STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
28-02-2024
दिल्ली,. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली आहे. कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट न खेळता काही खेळाडूंचा आयपीएलवर जास्त फोकस असतो. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर वारंवार हा आरोप केला जातो. आता कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सुत्रानुसार, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याबाबात बीसीसीआय विचार करत आहे. त्याशिवाय कसोटी मालिकेचा भाग असणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सुत्रानुसार, अनेक खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार आहे. नुकताच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वादंग निर्माण झाला. याची क्रीडा वर्तुळात चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन याला बीसीसीआयने स्पष्ट शब्दात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना दिली होती. तरीही ईशान किशनने झारखंडकडून एकही सामना खेळला नाही. दुसरीकडे श्रेयसअय्यरनेही रणजी चषकातील क्वार्टर फायनल सामन्यातून माघार घेतली.
मिळतात 15 लाख रुपये बीसीसीकडून
एका कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातात. 2016 मध्ये कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार दुप्पट केला होता. दुसरीकडे बीसीसीआयकडून एका वनडे सामन्यासाठी सहा लाख रुपये दिले जातात. तर एका टी 20 सामन्यासाठी 3 लाख रुपयांचे मानधन दिले जाते. भारतीय खेळाडूंना ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो. खेळाडूंचा बीसीसीआय बोर्डासोबत करार असतो. सुत्रानुसार, आयपीएल 2024 नंतर भारतीय खेळाडूंच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments