात. ह्या ठिकाणी लाकडाचे बीट आहेत. व त्याची वाहतूक ही अवजड वाहनांमार्फत केली जाते. याच परिसरात हत्तींचा वावर आहे. वाहनांचा कर्कश आवाज व मजुरांचे आवागमन आदी कारणांमुळे हत्ती बिथरत आहेत. यावर वडसा वनविभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, वाढोणा येथे हत्तिणीच्या मृत्यूनंतर हत्तींचा कळप शांत झाला होता.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments