STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
29-01-2024
गडचिरोली ब्युरो. आत्तापर्यंत जिल्ह्यात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. नक्षली विचारधारांना आता जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे.
दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. त्यामुळेच जिल्ह्याची वाटचाल आता विकासाकडे होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हावासियांना उद्देशून ते बोलत होते. पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहन करून संपन्न झाला. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिसअधीक्षक यतीश देशमुख, अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणार
भारतमाला प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातून 82.15 किमीचा मार्ग जाणार असून जिल्ह्यात समृध्दी महामार्ग राज्य शासनाकडून प्रस्तावित आहे.
■ तसेच 1888 कोटी रुपये खर्च करून वडसा-गडचिरोली या 52.68 किमी ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची कार्यवाही सुरू आहे.
• जिल्हा मुख्यालयापासून 4 कि.मी. अंतरावर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे.
• तसेच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र पुढील वर्षापासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यात गोंडवानाविद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, प्रशांत शिरके, महेंद्र गणवीर, संदिप कराडे, निलेशतेलतुंबडे, अजय बोडने, पोलिस विभागातील मुंशी मासा मडावी, मोहन लच्चु उसेंडी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मोहित बोदेले, जयंत राऊत, आर्या ठवरे, दिक्षा वाळके, सचिन रोहनकर, अनिकेत भुरसे, संजना येलेकर, प्रतिक रामटेके, उमा सहारे, हिमांद्री गायन, आरोग्य विभाग धन्वंतरी हॉस्पीटल अॅन्ड मल्टीस्पेशालीटी सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आदींचा समावेश होता.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments