समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
10-01-2024
आपल्या आजूबाजूला असलेल्या जी झाडे आणि वनस्पती दिसतात, त्यापैकी अनेकांमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. तसेच ते आपल्यासाठी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
यापैकीच एक म्हणजे कडुलिंबाचे झाड आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध कडुलिंब अनेक आजारांवर उपयुक्त आहे.
उत्तराखंडच्या डेहराडून येथील रहिवासी आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत माहिती दिली. कडुलिंबाचे वनस्पतीशास्त्रीय नाव अजाडिरेक्टा इंडिका आहे. त्याचा रस कडू असतो. मात्र, तो जीवनरक्षक औषधी वनस्पतीपेक्षा कमी नसतो. कडुलिंबाच्या पानांचे सतत सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांचा हा आजार पूर्णपणे बरा होतो.
डॉक्टर जुगरान यांनी पुढे बोलताना सांगितले की, पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप प्रभावी आहेत. तसेच पोटातील जंत दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस मध आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने फायदा होईल. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने बद्धकोष्ठता आणि जुलाबातही फायदेशीर आहेत. कडुलिंबाची पाने सुकवून त्यात साखर मिसळून खाल्ल्यास अतिसारापासून आराम मिळतो. तसेच जर कोणी भाजले असेल तर जागेवर कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाची पाने ठेचून लावल्याने आराम मिळतो.
कान दुखण्यापासून मिळेल आराम -
डॉक्टर शालिनी जुगरान पुढे म्हणाल्या की, ज्या लोकांचे कान दुखत असतील किंवा कानातून स्त्राव होत असेल, त्यांनी कानात कडुलिंबाचे तेल टाकावे. असे केल्याने आराम मिळतो. याशिवाय कडुलिंब दातांसाठीही फायदेशीर आहे. तसेच कडुलिंबाची टूथपेस्ट नियमित वापरल्याने दातांतील जंतू नष्ट होतात, हिरड्या मजबूत होतात, तसेच दात चमकदार आणि निरोगी होतात.
कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म -
डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत बोलताना पुढे सांगितले की, कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म आढळतात. जर तुम्हाला फोड आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या असतील तर कडुलिंबाची पाने, साल आणि फळे एकसारखे बारीक करावे आणि ही पेस्ट त्वचेवर लावा. असे केल्याने फोड आणि जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच पुरळपासूनही आराम मिळतो.
कडुलिंबाचा वापर काविळवरही फायदेशीर ठरतो. पित्त मूत्राशयातून आतड्यात पित्त पोहोचण्यात अडथळा आल्याने कावीळ होते. अशा स्थितीत रुग्णाला सुंठ पावडर कडुलिंबाच्या पानांच्या रसात मिसळून द्यावी. मूतखड्याच्या आजारापासून बचावासाठी सुमारे 150 ग्रॅम कडुलिंबाची पाने बारीक करून एक लिटर पाण्यात उकळावे. यानंतर हे पाणी थंड झाल्यावर प्यावे. असेल केल्याने मूतखडा निघू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments