ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
20-01-2024
भंडारा: प्रेमसंबंधात प्रेयसीला पैसे दिल्यानंतर संबंधात दूरावा निर्माण झाल्याने दिलेले पैसे मागणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दुसऱ्या प्रेमीकेच्या आरोपी भावाने त्याचेवर चाकुने प्राणघातक हल्ला चढवून जखमी केले. सदर घटना भंडारा येथे दि.१५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजतादरम्यान उघडकीस आली. समीर भुरे (२३) रा. काझीनगर असे जखमीचे तर अभिषेक उर्फ आबु गभणे (२३) रा. काझीनगर असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील काझीनगरातील समीर भुरे नामक तरुणाचे एका तरुणीशी दिड वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. तेव्हा समीर याने आपल्या प्रेयसीला शिक्षणाकरीता व फिजिओथेरेपी दवाखाना लावण्याकरीता पैसे दिले होते. मधल्या काळात दोघांच्या संबंधात दूरावा निर्माण होऊन आरोपी अभिषेक गभणे याचा भाऊ पराग गभणे या तरुणाशी तिने प्रेम संबंध प्रस्तापित करुन त्याचेशी लग्न करीत असल्याचे समीर याला माहित होताच त्यांने दिलेले पैसे मागीतले. तरुणीला 'माझे पैसे कधी परत करशील' असे हटकले याच कारणावरुन आरोपी अभिषेक याने त्याचेशी भांडण करुन चाकुने वार करुन जखमी केले. शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली. जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments