अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
21-01-2024
तेजपूर, गत 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सीएपीएफच्या सुविधांसाठी अनेक पावले उचलली आहेत, मग ती सीआरपीएफ असो किंवा सीमेवर तैनात असलेल्या इतर सर्व संघटना. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील 3 वर्षात नक्षलवादापासून मुक्त होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते शनिवारी आसाममध्ये कार्यक्रमाला संबोधित करत होते. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तेजपूर येथील एसएसबी कॅम्पसमध्ये सशस्त्र सीमा बलच्या 60 व्या स्थापना दिनाला हजेरी लावली.
शाह पुढे म्हणाले, भारत-चीन युद्धानंतर एसएसबीची स्थापना 1963 मध्ये झाली आणि जेव्हा अटलजींनी 'एक सीमा एक बल' धोरण लागू केले तेव्हा 2001 पासून एसएसबी फोर्स कार्यरत आहे. भारत- नेपाळ सीमा आणि भारत-भूतान 2004 पासून सीमेचे कर्तव्यदक्ष रक्षण करत आहेत नक्षलवादाविरुद्धच्यालढ्यात एसएसबीच्या शौर्याचे कौतुककरताना शाह म्हणाले, सीआरपीएफ आणि बीएसएफसह एसएसबीने नक्षलवादी चळवळ संपवली आहे.
एसएसबीने नेपाळ आणि भूतान या मित्र देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासोबतच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध लढा दिला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील एसएसबीने सीआरपीएफ, बीएसएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करासह दहशतवाद्यांविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे. टपाल तिकीट जारी : सरकारने एसएसबीच्या 60 व्या स्थापना दिनानिमित्त टपाल तिकीट जारी केले आहे. यामुळे देशातील जनतेसमोर एसएसबीचे कर्तव्याचे समर्पण नेहमीच जिवंत राहील. शाह पुढे म्हणाले, भारत आता संपूण जगात मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे. आपला देश 2047 मध्ये संपूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून समोर येईल. असेही त्यांनी सांगितले
.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments