समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
26-01-2024
बच्चू कडू यांचा संतप्त सवाल; महाप्रज्ञा बुद्ध विहारात ध्यान कक्ष व ई-लर्निंग सेंटरचे उद्घाटन
गोंदिया, ब्युरो. राजकीय नेत्यांनी परिस्थिती अधिकच बेकार करून टाकली. मनगटात जोर नसते. कुवत आणि विचारही नसताना नेते लोकांच्या हातात झेंडे देतात. लोकंही झेंडे घेऊन एवढे फिदा होतात की, विचारही सोडून देतात. हिंदू असेल तर भगवा, बौद्ध असेल तर निळा आणि मुस्लिम असेल तर हिरवा झेंडा घेतो. जातींच्या या स्पर्धेचा आता वीट आला असून हा देश बगर जातींचा कवा होईल? असा संतप्त सवाल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थित केला. महाप्रज्ञा बुद्ध विहारात रविवारी नवनिर्मित संबोधी ध्यान कक्ष आणि मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू स्मृती ई-लर्निंग सेंटरचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदास वैद्ये तर मंचावर महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, प्रहारचे संपर्कप्रमुख रमेश कारेमोरे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, माजी जि. प. सदस्य मनोज डोंगरे, महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष टी. एम. वैद्य, सचिवतेजराम मेश्राम, कोषाध्यक्ष आर. बी. नंदागवळी, सहसचिव पंचशिला रामटेके, सहकोषाध्यक्ष प्रदीपकुमार रंगारी, शशिकला मेश्राम उपस्थित होत्या.
जातीव्यवस्थेवर प्रहार करताना बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी चारदा आमदार झालो. निवडणुकीत मला कुठल्या नेत्याची, जातीची आणि धर्माची गरज पडली नाही. ज्या दिवशी जात आणि धर्म सांगायची गरज पडेल, त्यादिवशी निवडणूकच लढणार नाही. महात्मा फुले यांच्या विचारांचा दाखला देत, त्यांनी प्रशासनाला 'कलमकसाई' संबोधिले. तुरीचे भाव वाढू नये, म्हणून केंद्र सरकारने एका महिन्यात तीन निर्णय घेतले. या निर्णयांमुळे बारा हजार रुपये क्विंटलची तूर सहा हजारांच्या दराने विकावी लागली.
कलमकसायांनी शेतकऱ्यांच्या छाताडावर तलवार चालविली. अशी कलम चालविल्यास शेतकरी मरतात. मात्र, बाबासाहेबांनी जनकल्याणासाठी कलम वापरली. छत्रपतींनी रयतेच्या हिताचे राज्य निर्माण बाबासाहेबानी राज्यघटना लिहिताना छत्रपतींचे स्वराज्य पुढे ठेवले होते. आम्ही महापुरुषांना जातीत बांधून ठेवले. हे महापुरुष जातीच्या बंधनातून कसे बाहेर काढू ? यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments