ProfileImage
130

Post

1

Followers

1

Following

PostImage

Rushi Sahare

Aug. 18, 2024

PostImage

वर्षाताई मोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने करिता महिलांना केले सहकार्य अनेक महिलांना मिळाला लाभ लाभार्थी महिलांनी वर्षाताई चे मानले आभार


 

 गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शिवसेना  संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वतः फॉर्म वाटप केले होते. बऱ्याच महिलांच्या खात्यात  14 ऑगस्ट रोजी या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले आहेत.  सर्व  लाभार्थी महिलांकडून मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले जात आहेत. बऱ्याच महिलांनी गडचिरोली जिल्हा महिला संपर्कप्रमुख वर्षा जितेंद्र मोरे (कुंभारे) यांचे सुद्धा धन्यवाद दिले आहेत. त्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून योजना घराघरात कशी पोहोचली पाहिजे याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा केला. बऱ्याच अंगणवाडी सेविकांना भेटून मार्गदर्शन केले आणि तळागाळातील महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. त्यामुळेच लाभार्थी महिलांनी वर्षाताईंचे ही आभार मानले आहेत. सध्या एक लाख तेहतीस हजार महिलांना लाभ मिळाल्याचे समजते.
उर्वरित रक्कम असंख्य महिलांना मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.


PostImage

Rushi Sahare

July 16, 2024

PostImage

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने'चे लाखावर अर्ज प्राप्त अर्ज नोंदवण्यास दिरंगाई खपवली जाणार नाही जिल्हाधिकारी संजय दैने


 

* जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करावी

* सुधारित नमुन्यातील अर्ज सादर करावे

* सहायता कक्षाची स्थापना

गडचिरोली, : 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत एक लाख आठ हजार 415 महिलांनी अर्ज केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले यासोबतच सदर योजना शासनाची महत्वाकांक्षी योजना असून यात अर्ज नोंदविण्यासाठी दिरंगाई वा हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही यंत्रणेला दिला आहे.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने' साठी सुरु असलेल्या नोंदणीचा आज दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील यंत्रणेकडून आढावा घेतला. यावेळी गडचिरोली येथून जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) ज्योती कडू आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

या योजनेच्या नोंदणी अधिक गतिमान करण्याचे सूचना यावेळी देण्यात आल्या. नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदतकेंद्रावर योजनेच्या अधिकृत माहितीचे फलक लावण्याचे सांगण्यात आले. मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह आज या योजनेसंदर्भातील सुधारित शासननिर्णय आज निर्गमित झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात कालपर्यंत 3373 शहरी तर एक लाख पाच हजार 42 अर्ज ग्रामीण भागातून प्राप्त झाले आहेत. यात 14 हजार 98 अर्ज ऑनलाईन तर 94 हजार 317 अर्ज ऑफलाईन असे एकूण 1 लाख 8 हजार 415 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री देने यांनी दिली. जिल्ह्यांतील सर्व महिलांनी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभासाठी जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी करावी. अर्ज भरण्यासाठी सुधारित नमुना वापरावा, यासाठी कोणालाही पैसे देण्यात येवून नये, तसेच नोंदणीच्यावेळी आधार कार्डवरील नाव, पत्ता, आधारक्रमांक व बँकखाते आदी माहिती अचूकपणे नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सहायता कक्षाची स्थापना

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'साठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार नोंदविण्यासाठी तसेच अडचर्णीचे निराकरण करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाद्वारे जिल्हा स्तरावर सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक 8999368915 व 8698361830 असा आहे. यावर संपर्क करण्याचे आवाहन

करण्यात आले आहे.

अर्ज भरण्यासाठी यांना मिळतोय प्रोत्साहन भत्ता

नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण

पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप / पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.

 


PostImage

Rushi Sahare

July 14, 2024

PostImage

पोरला वनपरिक्षेत्रात नीलगायीची शिकार... दहा आरोपी मधून दोन फरार...आरोपींना पाच दिवसाची वन कोठडी


 

गडचिरोली -

पोर्ला वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या नवरगांव (दक्षिण) नियतक्षेत्रामध्ये दिनांक 13/07/2024 रोजी निलगायीची शिकार करण्यात आली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकुन दहा आरोपींना अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये -

1) खुदकम रघुनाथ गेडाम रा. कुऱ्हाडी वय 25 वर्षे,  2) अक्षय प्रभाकर सेलोटे रा. नवरगांव वय 22 वर्षे,

3) रोशन दामोधर भोयर रा. नवरगांव वय 22 वर्षे, 4) निखिल गिरीधर ठाकरे रा. चुरचुरा वय 30 वर्षे,

5) सौरभ सुरेश आवारी रा. नवरगांव वय 20 वर्षे, 6) विक्रांत प्रकाश बोरकुटे रा. गोगांव वय 23 वर्षे,

7) संकल्प संजय उंदिरवाडे रा. नवरगांव वय 24 वर्षे 8) संदिप कानिफ चुधरी रा. नवरगांव

8) आकाश प्रभाकर सेलोटे रा. नवरगांव, १) जगदीश देवराव थोराक रा. नवरगांव

यांचा समावेश असुन समीर रविंद्र मडावी रा. कुऱ्हाडी व ओमराज विजय राजगडे रा. चुरचुरा हे दोन आरोपी फरार आहेत.

सदर कार्यवाही  धर्मवीर सालविठठल, उपवनसंरक्षक वडसा वनविभाग, वडसा यांच्या मार्गदर्शनात  मनोज चव्हान सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग, वडसा यांच्या नेतृत्वात  राकेश मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी  पोर्ला यांनी केली.  के. बी. उसेंडी क्षे. स. चुरचुरा,  अरुण गेडाम क्षे. स. पोर्ला,  समर्थ क्षे. स. मरेगांव,  विकास शिवणकर वनरक्षक पोर्ला,  गणेश काबेवार, वनरक्षक दिभना,  संदिप लामकासे वनरक्षक, किटाळी, नितीन भोयर, वनरक्षक देलोडा, बोगा क्षे.स. सिर्श्री श्रीकांत सेलोटे वनरक्षक, देविदास चापले वाहन चालक,  विजय म्हशाखेत्री वनमजूर,  गिरीधर बांबोळे, मजूर, छत्रपती डहाले वनमजूर, दुर्योधन मेश्राम, सोनु खोब्रागडे, रवि डहाले वनमजूर, रुपेश मुंन्घाटे संगणक इत्यादींनी तपासकामी सहकार्य केले.


PostImage

Rushi Sahare

April 6, 2024

PostImage

शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवारांसाठी जाहीरनामा ... लेखी मान्यता दिली तरच समर्थन देणार ...


गडचिरोली : जिल्ह्यात सामान्य माणसांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करीत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी कामगार पक्षाचे आकर्षण जनतेमध्ये आहे. अशा स्थितीत निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारासाठी प्रचार कामी मदत करण्यापूर्वी जनतेच्या ज्वलंत मुद्यांची जाणीव करून देवून सदर मुद्दे ज्या उमेदवाराला मान्य असतील अशा लोकशाही, संविधान समर्थक उमेदवारासाठीच काम करावे, असा रेटा सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चालविला आहे. नेत्यापेक्षा पक्षाचे विचार आणि सामान्य पक्ष सभासद कार्यकर्ते हाच पक्षाचा आत्मा असल्याने, शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीतील घटक असतानासुद्धा स्थानिक खालील मु‌द्यांवर संविधान आणि लोकशाही समर्थक उमेदवाराची लेखी संमती मिळाली तरच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्ष सभासद पूर्ण ताकदीने काम करतील असे ठरविण्यात आले आहे.

1) ओबीसींना मिळालेले 19% आरक्षण जेव्हा 6% टक्के करण्यात आले, त्याचवेळीच घटना आणि लोकशाही धोक्यात आणल्या गेली. आज कोणाला संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर त्यांनी सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 19% पूर्ववत करावे.

2) विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या डिवर, केवट, कहार, भोई व तत्सम भटक्या जमातींची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर असल्याने भटक्या जमाती (ब) (N.T.- B) चे 2.5 आरक्षण 5 टक्के करण्यात यावे.

3) गडचिरोली जिल्‌ह्यात 5 वी आणि 6 वी अनुसूची लागू करण्यात येवून पूर्ण अनुसूचीत क्षेत्र असलेल्या तालुक्यांची जिल्ह्यात स्वतंत्र स्वायत्त जिल्हा परिषद मंजूर करण्यात यावी.

4) गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस सरकारच्या काळात प्रस्तावित व मंजूर झालेल्या आणि भाजप सरकारच्या काळात बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या सर्व लोह खाणी कायमस्वरुपी रद्द करा.

5) कलम 110, 107 रद्द करण्यात यावा.

6) राज्य सरकारने 35 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान कृषी बजेटमधून वीज वितरण कंपनीला दिले आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीजबिलाची रक्कम शेतकऱ्यांना देणे लागत नाही. करीता शेतकऱ्यांना बारमाही 24 तास मोफत वीज पुरवठा करण्यात येईल, असा कायदा करण्यात यावा.

7) गडचिरोली जिल्हयातील वनसंपदेवर आधारीत उ‌द्योगनिर्मिती करण्यात येवून तरुणांना रोजगार देण्यासाठी F-SEZ (Forest special Economic Zone) तयार करण्यात यावा.

8) मोहफुलापासून मद्यनिर्मिती ला चालना देवून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर 'मोहफुलाच्या दारुला' Traditional (पारंपरिक) दर्जा देण्यात यावा.

9) स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत 80% आरक्षणाचा कायदा करण्यात यावा.

10) गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठावरील गावाच्या ग्रामसभांना रेती उत्खनन व विक्रीचे अधिकार देण्यात येवून उत्पन्न आणि रोजगाची संधी देण्यात यावी.

11) गडचिरोली जिल्ह्यात गोंडी भाषिक प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात.

12) पटसंख्येच्या कारणाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचे धोरण रद्द करण्यात यावे.

13) जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षणासह सर्व विभागांतील रिक्त पदांची तातडीने नोकर भरती तातडीने करण्यात यावी.


PostImage

Rushi Sahare

April 1, 2024

PostImage

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!


 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र  जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा - वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने शेतकरी कामगार पक्षाने वेगळी भूमिका घेत आता योग्य उमेदवारासाठी काम करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा समीतीची बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

उल्लेखनीय कि, जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोह खाणींना स्थानिक ग्रामसभांच्या असलेल्या खदान विरोधी भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने सुरुवाती पासूनच समर्थन देवून नेतृत्व केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ग्रामसभा सोबत दगाबाजी करत वेळोवेळी रोजगार मिळण्याच्या नावाखाली प्रकल्प आणि खाणींचे समर्थन केले आहे. ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न,  पेसा - वनाधिकार, पाचवी अनुसूची, रेती तस्करी, बळजबरी भूसंपादन याबाबत जिल्ह्यात भाजपची जी भूमिका आहे, तिच भूमिका काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची असल्याने जिल्हावासीयांची दिशाभूल होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच काही उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्ष आपल्यासाठी काम करणार असल्याचे गृहीत धरले असून न विचारता बॅनर, पोस्टर वर पक्षाच्या नावाचा उल्लेख करण्याचा खोडसाळपणा करीत आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभा विरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा सचिव देवेंद्र भोयर यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

March 12, 2024

PostImage

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैध्यरित्या वाहतुक करणा-यांवर पोलीसांची मोठी कारवाई


 

आगामी सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पाल गडचिरोली यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन / उप.पोस्टे / पोमके यांना महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैध्यरित्या वाहतुक करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या निर्देशानुसार दिनांक ११/०३/२०२४ रोजी अवैध्यरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोशि/ ३७५५ शैलेश तोरपरकवार व व पोशि ५५३८ ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक  जगताप पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अमलदार विलेश ढोके, शैलेश तोरपकवार असे सापळा रचुन इसम नामे अतुल पुंडलीकराव ठाकरे वय ४० वर्ष रा. हनुमान वार्ड साई मंदीर जवळ, देसाईगंज, जि. गडचिरोली यास पकडले व त्याचे ताब्यातुन १) ०४ नग पांढ-या रंगाच्या चुंगळ्या प्रत्येकी १० पॅकेट असे एकूण ४०० ग्रॅम वजनाचे ४० नग पॅकेट त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत ६४० रुपये असे एकुण रुपये २५.६००/- रुपये. २) ०८ नग पिवळ्या रंगाच्या चुंगळ्या मध्ये प्रत्येकी ०५ नगाचे एक बंच पॅकेट असे एकूण २०० ग्रॅम वजनाचे ४०० पॅकेट ज्यावर होला हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत १६० रुपये असे एकुण रुपये ६४०००/- रुपये. २) एक जुनी वापरती सिमेंट रंगाची Maruti Suzuki Alto कंपनीची वाहन क्र. MH - ०२ - BY- १४८९ असे असलेले चारचाकी वाहन किंमत अंदाजे १,००,०००/- रुपये असा एकुण् १.८९.६००/- रुपये किमतीचा माल मिळुन आल्याने वरील नमुद माल जप्त करुन सदर बावत  अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती दिली असुन त्यांचे फिर्यादीवरुन पुढील कारवाई करीत आहोत.

सदर कारवाई  पोलीस अधिक्षक नीलोत्पाल, अप्पर पोलीस अधिक्षक  कुमार चिंथा . उपविभागीय पोलीस अधिकारी  भोसले  यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अमलदार शैलेश तोरपकवार, विलेश ढोके यांनी केली आहे.


PostImage

Rushi Sahare

March 3, 2024

PostImage

पायाभूत सुविधा बळकट करत गरीब, शेतकरी, युवक व महिलांचे कल्याण करणारा अर्थसंकल्प. आमदार कृष्णा गजबे


 मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार  एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार  अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सन २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 

सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचे पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत संकल्पने नुसार राज्यातील शेतकरी, गरीब , युवक, महीला या ४ प्रमुख जातींचे सर्वांगीण विकास व कल्याण करणारा आहे. अर्थसंकल्पातुन प्राधान्याने रस्ते, विज, आरोग्य या मुलभुत सुविधांवर भर देण्यात आला असुन शेतकरी, युवक, महीला व गरिब कल्याणांच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


PostImage

Rushi Sahare

March 1, 2024

PostImage

जिल्हयात ८४ हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम


 

ऋषी सहारे

गडचिरोली, : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील ८४ हजार १८१ बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी एक लाख पोलिओ डोस उपलब्ध करून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे यांनी आज दिली.

भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची फेरी दिनांक ३ मार्च २०२४ रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे व १०० टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात २१४५ तर शहरी भागात ४९ अशी एकूण २१९४ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठीकाणी प्रवासात असलेल्या किंवा स्थलांतरीत होत बालकांकरिता ग्रामीण भागात १११ व शहरी भागात २० अशा एकूण १३१ ट्रान्झिट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच अस्थायी निवास असलेल्या, विटभट्टी, लहान पाडे आदि ठिकाणीसुध्दा लसीकरणासाठी १८४ मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही पात्र बालक वंचित राहता कामा नये. स्थलांतरीत तसेच रस्त्यांवरील बालकांच्या लसिकरणाकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या आहेत. तर योग्य समन्वयातून लसीकरण मोहिमे १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले.


PostImage

Rushi Sahare

March 1, 2024

PostImage

निवडणूक यंत्रणेचा आढावा... निवडणूकीची कामे जबाबदारीपूर्वक पूर्ण करा- जिल्हाधिकारी 


 

ऋषी सहारे

गडचिरोली - लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमून दिलेली कामे नियमांचे पालन करून जबाबदारीपूर्वक व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी आज दिले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी व सहाय्यक यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने श्री संजय मीणा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर. टेंभुर्णे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, तहसिलदार प्रीती डुडुलकर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूकीचे कामकाज टप्पेनिहाय पार पाडण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेची माहिती देण्यात आली. कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कामे नेमून दिलेल्या विषय समितीने कोणकोणती कामे करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी मीणा यांनी विविध शाखानिहाय समन्वयक व सहाय्यक अधिकारी कर्मचारी नेमले आहेत. यात पत्रव्यवहार, नामनिर्देशन, आय.टी. सेल, वाहतूक व्यवस्था, मतपत्रिका, निवडणूक साहित्य, आदर्श आचार संहिता, मतदार यादी, प्रसिद्धी, इ.व्ही.एम. सुरक्षा कक्ष, निवडणूक खर्च, मतदार मदत केंद्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदि २७ शाखांचा समावेश आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 30, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - हत्तीने आणखी एका महिलेचा घेतला बळी... परिसरात हत्तीने माजविला कहर... हत्तीचा बंदोबस्त करा अन्यथा होणार आंदोलन...


( ऋषी सहारे )

आरमोरी परिसरात हत्तीने मुक्काम ठोकला असून मानवी जीवास खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. सालमारा,शंकरनगर, पाथरगोटा हे गाव जंगल व्याप्त व जंगला ला लगुन असल्याने रात्र जागून काढत आहेत कारण असं की देसाईगंज तालुक्यातून सरळ आरमोरी परिसरातील सबंधित गावाजवळून बऱ्याच हत्तीच्या फेऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात हत्तीच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

आरमोरी तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर
असलेल्या शंकरनगर येथे दिनांक 29-12-2023
रोजी रात्रीच्या सुमारास साडेदहा वाजेच्या दरम्यान
कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर अंदाजे
वय 61 वर्ष हे आपल्या परिवारासह शेतामधिल आपल्या घरी असताना शेतामध्ये अचानक हत्ती आल्याने मुलगा
महात्मा मंडल याला हत्ती आल्याचे कळाल्याने त्यांनी
शेतातून गावाकडे जाण्याकरिता पत्नी वडील आणि
आई यांना सोबत घेऊन निघाले असता हत्तीने आपला
मोर्चा या तिघाकडे वळवून कौशल्या राधाकांत मंडल
या महिलेवर हल्ला केला आणि महिलेला चिरडून ठार केले यामुळे शंकर नगर परिसरात हत्तीच्या दहशतीचे
वातावरण तयार झाले आहे. सदर घडलेली घटना वन
क्षेत्र जोगीसाखरा उपक्षेत्र पळसगाव परीक्षेत्र आरमोरी
जिल्हा गडचिरोली येथे घडली. परिसरात असलेल्या
हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे परिसरातील जनतेत बोलल्या जात आहे. वनविभागा प्रती रोष व्यक्त केला जात आहे. वाघाच्या दहशतीत या परिसरातील जनता वावरत आहेच पुन्हा हत्तीची दहशत आल्याने जगावं कसं असा यक्ष प्रश्न निर्माण झालं आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 29, 2023

PostImage

Gadchiroli News - शासकीय इमारतीचं सज्जा तुटल्याने पेंटरचा मृत्यू


   कोरची तालुक्यातील बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय इमारतीवरील नाम फलक लिहीत असताना कोरची येथील पेंटर सुरेश तुकाराम कराडे वय ५५ वर्ष यांचा इमारती खाली पडून मृत्यू झाला. 

           २८ डिसेंबर गुरुवारी बोटेकसा येथे दुपारी अडीच वाजता दरम्यान आरोग्य इमारतीवर आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नाम फलक लिहीत असताना अचानक सज्जा तुटलामुळे पेंटर सुरेश कराडे हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागून दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टर राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून डोक्यावर गंभीर मार असल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. गडचिरोली जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक पत्नी एक मुलगा, एक मुलगी असं बराच मोठा कराडे परिवार आहे. शुक्रवारी सुरेश कराडे यांच्या मूळ गावी कोचीनारा येथे दुपारी दोन वाजता शेतावर त्यांचे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
            सध्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने सर्व आरोग्य विभागातील इमारतीवर जुने नाव बदलून नवीन नाव लिहिण्याचे आदेश काढलेले आहे पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव होते ते बदलून त्या ठिकाणी आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नाव लिहिणे सुरू केले आहे हे नाव लिहिण्यासाठी कोरची येथील पेंटर सुरेश कराडे यांना बोटेकसा आरोग्य विभागाकडून ६० रुपये स्केअर फूट नुसार काम दिला होता याच कामावर नाव लिहीत असताना इमारतीचा सजा तुटल्याने खाली पडून कराडे यांच मृत्यू झाला. सदर इमारत अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून येत आहे.
           बोटकसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील इमारतीचे बांधकाम सण २०१६ यावर्षी करण्यात आले परंतु या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यावेळी येथील अधिकारी इमारतीच ताबा घेण्यास नकार दिला होता. यावरून असे समजते की या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने येथील दर्शनी भागातील इमारतीचा सज्जा तुटला आणि पेंटर सुरेश कराडे याचे मृत्यू झाले. त्यामुळे पेंटर कराडे यांच्या नातेवाईकांनी कोरची पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन बोटेकसा प्रा.आ.केंद्र या शासकीय इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अभियंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे म्हणून लेखी तक्रार दिली आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा


 
अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विषबाधा झालेल्या मुलींची घेतली भेट

          गडचिरोली,दि.21: सोडे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींना अन्नातून विषबाधा : सर्वांच्या तब्येती सामान्य गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काल दिनांक २० डिसेबर २०२३ रोजी अन्नातून विषबाधा झाली. प्राप्त माहितीनुसार दुपारच्या जेवनानंतर काही मुलींना दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोटदुखी, मळमळ, उलटी, डोकेदुखी, भोवळ अशा प्रकारचे त्रास होऊ लागले. थोड्याच वेळात आजारी विद्यार्थिना ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच पुन्हा संध्याकाळी आणखी काही विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. त्यांनाही संध्याकाळी ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे भरती करण्यात आले. यातील ४० विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे काल रात्रीच पाठविण्यात आले. अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाह्यसंपर्क) डॉ. बागराज धुर्वे यांनी ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे जाऊन भरती मुलींची चौकशी व तपासणी केली. आज सकाळपर्यंत एकूण १०९ मुलींना विषबाधा झाल्याने ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असुन ६९ विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरु आहेत. सर्व मुली ८ ते १८ वर्षे वयोगटातील असुन आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिलेली आहे. जिल्हाधिकारी संजय मिणा व प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मिणा यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन भरती ४० मुलींच्या तब्येतीबाबत व्यक्तीश चौकशी केली. सर्व भरती मुलींच्या व सोबतच्या नातेवाईकांच्या आहाराची व संदर्भ सेवेची व्यवस्था करण्यात आलेली असुन आरोग्य यंत्रणा चौकस असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विषबाधा झालेल्या मुलींची भेट घेऊन मुलींच्या तब्येतेची विचारपूस केली व आदिवासी विकास विभागातर्फे चौकशी करण्याचे आदेश दिले.

 


PostImage

Rushi Sahare

Dec. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र


गडचिरोली,  : EVM/VVPAT संदर्भात नागरीकांमध्ये जनजागृती करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकार, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरामध्ये EVM / VVPAT प्रात्याक्षि व प्रचार कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2023 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुषांगाने EVM / VVPAT जनजागृती बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज,गडचिरोली अहेरी यांचे कार्यालयामध्ये ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र (EVM Demonstration Centre) स्थापन केलेले आहे.

          तरी सर्व मतदारांना जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र (EVM Demonstration Centre) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज,गडचिरोली, अहेरी येथे भेट द्यावी व मतदान करुन आपण दिलेल्या मताची खात्री करावी.
 


PostImage

Rushi Sahare

Dec. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - १०० टक्के महिला सहभागातून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम


 

गडचिरोली,  दि.21 : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे महिलांमार्फत करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, महिला व बाल विकास अधिकारी गणेश कुकडे, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, निखील पाटील, सत्यनारायण अनमदवार, तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके यांच्यासह महिला सरपंच, उमेदच्या महिला सदस्या, आदर्श विद्यार्थिंनी आणि विविध शासकीय विभागांच्या महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. आजपर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिरांच्या माध्यामातून तालुक्यातील 25 हजार महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे स्वागतसुध्दा यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आले. सोबतच आरोग्य विभागामार्फत नि:शुल्क टी.बी, सिकलसेल व सामान्य आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी आयोजन केलेल्या या उपक्रमामुळे महिलांमधील आत्माविश्वासाला चालना मिळाली आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Dec. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - ओबीसी प्रवर्गातील युवक युवती साठी विविध योजना उपलब्ध


गडचिरोली,  दि.21 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध असून या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.  1) थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत: या योजनेंतर्गत स्वयंरोजगाराकरीता लघु उदयोग सुरू करण्यासाठी 1 लाखाची बीनव्याजी थेट कर्ज योजना सुरू केली आहे. सदर योजनेत नियमित परतफेड नकरणा-या लाभार्थींना द.सा.द.से 4 टक्के व्याज आकारण्यात येईल व कर्ज परतफेडीची मुदत 4 वर्ष असणार आहे. 2) 20 टक्के बिजभांडवल योजना 5 लाखापर्यंत : या योजनेंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपुर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजुर कर्ज रक्कमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे. 3) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाखापर्यंत : या योजनेचे स्वरुप बँकेने रु. 10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. 4) गट कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 50 लाखापर्यंत : या योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत उमेदवारांच्या गटांकरीता ही योजना असणार आहे. बँकेकडून प्रत्येक गटात कमीत कमी रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त रुपये 50 लक्षपर्यंतच्या मंजुर उद्योग उभारणी करीता आहे. मंजुर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्त्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि रुपये 15 लाखाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. 05) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत : सदर योजना बॅकेमार्फत राबविण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदार 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. बॅकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहित्य खरेदीचा समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग 200 च्या आतील व GRE, TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी, तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. येथे संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

                                                    


PostImage

Rushi Sahare

Dec. 19, 2023

PostImage

Gadchiroli News - संपामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज प्रभावित, सरपंच ,ग्रामसेवक, रोजगारसेवक,ग्रा.पं. कर्मचारी व संघणक परिचालक यांचे तीन दिवस काम बंद आंदोलन.


कोरची - ग्रामपंचायत संदर्भात सर्वच घटकातील होणाऱ्या अन्यायाला  वाचा फोडण्यासाठी  ग्रामपंचायतींचे सर पांच,ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, संगणकाचा परिचालक ,सर्वानीच 18 ते 20‌ डिसेंबर असे तीन दिवस आदोंलन करण्याचा इशारा शासनाला दिला आहे. 

         यामुळे ग्रामीण भागातील सर्वात कारभार ठप्प पडलेला आहे. दिनांक 18 डिसेंबर कोरची तालुक्यातील सर्वात सरपंच, व ग्रामपंचायतील सर्वात कर्मचाऱ्यांनी‌ कोरची पंचायत समिती समोर एकत्रीत येऊन कामबंद‌ आंदोलनास सुरूवात केली. 
       या संदर्भात  गट विकासा अधिकारी  राजेश‌ फाये यांना निवेदन सादर करतांना निवेदन‌ देतेवेळी  ग्रामसेवक संघटनेचे‌ सादर  करतांना निवेदन‌  देतेवेळी  सरपंच सघटनेचे अध्यक्ष‌ धनिराम‌ हिडामी, सचिव दिलीप केरामी,सदस्य सुनिल सयाम, छाया बोगा, रतिर मडावी, रामदेवल मडावी, पचंशिला बोगा,हलामी सरपंच,कौसल्या काटेंगे, तुलावी सरपंच,  कुमरे उपसरपंच, ग्रामसेवक संघटनाचे राज्य अध्यक्ष‌ /जिल्हा सरचिटणीस  दामोधर पटले, कार्याध्यक्ष  नवलाजी घुटके,तालुका कोरची‌   अध्यक्ष चेतन वंजारी, सचिव योगेश बन्सोड ,उपाध्यक्ष देवानंद भोयर  ,महिला तालुका अध्यक्ष‌ ममता गावडे,दयानंद काशिवार,दिलीप  धाकडे ,देवेंद्र लाकडे,राजेंद्र दिहारे,भुपेंंद्र उईके, मोरेश्वर धोटे, निलकंठ मारगाये, यादव बोकडे, बी आर.माकडे,कैलास कावळे,पी.एस.डोंगरवार, लहानु धुर्वे, नवलसिंग काटेंगे, भगत, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष सतोष यादव, सचिव सदिप चौरे, दुखदास परचारी,पंढरी कुळसिंगे,मुकेश उईके, विलास उईके, उईके, महेश राऊत,व इतर कर्मचारी,रोजगार सेवक‌ संघटना‌चे तालुका अध्यक्ष  महेंद्र नुरूटी,सचिव  राजेंद्रसिंग आदे,उपाध्यक्ष दर्याव‌ काटेंगे,संघनक परिचालक संघटना चे तालुका अध्यक्ष विकेश उंदिवाडे,सचिव  भुपेंंद्र कोसरे,उपाध्यक्ष राजकुमार बडोले,कोषाध्यक्ष उतकंठा मोहुलेँ,  

  ‌‌‌‌      या आहेत मागण्या 

1) ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्हीज्ञपदे एकत्रीत करून पंचायत विकास अधिकारी  पद निर्माण करणे 
2)  ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे कडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारसी  ची अंमलबजावणी करणे,
3) विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे,
4) कंत्राटी पध्दतीचे ग्रामसेवक भरती बंद करणे,
5) शिक्षका प्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व करणे.
6) ग्रामसेवक पदाचा सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे,शैक्षणिक‌ उहेँता  कोणत्याही शाखेची पदवी करणे,
आदि मागण्याचे निवेदन सादर केली आहे.,
ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आमदार निधी प्रमाणें. ग्रामपंचायत  सदस्य निधी  असावा.  ग्रामपंचायत सदस्य  मानधन भत्ता.सरपंच,उपसरपंच, मानधान‌ थकीत बाकी अदा करावी.मानधान शंभर टक्के रक्कम शासनाने  घावी.विमा संरक्षण घावे.विधानपरिषदच्या निवडुकीत  ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद नगरपंचाय कर्मचाऱ्याचे वेतन श्रेणी लागु करण्यात यावी.विविध ‌ मागण्यांचा समावेश आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 17, 2023

PostImage

Gadchiroli News - नैसर्गिक व जैविक शेतीच अल्प खर्चिक शेती, शेतकऱ्यांना पूरक - ऋषी सहारे


शेतकरी मेळावा संपन्न

आरमोरी - सध्याच्या रासायनिक शेतीच्या तुलनेत जैविक व नैसर्गिक शेतीच शेतकऱ्यांना पूरक असून कमी खर्चिक शेत असल्याचे प्रतिपादन शेतकरी मेळाव्यात मुख्य जैविक शेती मार्गदर्शक ऋषी सहारे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना म्हटले. आरमोरी तालुक्यातील कोरेगाव व विहीरगाव इथ अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली व अफार्म पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोरडवाहू शेतकऱ्यांनाकरिता  शेतकरी मेळावा घेण्यात आले. दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी कोरेगाव इथ तर १७ डिसेंबर २०२३ रोजी विहीर गाव इथ शेतकरी मेळावा आयोजित करून  हवामानाकुल अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रकल्प अंतर्गत अल्प भू धारक कोरडवाहू शेतकरी यांना अल्प खर्चिक शेती तंत्र ज्ञानविषयी क्षमता वर्धन व्हावे व कोरडवाहू भागातील छोट्या, अल्प भू धारक शेतकऱ्या पर्यंत अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान पोहचविणे व रब्बी हंगामासाठी मार्गदर्शन केले. 
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांची माहिती, गांडूळखताचे महत्व, दशपर्णी, जिवामृत उपयोगाचे महत्त्व विषद करण्यात आले.  
यावेळी दोन्ही ठिकाणी उद्घाटक म्हणून तेथील सरपंच होते तर अध्यक्ष स्थानी तेथील पोलीस पाटील होते.
मुख्य मार्गदर्शक म्हणून ऋषी सहारे आणि ढोलणे व मेश्राम तालुका कृषी सेवक हे होते. सुनील नंदनवार, बालाजी गेडाम सरपंच, ओमप्रकाश मडावी पो पा., गेमराज टेंभुरने उपसरपंच, खुशाल बावणे, कविता दर्रो, सदस्य,परसराम मडकाम अध्यक्ष - तंटामुक्त समिती कोरेगाव, विहीरगाव- जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात - खुशाल वेलादे सरपंच, सौ.रुपकला मडावी  पोलिस पाटील, मंगेश चापले  प्रगतीशील शेतकरी गणेशपुर,सौ.दामिनी पोटे सदस्य, आशा पेंदाम उमेद प्रतिनिधी
व  बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. मेळावा यशस्वीते करिता निकेश ताडाम, प्रेमिका कुमोटी, मंदिरा किरंगे, राहुल मडावी सहकार्य केले.
संचालन, प्रास्ताविक व आभार अकील शेख सचिव अभिनव बहुउद्देशिय कला मंच गडचिरोली यांनी केले.


PostImage

Rushi Sahare

Dec. 17, 2023

PostImage

Gadchiroli News - भिमा कोरेगांव शौयदिन सलामी महोत्सव १ जानेवारीला वैनगंगा नदिघाटावर


गडचिरोली _ ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन तर्फे भिमा कोरेगांव शौयदिन सलामी महोत्सव ०१ जानेवारी 202४ दुपारी १२ वाजता वैनगंगा नदीघाट ( व्याहाड पुलाजवळ ) आयोजीत करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. विनय बांबोळे , राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिआ शेड्युल कास्ट्स फेडरेशन हे असुन उदघाटक म्हणुन संजय मेश्राम डायरेक्टर रियलस्टार मार्केटिंग , तर स्वागताध्यक्ष गोपालजी रायपूरे , रिपाई अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा , प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई अध्यक्ष गडचिरोली जिल्हा तर दिप . प्रज्वलन लताताई लाकडे नगराध्यक्ष नगर परिषद सावली हे राहणार आहेत. . कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ठाणेदार अरुण फेगडे गडचिरोली , माजी जि.प. सदस्य अँड. रामभाऊ मेश्राम , अँड. शाताराम उंदिरवाडे , सामाजीक कार्यकर्ते मोहन ठाकरे , अँड. चिळंगे , वंचित चे जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्णे , राष्टवादीचे प्रदेश सदस्य रिंकु पापडकर , राष्ट्रवादी चे युवा जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडीत मेश्राम ' सामाजीक कार्यकर्ता मिलींद भानारकर ,वचित चे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसींगे , पो.पा. अनिल खेवले , सहा. वनपरिक्षेत्र अधिकारी जनबंधू पिएसआय ठाकुरदास मेश्राम, सामाजीक कार्यकर्ता प्रितम साखरे ,मुख्याध्यापक जनबंधु मारकबोडी , आदिची उपस्थिती लाभणार आहे. रात्रौ ८ वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्मदिक्षा वाहुळे लातुर , यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. समता सैनिक दल गोकुळनगर व सावली च्या वतीने सलामी दिल्या जाणार आहे.तरी कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक दिलीप गोवर्धन , रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम , अरुण शेन्डे , शरद लोणारे , एन. पी. लाळे , निलकंठ सिडाम , विनोद जांभुळकर , अमोल मेश्राम , चेतन सहारे ' संघरत्न निमगडे ' शेकाफे महिला आघाडीच्या सुमित्रा राऊत यांनी केलेले आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 17, 2023

PostImage

Gadchiroli News - महिलांना व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे - पंचशिला बोगा सरपंच*


  मसेली येथे महिला सशक्तीकरण अभियान !!

कोरची. 
           समाजात वावरतांना आणि इतर विविध व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात मात्र,त्यावर मात करून महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, असे मत सौ.पंचशिला बोगा सरपंच ग्रा.पं.बोदादंड  यांनी व्यक्त केले.

         कोरची तालुक्यातील मसेली येथील छत्रपती हायस्कूल   शाळेच्या प्रांगणात महिला सशक्तीकरण अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष  म्हणून   प्रतापसिंह गजभिये तथा तंटामुक्तीचे समिती अध्यक्ष मसेली,कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून  फरेन्द्र.कुत्तीरकर ,प्रकल्प संचालक, जल जीवन‌मिशन,जि.प.गडचिरोली , तहसिलदार  प्रशांत गडृम कोरची, उदघाटक म्हणुन सौ.पंचशिला बोगा सरपंच, राजेश फाये गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरची, विशेष  अतिथी म्हणून सौ.छाया बोगा सरपंच आस्वलहुडकी,सौ.सुरेखा आचले सरपंच नवेझरी‌, श्री.सुनिल सयाम सरपंच मसेली,रामदेवाल हलामी सरपंच ग्रा.पं.मुरकुटी,विरेंद्र जांभुळकर उपसरपंच, अनिलभाऊ केरामी माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, विघाताई हिडामी, नलीनीताई सिंद्राम माजी सभापती , गणेश  सोनवाने नायब तहसीलदार, निळाताई किन्नाकेआरोग्याविषयीची  मुक्तीपथक, डॉ. किरण जाधव पशुधन विकास अधिकारी, प्रेमदास‌ गोटा उपसरपंच, डॉ.विनोद मडावी तालुका आरोग्य अधिकारी, राजाराम नैताम,माजी सरपंच,  , पोलिस पाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला उद्योजकांच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांकडून विकसित केले जाणारे व्यवसाय देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचप्रमाणे महिला स्वतःचा विकास करून इतर महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यास हातभार लावू शकतात. महिलांना सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने महिला सशक्तीकरण सारखे अभियान हाती घेतले आहे. शासन आणि प्रशासनाने पुढाकार घेतला असून आता महिलांनी देखील एक पाऊल पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

कोरची तालुक्यातील मसेली येथे घेण्यात आलेले हे पहिले महिला सशक्तीकरण अभियान असून मसेली ,सावली,राजाटोला,‌ जामणारा,आस्वलहुडकी, दोडके,लक्ष्मीपूर, बोंडेना,मुरकुटी,पडयाजोब, मयालघाट, चंविंदंड,लेकुरबोडी, डांबरी, बोंडे,आंबेखारी, फुलगोंदी,बोदादंड,बिजेपार,बेलारगोंदी,नवेझरी‌, पाच ग्रामपंचायत, 29 गांवे लोक गावातील महिला/पुरूष  मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महसूल विभाग,तालुका कृषी अधिकारी विभाग,पंचायत विभाग,वन विभाग,महिला व बाल कल्याण विभाग,शिक्षण विभाग,भूमी अभिलेख विभाग,आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग,उमेद बचत गट,बँक विभाग तसेच संजय गांधी योजना,सेतू व निवडणूक विभागाने स्टॉल लावून विविध योजनांची जनजागृती केली तसेच गरजूंना लाभ दिले.

उपस्थित मान्यवरांनी देखील महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार प्रशांत गडृम,  आभारप्रदर्शन एस.एस.बारसागडे  मंडळ अधिकारी मसेली यांनी केले तर सूत्रसंचालन कोवे मँडम  यांनी केले.
   ‌‌मान्य वराच्या हस्ते‌ उमेद करून 5 लाभार्थी यांना शिधा‌किट,ब्लँकेट , 7 लाभाथीँ यांना प्रत्येकी 60,000 चेक वाटप,2‌ बचत‌ गटांना‌ प्रत्येक 60,000‌ ‌चे चेक वाटप, तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेचे 9 लाभाथीँ,जातीचे,उत्पन्नाचे दाखले,शिधापत्रिका, सात बारा,वाटप करण्यात आले. तसेच ‌icds ‌कार्यालयाकडुन बेबी‌ किट  वाटप करण्यात आले.आरोग्य विभागाकडुन ,गोल्डन कार्ड, सिकल्सेल कार्ड , आभा  कार्ड,  विधिक प्रकारच्या  तपासण्या करण्यात आल्या.


PostImage

Rushi Sahare

Dec. 15, 2023

PostImage

Gadchiroli News - गोवंश ट्रक तस्करांना गावकऱ्यांनी पकडले



   कोरची तालुक्यात मसेली कोटरा मार्गे गोवंशाची तस्करी करण्याऱ्या दोन ट्रक सावली गावातील गावकऱ्यांनी पकडले.सावली गावातील गावकऱ्यांना अवैध रित्या गोवंशाची कत्तल करण्यासाठी नेण्यात येत आहे असे गावातील गावकऱ्यांना वाटल्यामुळे दोन्ही ट्रक थांबविण्यात आले.अवैध रित्या वाहतूक होत असल्याच्या संशय वाटल्यामुळे रात्रीचे 9.00 ते 9.30 च्या दरम्यान गावातील गावकऱ्यांनी सापळा रचुन दोन  ट्रकसह  100 च्या जवळपास गोवंश दोन्ही ट्रकात आढळून आले आहेत.या दोन्ही ट्रक ड्रायव्हर  गावातील लोकांचा गर्दीमुळे फरार झाले.

       कोटरा च्या दिशेकडून मसेली कडे गोवंशाची तस्करी वाहन जात होते.या प्रसंगी सावली गावातील पोलीस पाटील शांतीलाल नैताम यांच्या सहकार्याने कोरची पोलीस स्टेशनला अवैध रित्या जनावरांची तस्करी होत आहे असे गावकऱ्यांचा सहकार्याने कळविण्यात आले. या वेळेस MH-40 CM.2712 या ट्रक मध्ये 50 आसपास तर NL.08.D.0404 या वाहनात 50 च्या आसपासअसे गोवंश जनावरे क्रूरपणे बांधलेले दिसून आले. या दोन्ही ट्रक मध्ये जवळपास 15 ते 20 लाख रुपये किमतीचे   गोवंश  असल्याचे समजते.

       सदर गोवंश अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर कारवाई करून दोन्ही ट्रक जप्त करण्यात यावी असे गावातील सर्व गावकऱ्यांनी मागणी केली आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 14, 2023

PostImage

Gadchiroli News - उपजिल्हा रुग्णालय जवळ शिवभोजन सुरू



आरमोरी- राणी दुर्गावती महिला बचत गट आरमोरीच्या वतीने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर गरजू व गरीब नागरिकांसाठी शिवभोजन केंद्राचे उदघाटन शिवसेनेचे (शिंदे गट) गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख संदीप बरडे यांच्या हस्ते पार पडले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य कल्पना तिजारे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसच्या महिला जिल्हा महासचिव रोशनी बैस, शिवसेनेचे जेष्ठ नेते तानाजी ताम्हण,वैष्णवी गणवीर, राकेश बैस, पत्रकार रुपेश गजपुरे, दौलत धोटे,ऋषी सहारे,सुनील नंदनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
         याप्रसंगी उदघाटक संदीप बरडे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेला शिवभोजन थाळीचा निर्णय मात्र अजूनपर्यंत तरी कायम आहे. त्यामुळे प्रतिसाद असलेल्या या योजनेचा आजही दररोज शेकडो नागरिक लाभ घेतआहेत.महाविकास आघाडी सरकारने ही योजना सुरू केली होती. सुरवातीला दहा रुपये व कोरोनाकाळात पाच रुपयांत मिळणाऱ्या या योजनेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेल्या या शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. महत्त्वाच्या व मोक्याच्या जागांवर हा उपक्रम राबविला जात असल्याने निश्चितच गरीब व गरजू लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
   कार्यक्रमाचे संचालन दौलत धोटे,प्रास्ताविक रोशनी बैस तर आभार ऋषी सहारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता
 राणी दुर्गावती महिला बचत गटाच्या अस्मिता कोल्हे,पूजा जवंजाळकर,कविता सहारे, यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Rushi Sahare

Dec. 14, 2023

PostImage

Gadchiroli News - ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करू किंवा मरू पण विदर्भ राज्य मिळवू- अँड. चटप 


 विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक निर्णायक निर्णय घेण्याकरीता व आंदोलनाची मालिका जाहीर करण्याकरीता दि. ०७.१२.२०२३ रोजी नागपूर येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालयी झाली व सर्व कोर कमिटीच्या जिल्हा प्रमुखाच्या, महिला आघाडीच्या, जिल्हा समन्वयकाच्या, सर्व पातळीवरील नेत्यांच्या, युवा आघाडीच्या सर्व पदाधिकार्यांच्या व नगर प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडली.  समितीने मिशन २०२३ अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केल्याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास घटनेच्या कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला बाध्य करण्याकरीता व निर्णायक लढयाकरीता व संसदेच्या २ जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने व संसदेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची घोषणा करावी याकारीता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता सातत्याने आंदोलनाचा रेटा लावणारा दबाव गट म्हणून केंद्र सरकारने निर्णय घ्यावा याकरीता ३ आंदोलनाची मालिका जाहीर केली आहे.
    दि. १४.१२.२०२३ रोजी महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील बोटेकसा या गावाजवळील रस्त्यावर “रस्ता रोको आंदोलन” केले जाणार आहे.  हे आंदोलन सकाळी १० वाजता सुरु केले जाणार आहे.
    पश्चिम विदर्भातील अकोला-वाशीम जुड्या जिल्ह्यात विदर्भ आंदोलनाची धग व लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने व नागरिकांनी विदर्भ आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हावे व ११८ वर्षापासूनची स्वतंत्र विदर्भ राज्याची सुरु असलेली लढाई ४ वर्ष मुंबई राज्यात राहून व ६३ वर्षे मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यात राहून नागपूर कराराप्रमाणे मराठी भाषिकांच्या राज्यात २३ % लोकसंख्येच्या आधारावर घटनादुरुस्ती करूनही व घटनेला ३७१ (२) हे अभिवचनात्मक कलम जोडूनही १९९४ पर्यंत ३८ वर्षे वैधानिक विकास मंडळ उशिरा निर्माण करून हक्काचा निधी दिला नाही.  त्यामुळे विदर्भाचे सिंचनाचे ६० हजार कोटी मिळाले नाही.   त्यामुळे १३१ सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होऊन ३५ लाख एकर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही त्यामुळे पूर्वा-उत्तरा नक्षत्राचा पाउस पडला नाही व पिके करपली व अश्या दुष्काळी स्थितीत सक्तीच्या जप्तीची कर्जाच्या वसुलीची नोटीस आल्यावर अमरावती विभाग व वर्धा जिल्ह्यात जग लाजेस्तव शेतकरी आत्महत्या करून मरू लागले व आतापर्यंत १२ वर्षात ३५ हजार चे वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच सामाजिक आर्थिक प्रश्न असलेला नक्षलवादी  चळवळ ग्रस्त भागही विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व यवतमाळ ५ जिल्ह्यात व त्यातील ३७ तालुक्यात आहे.  २००९ सालच्या निवडणुकीत विदर्भातील ४ आमदार व १ खासदार कमी झालेला आहे.  दरवर्षी २००० ते १३००० बालके व गर्भार माता कुपोषणाने मारतात व चंद्रपूर सह विदर्भात प्रदूषणाचे थैमान आहे व विदर्भ आता ओसाड गावांचा अशांत प्रदेश बनला आहे हे सर्व सत्य त्या जिल्ह्यातील जनतेपुढे मांडण्याकरीता अकोला येथे पश्चिम विदर्भाचा “विदर्भ निर्माण संकल्प मेळावा” दि. २०.१२.२०२३ रोजी बुधवारला घेण्याचे निर्धारित केले आहे.
    डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात २७.१२.२०२३ ला दुपारी १२ वाजता पासून आमरण उपोषणाला संविधान चौकात विदर्भ आंदोलनातील विराआंसचे नेते एड. वामनराव चटप, दैनिक देशोन्नतीचे प्रमुख संपादक प्रकाश पोहरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई मामार्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर  सह विदर्भातील सर्व प्रमुख सहकारी या आंदोलनात सहभागी होतील व त्याच दिवशी विदर्भातील ११ ही जिल्ह्यात  रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.     
          आज दि :- १३.१२.२०२३ विदर्भ राज्य आंदोलन समिती कोरची तालुक्याची बैठक दुपारी १२ वाजता बिहीटेकला गावं येथे बोटेकसा येथे दि :-१४.१२.२०२३  होणाऱ्या "रस्ता रोको आंदोलना" बाबत पूर्व तयारी ची बैठक पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी बैठकीला युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सिंग ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे पाटील, नागपूर जिल्हा युवा टायगर फोर्स अध्यक्ष पराग वैरागडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष रामचंद्र रोकडे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सोशल मीडिया अध्यक्ष हेमंत कुमार मरकाम, किशोर नरोटे, श्यामलाल गावडे, दिलीप केरामी, कौशल्या काटेंगे, लकेश राऊत, प्रवीण सहारे, मानोराम कुमरे, जगदीश डेहरिया, नेपाल मोरगाये, सरोज सहारे, ज्ञानचंद सहारे, चुनेश्वर मानकर उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 12, 2023

PostImage

Gadchiroli News - माजी विद्यार्थाने माजी शिक्षकांचा केला सत्कार . मरणाच्या दारात पोहचणाऱ्या माझी शिक्षकांचा माझी विद्यार्थ्यांनी सत्कार केल्यामुळे आमचे १० वर्ष आयुष्य वाढविले- प्रा. जगदिश म्हस्के.


 गडचिरोली _ १0 ते १५ वर्ष सेवानिवृत्त होणारे माजी शिक्षक जे आता मरणाच्या दारापर्यंत पोहचणार अश्या शिक्षकांचा माझी विध्यार्थीनी आमचा सत्कार करून १० वर्ष पुन्हा आमचे आयुष्य वाढविले असे हे आमचे विध्यार्थी जे आता मोठ्या हुद्यावर नोकरीवर असुन तेही नातवापतवाचे धनी आहेत. त्यांच्या सत्कारामुळे आम्ही भारावून गेलोत असे उद्‌गार माजी प्राचार्य जगदिश म्हस्के यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. शिवाजी हायस्कुल गडचिरोली चे १९९७ च्या बाँच चे माजी विधार्थी आरमोरी रोडवरील हाय फॉर्म गोगाँव लॉन मधे शिक्षक - विद्यार्थी व पालक स्नेहमिलन सोहळा आयोजीत केला होता. यात प्रा. जगदिश म्हस्के , प्रा. पुरुषोत्तम निकोडे ' प्रा. मुनिश्वर बोरकर , प्रा. पि.पी. म्हस्के, ए. टि. म्हशाखेत्री , अरविंद बळी , सुमतीताई मुनघाटे आदि माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुनिश्वर बोरकर म्हणाले की, माझी विध्यार्थाचा आम्ही शाळेत सत्कार करतो परंतु माझी विद्यार्थांनी माझी शिक्षकांचा सत्कार म्हणजे हा एक अफलातून आनंददायी प्रकारच म्हणावे लागेल. आम्ही शिक्षकच , परंतु आमचे विध्यार्थी कुणी डॉक्टर ' इंजिनिअर , ठेकेदार ' व्यापारी तर कुणी राजकीय क्षेत्रात चमकले यांचा आम्हाला अभिमान वाटतो. याप्रंसगी पि.पी म्हस्के, प्रा. निकोडे , बळी सर यांचेही समायोचित भाषणे झालीत. यावेळी अजय दिवेदी , दिनेश आकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचलन अमोल दशमुखे यांनी तर आभार सुधिर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास माजी शिक्षक , विध्यार्थी व त्याचे पालक अमरावती वरून अनिल वाघ , नागपूर चे अजय दिवेदी अर्चना कत्रोजवार , मोहीत दशमुखे यांनी स्वागत गित गाऊन केले, बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 10, 2023

PostImage

Gadchiroli News. - मृदा जलसंधारण मंत्रालय मुंबई चे सचिव सुनील चव्हान यांनी दिली मार्कंडादेव मंदिर समुहाला भेट


Gadchiroli :- चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव तेथील मार्कंडादेव मंदिर समुहाला मंत्रालयातील मृदा जलसंधारण सचिव सुनील चव्हाण यांनी  काल शणीवारी भेट दिली त्यांना मार्कंडादेव मंदिरा बद्दल मार्कंडादेव येथी छबिलदास सुरपाम यांनी मंदिर समुहाची संपुर्ण माहीती दिली त्यांच्या सोबत मृदा जलसंधारण चे अधिक्षक अंभीयता नितीन धुसाने,जिला जलसंधारण अधिकार पि.एम.ईगोले, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी विभाग महेश कारेंगुलवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी पुल्लावार,उपविभागीय जलसंधारण अधिकारी चामोर्शी मडावी व जलसंधारण अधिकारी अंकुश दहेलकर,आदि मान्यवर यावेळी ऊपस्थीत होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 5, 2023

PostImage

Gadchiroli News - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना


सन २०२३-२४ अनुसुचित जातीनवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ 

गडचिरोली, : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि.१३ जुन २०१८ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थ्यांना ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रॉपर जिल्हयाच्या ठिकाणी ५ कि.मी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी/१२वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच या योजनेचा लाभ घणेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन२०२३ २४ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ. सचीन मडावी, यांनी केले आहे. सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 4, 2023

PostImage

Gadchiroli News - बेमुदत संपाकरिता हजारो अंगणवाडी सेविका रस्त्यावर...


गडचिरोली.- अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांला घेउन अंगणवाडी कृती समितीचे वतीने ८ डीसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील लोन लाख अंगणवाडी महिला या संपात सहभागी होतील. अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा दया, तो पर्यत किमान वेतन २६००० रुपये देण्यात यावे, आश्वासन दिल्या नुसार अंगणवाडी महिलांना मानधनाचे निम्मे पेंशन तथा ग्रॅज्युटी देण्यात यावी. या प्रमुख मागणीला घेउन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्हा परीषदे समार संघटनेच्या वतीने धरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एक हजाराहून जास्त अंगणवाडी महिला या धरणा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. संघर्ष हमारा नारा है भावी इतिहास हमारा है अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालेच पाहीजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन अंगणवाडी महिलांना अॅज्युटी लागू करा, मानधनाचे निम्मे पेंशन मिळालंच पाहीजे, आदि घोषणा देण्यात आल्या. मार्गदर्शनपर भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या आमदार खासदाराच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पेंशन दिली जाते. तर हेच आमदार जनतेच्या भविष्याचा विचार का करीत नाही. केवळ आश्वासन देतात परंतु त्यांची अंमलबजावणी केल्या जात नाही. पेंशन तथा ग्रॅज्युटी देण्यात येईल. असे आश्वासन विधान सभेत देण्यात आले आठ महिण्याचा कार्यकाल लोटण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली पाहीजे याच मागणीला बेउन हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. अमोल मारकवार म्हणाले कामगाराला संघर्षा शिवाय काहीच मिळत नाही. देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवलशाहीत रुपांतर झाले आहे. आणि म्हणूनच गरीब दिवसे न दिवस गरीब होतांना पहावयास मिळते. तर भांडवलदार अती श्रीमंत होत आहे. गोरगरीब जनतेवरील अन्याय सतत वाढत आहे. आणी अन्यायाचा विरोध केला तर तो दुर करण्याऐवजी सरकारची दडपशाही दिवसें दिवस वाढत आहे. या दडपशाहीचा संघटीतरीत्या आपण प्रतिकार केला पाहीजे. प्रमोद गोडघाटे, अरुण भेलके, राजेश पिंजरकर यांचे ही मार्गदर्शनपर भाषणे झाली. उज्चला उंदीरवाडे यांचे आभारप्रदर्शना नंतर धरणा कार्यक्रम संपला. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता भारती रामटेके, कौशल्या गौरकार, ज्योती बैंजकीवार, छाया कागदेलवार, सुशिला कार, सुनंदा बावणे, सुमन तोकलवार, सुनंदा उईके, योगीता मुनघाटे, यांनी विशेष परीश्रम घेतले.


PostImage

Rushi Sahare

Dec. 3, 2023

PostImage

Gadchiroli News - जो आमदार स्वतंत्र विदर्भाचा बाजुने नसेल त्यांना काळे फासा , गावबंदी करा... मग पहा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय राहणार नाही. :-_प्रकाश पोहरे.


 गडचिरोली _ महाराष्ट्र राज्यात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या , बेरोजगारांच्या समश्या अलीकडे प्रत्येक जातींना आरक्षण मिळविण्यासाठी जनुकाही चढाओढ सुरु आहे. मोर्चा , आंदोलने होत आहेत. ज्या जरांगे पाटलाना कुणी ओळखत नव्हतं तो जरांगे आज हिरो बनत आहे मराठ्यांना ओबिसीत समाविष्ठ करणे हे काम पाहीजे तेवढ सोप नाही तरीही जरांगे लवत आहेत 
स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा नागपूर अधिवेशनात गाजला पाहीजे. जे आमदार विदर्भाच्या बाजुने बोलणार नाहीत , आवाज उठवणार नाहीत अश्या आमदारांना काळ फासुन गावबंदी करा. लढा तिव्र करा स्वतंत्र विदर्भ राज्य मिळाल्याशिवाय विदर्भाचा विकास नाही अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नती चे संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी विदर्भ निर्माण सकल्प यात्रा आंदोलनाच्या समारोपीय कार्यक्रमा प्रंसगी केले . विदर्भ निर्माण संकल्प यात्रा कोरची व अहेरी भागातून येवून यांचा समारोप इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आला. याप्रंसगी विदर्भ राज्य निर्माण समितीचे नेते तथा माजी आमदार अँड . वामनराव चटप म्हणाले की , भरपूर संपतीने नटलेला विदर्भ या विदर्भ राज्याची निर्मीती झालाशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. माजी आमदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नागविदर्भाच्या माध्यमातून लढा दिला होता. हे खरे विदर्भवादी होते. आमचा लढा सुरुच राहणार आहे. देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे हे प्रभुचे विर रावणा पेक्षाही निपटार निघाले यांना जाग येत नाही , केंद्र सरकारने निर्णय घेऊन राष्ट्रपती च्या सहीने संसदेत बिल पास करायचा आहे. मग राज्याने ,परंतु हे गेंड्याच्या कातड्याचे सरकार मु मे राम बगल मे सुरी वाल्यांना धड़ा शिकवून स्वतंत विदर्भ राज्य मिळवायचे आहे म्हणुन नागपूर अधिवेशनात मोठ्या ताकतीने _ संख्येने ३१ डिसेंबरला जमायचे आहे. अभि नही तो कभी नही. रामनाम सत्य है. हे म्हणण्यासाठी आपण लाखोच्या संख्येनी मोर्चात उपस्थित रहावे असे आवाहनही माजी आमदार चटप यांनी केले. व्यासपिठावर विदर्भाचे अध्यक्ष अरुणभाऊ केदार ' रंजनाताई मामर्डे राजेंद्र ठाकुर , अरुण पाटिल मुनघाटे , घिसु खुणे , शालीक नाकाडे , विलासभाऊ रापर्तीवार , गोपालजी रायपूरे , रमेश भुरसे , नाशिर शेख ' अशोक पोरड्डीवार ' आदि स्थानापन्न झाले होते. कार्यक्रमास कोरची ते सिरोंचा पासुनचे विदर्भवादी प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 3, 2023

PostImage

Gadchiroli News - प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभासाठी विशेष ऑनलाईन मोहीम


गडचिरोली, : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस

आहार घेण्यास प्रोत्साहीत करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रीत राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजेनचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर या कालाधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली आहे.

मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रधानमंत्री मातृ वंदना 2.0 राज्यात 9 ऑक्टोंबरनुसार लागु झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये 30 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाचे अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यांसाठी 5 हजार रुपयांचा दोन टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतो. 01 एप्रिल 2022 नंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6 हजार रुपयांचा लाभ एकाच टप्यात देण्यात येत आहे. ही योजना शासकीय सेवेत खाजगी सेवेत किंवा त्या मातेला 6 महिन्याची प्रसुती रजा मंजुर असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे. गडचिरोली जिल्हयातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके यांनी केले आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागपत्रे (कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.)

i) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये 8 लाखापेक्षा कमी आहे. (Income certificate)

ii) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. (Cast Certificate)

iii) ज्या महिला अंशतः (40%) किंवा पुर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)

iv) बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला (BPL Ration Card)

v) आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.

vi) ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला

vii) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी

viii) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला

ix) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) अंगणवाडी मदतनीस

(AWHs) / आशा कार्यकर्ती (ASHs).

x) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 अंतर्गत शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थी.

दिनांक 30 नोव्हेंबर 2023 व 01 डिसेंबर 2023 रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा अहवाल व कार्यक्रमाची निगरानी करण्याची जवाबदारी कु. अश्विनी मेंढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक व चंदु वाघाडे, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गडचिरोली यांची असणार आहे


PostImage

Rushi Sahare

Dec. 2, 2023

PostImage

Gadchiroli News - राहत्या खोलीत पोलीस हवालदाराने केली आत्महत्या


पोलीस हवालदाराने शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
पोलीस हवालदार श्रीमंत कदम (३२) असे मृताचे नाव असून ते राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मयत कानस्टेबल शहरात भाड्याच्या घरात राहत होता. याच घरात त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.अधिक तपास सुरू आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 2, 2023

PostImage

Gadchiroli News - विद्यार्थी व प्रवास्यांसाठी सोयीस्कर बस सेवा सुरू करा... परिसरातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मागणी


ऋषी सहारे

My खबर 24 

आरमोरी -      तालुक्यातील पळसगाव-जोगिसाखरा परिसरातील विद्यार्थी तालुक्यातील  शाळेत शिक्षण घेण्यासाठी व विविध कारणाने मुख्यालयाला जातात. सकाळी 6.45 जाणे व परत तालुक्यातून 11.00 वाजता येणे अशी फेरी,तसेच 10.00 वाजता जाणे व 5.00 वाजता परत येणे. 
अश्या फेऱ्या सुरू होणे अती आवश्यक आहे. ही फेरी जोगिसाखरा - शंकरनगर - पाथरगोटा - पळसगाव - जोगिसाखरा - रामपूर(नदीधाट)अशी असावी.
     कारण या परिसरात हिस्त्र श्वापदे , वाघ, हत्ती, रानडुकरे यांचा वावर अती असल्याने त्यापासून जीवित किवा वित्त हानी नेहमी होत असते. वारंवार अश्या घटना पासून बचाव  होण्यासाठी ह्या परिसरात बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे यासंदर्भात लेखी निवेदन ही सादर करण्यात आले आहे. माज  केंद्रप्रमुख शालिक् मेश्राम, समाजसेवक विनोद पागडे, प्रा. गोपाल दोनाडकर , सामाजिक कार्यकर्ते पुरशोत्तम मैद,देविदास दोनाडकर, अशोक  लोखंडे इत्यादी मान्यवरांनी निवेदन दिले.
     परिसरातील विद्यार्थी, पालक, जनता यांना सुखरूप प्रवास करता येईल व जीवित हानी ही होणार नाही , प्रवासाची सोय व्हावी अशी अपेक्षा ही व्यक्त केली आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 2, 2023

PostImage

Gadchiroli News - जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम


गडचिरोली,  दि. ०१: चामोर्शी तालुक्यातील राममोहनपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत

शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लग्ननाचे योग्य वय पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याची तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची सामुहिकरीत्या ७० विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

दिनाक ३० नोव्हेंबर २०२३ रोज गुरुवार ला जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राममोहनपूर येथे शिकत असलेल्या ७० विद्यार्थ्यांना बालविवाह करणार नसल्याची शपथ देवून बालविवाहाचे दुष्यपरिनाम, तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये विवाह करणाऱ्या मुलांसाठी २१ वर्षे तर मुलींसाठी १८ वर्षे पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे याची बालकांना जाणीव करून देण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा केली जाते. लग्नाचे योग्य वय पूर्ण झाल्याशिवाय आपल्या गावात, कुटुंबात किंवा परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती आपल्याला मिळाली तर १०९८ या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्यात यावे याविषय मार्गदर्शन करण्यात आले.

सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या मार्गद्शनाखाली घेण्यात आले. यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक टी. एस. सरकार, व शिक्षक ए. ए. बिश्वास, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 2, 2023

PostImage

Gadchiroli News - विदर्भ निर्मितीचे युद्ध गावागावात पोहचण्याकरीता उत्तर गडचिरोली च्या बोटेकसा पासून विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेला शुभारंभ”


  विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केली असून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘करू, मरू किंवा जेल मध्ये सडू’ असा निर्धार केला असून १९ डिसेंबर २०२२ पासून "शुरू हुई हैं जंग हमारी", "लढेंगे-जितेंगे", "कटेंगे मगर हटेंगे नही",  "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ" असा निर्धार व्यक्त केला असून ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणून युद्धपातळीवर तळागळा पर्यंत या आंदोलनाची धग पोहचवून केंद्र सरकारला भारतीय राज्य घटनेतील कलम ३ प्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरीता भाग पाडण्याकरीता जनजागृतीचा चंग बांधला असून सतत आंदोलनाची मालिका सुरू ठेवली आहे.

    विराआंसने गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील गावागावात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनाची माहिती गावागावात पोहचविण्याकरीता व पुढील लढाईची भूमिका गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या मनामनात जागविण्याकरीता "विदर्भ निर्माण जनजागरण यात्रा” आज दि. १ डिसेंबर २०२३  ला सकाळी ११ वाजता छत्तीसगड सीमेवरील बोटेकसा गावापासून पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार व डॉ. रमेशकुमार गजबे यांच्या द्वारे यात्रेला हिरवी झंडी दाखविल्या नंतर शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोटेकसा सरपंच किशोर नरोटे यांच्या द्वारे छत्तीसगड बॉर्डर ला "विदर्भ राज मे आपका स्वागत हैं" याआशयाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. पुढे ही यात्रा बोटेकसा गावात घुमत, भीमपूर येथील सरपंच कौशल्या काटेंगे यांनी यात्रेचे स्वागत केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आई महिला प्रभागसंघ भिमपुर च्या कार्यालयात विदर्भ निर्माण संकल्प यात्रा याच्या स्वागत करण्यात आले .त्यावेळी अध्यक्ष प्रमिलाताई काटेंगे, व लेखापाल सतोषी करमकार,ग्रामसंघ सचिव,उत्तरा पुजेरी ,शामबती लाडे,कौशल्या काटेंगे सरंपच,निमला काटेंगे, पुनिया काटेंगे, मंजु नंदेश्वर, गयाबाई चांग सितारो होळी,मनिषा दरवडे,इंद्रावती सोनार,मंगला अंबादे,मनिषा कराडे,शशिकला लाडे,वंदना सहारे,पंचम लाडे,सभा घेण्यात आली, तसेच ही यात्रा गावागावात घुमण कोरची येथे दुपारी 3:30 वाजता पोहचली यावेळी पायदळ रैली काढण्यात आली यावेळी "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे", "लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे", "विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा", " अभि तो यह अंगडाई हैं आगे घनघोर लढाई हैं", "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ अश्या घोषणा देण्यात आल्या.
     विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेचे नेतृत्व  अरुणभाऊ केदार पूर्व विदर्भ अध्यक्ष, मुकेश मासुरकर युवा आघाडी अध्यक्ष,   डॉ रमेश गजबे कोर कमेटी सदस्य, राजेंद्रसिंग ठाकूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष करत असून यात्रेत कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, अशोक पाटील,ज्योती खांडेकर, मुक्ताजी दुर्गे, पराग वैरागडे, रामचंद्र रोकडे, नेपाल मारगाये, शोभीत सोंजाल, मदन सिंग ब्रह्मनायक, वसंता गवळी, अजय गौर, विजय मोंदेकर, माधुरी चौहान, शिवलाल ब्रह्मनायक, बुधराम सहाळा, गोकुल ठेला, सी. पी. बिसेन, अतुल सतदेवे, दीपा काशीकर, भोजराज ठाकरे, हेमंत मरकाम, सरोज सहारे, ठाकूरराम कोसरे, शोभा सोंजाल, विठ्ठल मानेकर, भुवणेश्वर शेंडे, कविता उके, नितेश कोडाप, जगवंतीन देवागण, पुष्पा सहारे, वर्षा वट्टी, रामचंद्र कोडापे, चुनेश्वर मानकर, मुकुंददास सय्याम ,सरजु जमकातन,अभिजिंत निंबेकर,संजय साहारे,चेतन कराडे,रुपेश मडावी,सुनिल हलामी,प्रकाश कौशिक,चेतन किरसान सरपंच,देवाजी गुरूनुले उपसरपंच, सुभाष गायकवाड़, तब्बेत जाडिया,राजु गुरूनुले,  राष्ट्रपाल नखाते,,आशीष अग्रवाल, जिंतेद्र साहारे,राजेंद्र मेश्राम,हुशण पठाण,सुरेश मेश्राम
यात्रेत उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 1, 2023

PostImage

Gadchiroli News - संगणक परिचालक एक डिसेंबर पासून बेमुदत संपावर


Gadchiroli -  ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणकपरिचालक प्रमाणिकपणे करत आहेत, ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत आहेत. ग्रामपंचायतीचे ऑनलाईन व ऑफलाईन व इत्तर अनेक प्रकारचे कामे प्रामाणिकपणे करून सुद्धा केवळ ६९३० हजार रुपये हे या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन मिळते तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही. संगणक परिचालक हे ग्रामपंचायत मध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे, त्यात ग्रामपंचायत स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना ऑनलाईन देण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर/संगणक परिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी शासन स्तरावर राज्य संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत आहे, त्याची दखल घेऊन शासनाने यावलकर समितीच्या शिफारशीनुसार डेटा एंट्री ऑपरेटर/संगणकपरिचालक या पदाची निर्मिती करण्यास व किमान वेतन देण्यास ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांचे अध्यक्षतेखालील ११ जानेवारी २०२३ च्या बैठकीत मान्यता दिली आहे.

ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन  यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २८ डिसेंबर २०२२ रोजी लेखी आश्वासन दिले होते, त्यानंतर ११ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय झाला त्यानुसार फाईल वित्त विभागात गेल्यानंतर त्यात काही त्रुटी काढण्यात आल्या त्यानुसार - ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडून १५ दिवसात अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु १५५ दिवस झाले तरी अद्याप अनेक जिल्हा परिषदानी सदरील अभिप्राय न दिल्याने ग्रामविकास विभागाने त्रुटींची पूर्तता करून परत वित्त विभागास पाठवली नाही, त्यामुळे शासन व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येते.

ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचार्याना किमान वेतन, कोतवाल, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचे मानधन वाढ झाले आहे, परंतु शासनाने संगणक परिचालकांचे मानधन सुद्धा वाढ न केल्याने संगणक परिचालकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. हे ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी आमचे बंधु भगिनी आहेत. त्यांच्या मानधनात वाढ झाली याचा आम्हाला आनंद आहे पण आम्हीच काय पाप केले ? अशी भावना संगणक परिचालकांच्या मनात निर्माण झाली आहे.

तसेच ग्रामविकास विभागाने नव्याने लोकसंख्या निहाय टार्गेट ची पद्धत सुरू केली आहे, अनेक ठिकाणी १ ते ३३ नमुने उपलब्ध नाहीत मग ऑनलाईन कसे करायचे ? कोणत्याही प्रकारचे स्वयंघोषणापत्र किंवा इत्तर दाखल्यांचे मागणी अर्ज ग्रामपंचायतीस आल्यावर तो दाखला देण्यात येतो, परंतु फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या एंट्री व बोगस प्रमाणपत्र देण्यास csc - spv हि कंपनी संगणकपरिचालकांना दबाव आणते.

त्याच सोबत २०१८ पासुन महाऑनलाईन च्या माध्यमातून ४२० सेवा देण्याचे शासनाचे धोरण आहे, त्यानुसार जिथे नागरिकांची मागणी आहे तिथे महसुल विभागाच्या सेवा देण्यात येतात, परंतु अद्याप मागील ५ वर्षात सुमारे ७००० संगणकपरिचालकाना महाऑनलाईन चे आय डी कंपनीने दिले नाहीत, अनेक ठिकाणी लोकेशन चेंज आहे ते दुरुस्त केले नाही मग काम कसे होईल ?B2C सेवा देण्यासाठी बस, रेल्वे आरक्षण, मोबाईल रिचार्ज, गॅस सिलेंडर बुकिंग इत्यादि सेवा देण्याचे टार्गेट दिले आहे, सध्या प्रत्येकाकडे Google Pay, Phone Pay सारखे app असून त्याद्वारे ह्या सर्व सेवा नागरिक घेतात, काम करण्यासाठी संगणक, प्रिंटर आवश्यक असते संगणकाची मुदत ५ वर्षाची होती १२ वर्ष झाले तरी ते बदलून दिले नाहीत, प्रिंटर ची अवस्था तीच आहे, तसेच इंटरनेटचा खर्च संगणकपरिचालक स्वतः करतात, त्यात कंपनीची Mahaegram सारखी महत्वपूर्ण वेबसाइट सुरळीत चालत नाही, अशा अनेक अडचणी असताना ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत निहाय नव्याने टार्गेट सिस्टिम सुरू केली आहे हे टार्गेट ज्यांच्याकडून होत नाही त्यांना कामावरुन कमी करण्यात येत हे अन्यायकारक आहे.

त्याच सोबत पंचायत समिती व जि.प. संगणक परिचालकांचे मानधन मागील १० ते १२ महिन्यापासून थकीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी त्यांचे मानधन लवकरात लवकर करण्यात यावे.

यामुळे खालील प्रमुख न्याय मागण्यासाठी शुक्रवार दिनांक ०१ डिसेंबर २०२३ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक, पं.स.व जि.प. चेसंगणक परिचालकसर्व प्रकारचे कामे बंद ठेऊन बेमुदत संपावर जात आहोत.


PostImage

Rushi Sahare

Nov. 30, 2023

PostImage

Gadchiroli News - वैनगंगा नदीपात्रात रेतीत पुरुन ठेवलेल्या मृत्तदेहाचा पोलीसांनी लावला छळा... आरोपींना शोधून काढण्याचे पोलीसासमोर मोठे आव्हान ...विविध चर्चांना उधाण...


गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामपूर (कढोली) येथील बेपत्ता झालेल्या एका इसमाचा मृतदेह गावालगतच असलेल्या वैनगंगा नदीपात्रात  रेतीत पुरुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा इसम  २३ नोव्हेंबर पासून बेपत्ता होता त्याचा शोध नातलगांनी केला पण त्याचा थांगपत्ता लागू न शकल्याने दोन दिवसांनंतर दि.२५ नोव्हेंबरला बेपत्ता असल्याची माहिती आष्टी पोलीसांना दिली होती परंतु नातलग तथा गावकऱ्यांनी शेतीशिवारात शोध घेतले असता सुंदरची एक चप्पल गावातीलच शेतकरी आनंदराव डोंगरे यांच्या शेतात आढळून आली होती 

त्यावरून आष्टी पोलिसांनी शोध घेतला  असताना दि .२८ नोव्हेंबर रोजी चक्क त्याचा मृतदेह वैनगंगा नदीच्या पात्रात रेतीमध्ये पुरुन ठेवल्याचे निदर्शनास आले.
मृत्तदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी डॉक्टरला पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. व त्याच ठिकाणी सदर व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यात आला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे 

 सुंदर केशव झाडे वय ४९ वर्षे रा .रामपूर (कढोली) ता.चामोर्शी असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन आष्टी येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.

त्याला विद्युत करंट लागल्याने सुंदर याचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. परंतु विद्युत करंट लागुन मृत्यू झाला तर वैनगंगा नदीत एवढ्या लांब नेवून त्याला नदीत पुरले व घटनास्थळापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीतील वाळूमध्ये कोणी नेऊन पुरुले असेल अशा शंकाना पेव फुटले आहे.
या घटनेचा तपास आष्टी पोलीस मोठ्या बारकाईने करीत आहेत लवकरच आरोपी जाळ्यात सापडतील यात काही शंका नाही 


प्रतिक्रिया 
रामपूर (कढोली) जवळील वैनगंगा नदीच्या पात्रात सुंदर झाडे याचा पुरून ठेवलेला मृत्तदेह आढळून आला आहे. त्याचा मृत्यू विद्युत करंट लागुन झाला आहे असे दिसून येते  पण करंट कसा लागला व त्याला वैनगंगा नदीच्या पात्रात कुणी पुरले यात शंका निर्माण झाली आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला हे कळेल तोपर्यंत आपल्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.----पोलिस निरीक्षक कुंदन गावडे पोलिस स्टेशन आष्टी.


PostImage

Rushi Sahare

Nov. 30, 2023

PostImage

Gadchiroli News - महाज्योती': युपीएससी-एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह... प्रशिक्षण पूर्व परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळाले उत्तुंग यश


गडचिरोली, : बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. गरजू आणि योग्य विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याच्या अनुषंगाने संस्था युपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणाची पूर्व परिक्षा घेण्यात येते. २०२३ साली यूपीएससी (इंग्रजी-मराठी), एमपीएससीकरिता घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचा निकाल आज महाज्योतीतर्फे जाहिर करण्यात आले असून यात विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादित केले आहे, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रा. खवले यांनी दिली. राजेश खवले यांनी सांगितले की, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एमपीएससीचे १०००, एमपीएससी संयुक्त गट 'ब' व 'क' चे १०००, युपीएससी (इंग्रजी) १००० तर युपीएससी (मराठी) ७५० यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्याथ्यांना दिल्ली, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण निहाय आकस्मिक निधी आणि विद्यावेतन देखील दिले जाणार असल्याचेही राजेश खवले यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट 'ब' व 'क', संघ लोकसेवा आयोग इंग्रजी व मराठी माध्यम या परीक्षा प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा २५, २६, २७, २८, २९ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गृप बी व गृप सी चाळणी परीक्षेचा निकाल २५ नोव्हेंबर २०२३ जाहीर करण्यात आला आहे. तसेच २७ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. तसेच २८ नोव्हेंबर २०२३ ला संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) इंग्रजी व मराठी माध्यम चाळणी परीक्षेचा निकाल संस्थेद्वारे जाहीर करण्यात आल्याचेही राजेश खवले यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणचा लाभ घ्यावा

महाज्योतीच्या या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची

तयारी करणे सुलभ होणार आहे. स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाकरिता निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा परिपूर्ण लाभ घ्यावा व प्रशिक्षण वर्गामध्ये १०० टक्के उपस्थिती दर्शवून आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे माननीय मंत्री अतुलजी सावे तसेच महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची योजना निहाय माहिती तसेच परीक्षेचे नाव विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे आहे- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) -१०००, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट 'ब' व 'क' परीक्षा पूर्व प्रशिक्षण - १०००, संघ लोकसेवा आयोग (UPSC) इंग्रजी-१०००, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मराठी -७५०.

प्रशिक्षण निहाय खालील प्रमाणे आकस्मिक निधी आणि विद्यावेतन पुढीलप्रमाणे आहे- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) -१२ हजार रुपये १० हजार रुपए, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट 'ब' व 'क' परीक्षा पूर्व प्रशिक्षण- १२ हजार रुपये -१० हजार रुपए, संघ लोकसेवा आयोग (UPSC) इंग्रजी-१८ हजार रुपये १३ हजार रुपए, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मराठी -१२ हजार रुपये १० हजार रुपए.


PostImage

Rushi Sahare

Nov. 30, 2023

PostImage

Gadchiroli News - मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्काची रक्कम मिळणार परत


गडचिरोली,  दि. २९: जिल्हा परिषदेच्या गट- क मधील १८ संवर्गातील माहे मार्च २०१९ मधील जाहिरात व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट २०२१ मधील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात व संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाच्या दि. २१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली असुन जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहे.

त्यानुसार उपरोक्त परिक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि. ०५ सप्टेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद, गडचिरोलीचे www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर जाहिर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 30, 2023

PostImage

Gadchiroli News - अनियंत्रित सूरजागड चा ट्रक घुसला हिरो शो रूम मध्ये


चामोर्शीतील सुप्रसिद्ध असलेल्या शारदा हिरो शोरूम व त्याच्याच बाजुला लागून असलेले वशिम अली सैय्यद याच्या घरामध्ये लोहखनिज वाहतूक करणारां ट्रक CG 08 AW 2329 घुसले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार हा अपघात बुधवारच्या रात्र १.३० च्या सुमारास आष्टी टी पॉईंट इथून 100 मीटर अंतरावर असलेले आष्टी रोडला शारदा हिरो शोरूम आहे. याबाबत चामोर्शी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना विचारले असता CG 08 AW 2329 क्रमांकाचा सुरजागड लोहखनिज वाहतुकी करिता मुलमार्गा वरून चामोर्शीतील आष्टी टी पॉईंट वळणावरून सुरजागडला जात असतांना लोहखनिज ट्रक भरधाव वेगाने असल्यामुळे चालक नामे आशिफ खान यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सीधे शारदा हिरो शोरूम च्या लोखंडी अँगल, लोखंडी शिड्या आणि वशिम अली सैय्यद यांच्या घराची भिंत फोडून अंदर घुसले.
मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी किंवा इजा झाले नाही. मात्र शारदा हिरो शोरूम ची आणी वशिम अली सैय्यद यांची खूप मोठी नुकसान झाली आहे. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुशांत बेपरी आणि वशिम अली सैय्यद यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून ट्रक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला. अशी माहिती चामोर्शीचे निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
आतापर्यंत लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक मनुष्याना तर उडवत होतेच, आता शोरुम/ घर सुद्धा उडवायाला लागले.
तर गडचिरोली जिल्ह्यातील जनता या भीतीमुळे जगायचे तरी कसे असा प्रश्न जनतेच्या चर्चेत आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 29, 2023

PostImage

Gadchiroli News - जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ डिसेंबरला उलगुलान महामोर्चा... हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा - प्रागतिक पक्षांचे आवाहन


गडचिरोली : विकासाच्या नावावर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो एकरवरील जंगलतोड करुन पाचव्या अनुसूची क्षेत्रातील विशेष तरतुदी आणि कायदे, नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या वतीने उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात जिल्ह्यातील आदिवासींसह गैरआदिवासी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रागतिक पक्षांनी केले आहे.

गैरआदिवासी, ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाला आदिवासी समाजाने कधीच विरोध केलेला नसतांना भाजपने पेसा कायदा विरोधी वातावरण जिल्ह्यात  निर्माण करुन वेळोवेळी समाजात तेढ निर्माण केली आणि बेकायदेशीर खाणींचे रोजगाराच्या नावावर समर्थन करुन जिल्ह्याला उध्दवस्त करण्याचे षडयंत्र रचले असून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या खांद्याला खांदा लावून दलित, ओबीसी, भटके विमुक्त आणि जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसभा मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या महामोर्चाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाॅलिट ब्युरो सदस्य काॅ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव काॅ. डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव काॅ. ॲड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरिषदादा उईके हे करणार आहेत. आमदार शामसुंदर शिंदे, आमदार काॅ. विनोद निकोले, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार यांचेसह जनता दल (सेक्युलर) चे नाथाभाऊ शेवाळे, शामदादा गायकवाड, भाकपा ( माले) लिबरेशन पार्टीचे काॅ. श्याम गोहील, श्रमिक मुक्ती दलाचे काॅ. भारत पाटणकर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. किशोर ढमाले हे प्रामुख्याने या महामोर्चात सहभागी होणार आहेत.

 *या आहेत महामोर्चाच्या प्रमुख मागण्या* 
पेसा, वनाधिकार कायद्यांचा उल्लंघन करून बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या सुरजागड, झेंडेपारसह मंजूर व प्रस्तावित लोहखाणी तात्काळ रद्द करा. पाचव्या अनुसूची क्षेत्रातील ग्रामसभांचे स्वयंशासनाचे अधिकार डावलणे बंद करण्यात यावे.  बेकायदेशीर लोहखाणी खोदण्याकरिता विरोध करणाऱ्या ग्रामसभांच्या नागरिकांना नक्षल समर्थक भावनेने कारवाई करणे बंद करण्यात यावी.  मच्छीमार समाजाला नदी, नाले, तलावांची मालकी हक्क देण्यात यावे.  जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९% करा.  आदिवासींची डी लिस्टिंग करण्यात येऊ नये.  धानाला रुपये ३,५००/- हमीभाव देण्यात यावा. प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करण्यात यावेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने करीता जात प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी.  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना किमान वेतन लागू करावे.  हत्ती व वाघांच्या हल्ल्यात बळी पडून मृत्यू झालेल्यांना आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई रक्कम तातडीने देण्यात यावी. व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा. भेंडाळा परिसरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आणि बारमाही वीजपुरवठा करण्यात यावा. गडचिरोली शहरातील सर्व झोपडपट्टी कायम करुन  जागेचे प्राॅपर्टी कार्ड आणि घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे,  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईलियास पठाण, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, तितिक्षा डोईजड,भाई अक्षय कोसनकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, हेमंत डोर्लीकर, भाकपचे संजय वाकडे, प्रकाश खोब्रागडे, प्रतीक डांगे, विजय देवतळे, कैलास रामटेके, सतिश दुर्गमवार,  प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 29, 2023

PostImage

Gadchiroli News - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे संविधान दिन


गडचिरोली, : आपल्या भारत देशात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा केला

जातो. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने सद्याची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र "संविधान दिन" साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातीच्या लोकांना एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत. या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधीमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. शिवाय, याच संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मुल्यांकन आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मुळ उद्देश आहे.

संविधान दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील प्रांगणात प्रास्ताविकेचे वाचनाचा कार्यक्रमाचे आयोजन आर. आर. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे वतिने सकाळी 10.30 वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून यु. एम. मुधोळकर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवाप्राधिकरण, गडचिरोली तसेच कार्यक्रमास उपस्थित एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधिश (व. स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली, सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, आर. आर. खामतकर, व्दितीय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, श्रीमती एन. सी. सोरते, तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, श्रीमती एन. ए. पठाण, अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली,

संविधान दिनानिमित्त आयोजित प्रास्ताविकेचे वाचनाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी उपस्थितांना संविधानाने आपल्याला काही मुलभूत अधिकार दिलेले आहेत तसेच आपल्याला कर्तव्ये सुध्दा दिलेली आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या एकुण ११ कर्तव्यांची संपूर्ण माहिती यावेळी उपस्थितांना दिली आणि उपस्थितांना

आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक असतो त्याचप्रमाणे संविधानाने नेमूण दिलेल्या कर्तव्यांचे सुध्दा आपण काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन केले. त्यानंतर श्रीमती एन. सी. सोरते, तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यांच्या पाठोपाठ उपस्थितांनी प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाकरीता जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील कर्मचारी वृंद तसेच परिक्षार्थी, विधी स्वयंसेवक / स्वयंसेविका, लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक एस. एस. भट, वाय. एन. चेके, कु. एस. के. मेश्राम सहाय्यक लोक अभिरक्षक, लोक अभिरक्षक कार्यालय, गडचिरोली असे बहुसंख्येने उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे वाचनाचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे पी. व्ही. संतोषवार, अधिक्षक, एन. आर. भलमे, वरीष्ठ लिपीक, एम. डी. गुरनूले, एस. एन.आळे, एस.के. चुधरी, जे. एम. भोयर, एच. एम. गायमुखे, कनिष्ठ लिपीक, निखील बुरांडे, लेखापाल, श्रीमती शितल शेबे, रिसेप्शनिष्ट कम डाटा एन्ट्री ऑपरेटर, एस. डब्ल्यु. वासेकर, सागर नंदावार, शिपाई श्रीमती शिल्पा धोंगडे, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले. असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 29, 2023

PostImage

Gadchiroli News - ट्रक ने मोटारसायकल ला चिरडले... दोन जागीच ठार तर एक गंभीर


कबड्डी स्पर्धेत जिंकण्याच्या इराद्याने सहभागी झालेल्या दोन खेळाडूंना आयुष्याचा सामना हारण्याची दुर्दैवी वेळ आली. स्पर्धेत सहभागी होऊन गावी परतताना वाटेत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली.

यात दोघे जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील पुराडा कोरची मार्गावर डोंगरगाव फाट्यानजीक २८ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता घडली.

आकाश शामशाय नरोटी (वय २३) व नकुल ऐनीसिंग नरोटी (वय २२ दोघेही रा. बेलगाव घाट ता. कोरची) अशी मयतांची नावे असून विक्की फत्तेलाल तोफा (वय २३ रा बेलगाव घाट) हा जखमी आहे. कुरखेडा तालुक्यातील रानवाही येथे नवयूवक श्रीगणेश क्रीडा मंडळातर्फे तीन दिवसांपासून कबड्डी स्पर्धा सरु आहेत. यात ९० पेक्षा अधिक संघसहभागी आहेत. या स्पर्धेत बेलगावचा संघही सहभागी आहे. २८ नोव्हेंबरला बेलगावचा संघ रानवाहीला गेला. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार २८ रोजी बेलगाव संघाचा सामना नव्हता, त्यामुळे आकाश नरोटी, नुकल नरोटी व विक्की तोफा हे गावी परतण्यासाठी दुचाकीवरुन ट्रिपलसीट निघाले तर उर्वरित खेळाडू रानवाहीला चमुक्कामी राहिले. दरम्यान, डोंगरगाव फाट्याजवळ एका दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. यानंतर दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. चालक ट्रकसह सुसाट निघून गेला. पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाश नरोटी व नकुल नरोटी हे जागीच गतप्राण झाले. जखमी विक्की तोफा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गाव शोकमग्न, खेळाडूंना अश्रू अनावर

दरम्यान, मयत आकाश नरोटी व नुकल नरोटी या दोघांची परिस्थिती हालाखीची होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दुर्गम भागात राहून कबड्डीचे कौशल्य अवगत केले होते. परिसरातील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. त्यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली असून कुटुंब शोकमग्न झाले. संघातील सहकारी खेळाडूंनाही अश्रू अनावर झाले होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 27, 2023

PostImage

Gadchiroli News - जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणींमुळेच वन्यप्राण्यांचे हल्ले... भाई रामदास जराते यांचा आरोप


गडचिरोली : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक नागरिकांवर वाघ आणि हत्ती यांचे हल्ले होवून जीव गमवावे लागले असून या परिस्थितीला जिल्ह्यात होत असलेल्या बेकायदेशीर लोह खाणी जबाबदार आहेत, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केला आहे.

गडचिरोली तालुक्यातील मौजा  हिरापूर येथे वाघाने आणि मौजा मरेगाव येथील तरुणाला हत्तीने आपटून मारल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी पत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा वाघ, बिबट, हत्ती, रानगवा यासारख्या शेड्युलमधील वन्यजीवांचे शेकडो वर्षांपासूनचे अधिवास होते. मात्र मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्हा आता गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खाणींसाठी जंगलतोड करण्यात आल्याने जंगलातील वन्यप्राण्यांचे पारंपारिक अधिवास नष्ट होत आले. त्यामुळे शहराजवळील क्षेत्रात वाघ, बिबट, हत्ती या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यातही शेतीकरीता प्रचंड प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली असल्याने प्राणी अधिक हिंस्त्र झाले असून माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. असेही भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करायचा असेल तर आधी बेकायदेशीर मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी तातडीने रद्द करण्यात येवून वन्यजीव संवर्धन कार्यक्रम शासनाने हाती घ्यावे, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई रामदास जराते यांनी प्रशासनाला केली आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 26, 2023

PostImage

Gadchiroli News - भर रस्त्यावर तलवारीने केक कापणा­ऱ्या तरुणांना पोलीसांनी केले जेरबंद 


आरमोरी -    पोलीस अधीक्षक  नीलोत्पल  यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षीततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. गडचिरोली पोलीस दलाकडुन आरमोरी शहरातील रामाळा जाणा­या मार्गावर काल दि. 25-11-2023 रोजी चे 23. 30 ते 26-11-2023 चे 00. 30 वा  दरम्यान काही तरुण एकत्र येवुन गोंधळ/आरडा ओरड करत असतांना दिसुन आल्याने त्याच्या जवळ जावुन चौकशी केली असता गाडीच्या सीट वर केक ठेवुन केक अवैधरित्या तलवार बाळगुन केक कापत असतांना तसेच गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन आणन्याचे उद्दंेशाने तलवार सहित मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही मध्ये 1) एक धार धार टोकदार तलवार अंदाचे किंमत 1500/- रुपये, 2) एक जुनी वापरती पांढ­या रंगाची अॅक्टीवा 6जी गाडी नंबर एम. एच. 33 ए.ए. 1340 अंदाजे किंमत 55000/-रु., 3) एक जुनी वापरती काळया रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्र एम.एच 33 वाय 7854 अंदाजे किंमत 40,000/- मोटार सायकल असा एकुण अंदाजे 96,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) लोकेश  विनोद बोटकावार वय 21 वर्ष, 2) लोकमित्र खुशाल ठाकरे वय 25 वर्ष, 3) बादल राजेंद्र भोयर वय 23 वर्ष, 4) पवन मनोहर ठाकरे, वय 25 वर्षे व फरार आरोपी नामे राहुल मनोहर नागापुरे वय 28 वर्षे सर्व रा. बाजारटोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली वरील नमुद आरोपीतांच्या विरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फरार आरोपीचे शोध घेणे सुरु असुन गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठंाचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील परि.पोउपनि संतोष कडाळे हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही  पोस्टे आरमोरी  प्रभारी अधिकारी पोनि. संदिप मंडलीक व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.


PostImage

Rushi Sahare

Nov. 26, 2023

PostImage

Gadchiroli News - रानटी हत्तीने युवकास चिरडून केले ठार


गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील युवकास हत्तीने हल्ला करून चिरडल्याने युवकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मरेगाव परिसरातील शेतातील धानपिक सध्याच्या घडीला कापणीला आले आहे आणि जिल्ह्यामध्ये धान्य कापणी व मळणीचे काम  जोरात चालू आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये राहत आहे. काही शेतकऱ्यांचे शेत जंगलालगत असल्याने त्यांना शेतामध्ये शेतीची कामे करण्यासाठी मोठे हिमतीने राहावे लागते. मात्र जंगलामध्ये रानटी हत्तीचा खूप दिवसापासून धुमाकूळ चालू आहे .यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी हत्तींच्या भीतीमुळे शेतातील कामे काही प्रमाणात खोडबल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीही काही शेतकरी शेतातील कामे मोठ्या हिमतीने करत असतात परंतु त्यातही हत्तींची भीती तर दुसरीकडे वाघाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे.

अशातच मरेगाव येथील युवकाला  रानटी हत्तीने चीरडून ठार केले. यामुळे परिसरात जंगली हत्तीचे मोठ्या प्रमाणात दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. चार ते पाच दिवसापासून मरेगाव परिसरात व डार्लि परिसरात हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचे नुकसान केले होते . वणविभागाने  या हत्तींना पिटाळून लावण्याकरिता ठोस उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे व जीवित हानी  थांबविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी . असे परिसरातील तथा सामान्य वर्गातून बोलल्या जात आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 25, 2023

PostImage

Gadchiroli Armori News : अज्ञात वाहनाने अज्ञात इसमास चिरडले


आरमोरी - आज दिनांक 25.11.2023 रोजी चे पहाटे 3.45 ते 4.00 वा. दरम्यान एका अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवुन आरमोरी शहरातील ताडुरवार चौकातील पंचायत समीती समोर एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमास धडक देवुन त्याचे शरीरावर आपले ताब्यातील वाहन चढवुन अनोळखी इसमाच्या डोक्याचा व डाव्या हाताचा जबर दुखापत करुन त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला तसेच अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन घेवुन घटनास्थळावरुन पळुन गेला. सदर प्रकरणात नंतर पोलीस स्टेशन आरमोरी यथील गु. रजि. क्र. 395/2023 कलम 279, 304 (अ) भा.द.वी. सहकलम 184, 134 मोवाका प्रमाणे गुन्हा नोंद केला असुन गुन्ह्याचा तपास पो.नि. संदिप मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा विशाल केदार हे करीत असुन गुन्ह्यातील अज्ञात वाहन चालकाचा शोध घेणे सुरु आहे तसेच सदर प्रकरणातील अनोळखी मृतकाची अद्याप ओळख पटलेली नसुन चेहरा ओळख पटन्याच्या स्थितीत नसुन शवविच्छेदनानंतर त्याचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील फ्रिजरमध्ये सुरक्षीत ठेवलेली आहे. सदर मृतदेहाचे वर्णन अंदाजे वय 50 ते 55 वर्ष, उंची 05 फुट, रंग- सावळा, पोषाकाचे वर्णन काळ्या रंगाचा नाईट पँट, निळ्या रंगाची हॉप टि-शर्ट, काळ्या रंगाचा जॉकेट अशा प्रकारे अनोळखी मृतकाचे वर्णन व पोषाक असुन सदर वर्णानाचा व पोषाकाचा इसमाबाबत कुठलीही माहीती मिळुन आल्यास पोलीस स्टेशन आरमोरी येथील टेलीफोन क्र. 07137295538, मो.क्र. 7588108971 या क्रमाकावर संपर्क साधावा.


PostImage

Rushi Sahare

Nov. 25, 2023

PostImage

Gadchiroli News - आमदार गजबे होणार आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित... मुंबईच्या सरपंच परिषदेचा पुढाकार


देसाईगंज-

     राज्यातील पाच आदर्श असलेले लोकप्रतिनिधी आमदार,प्रशासकीय सेवेत असलेले पाच उत्तम प्रशासक, लोकनियुक्त दहा सरपंच, पाच ग्रामसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पाच सामाजिक कार्यकर्ते यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतिने ३ डिसेंबर २०२३ रोजी यशदा पुणे येथे यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.यात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचाही समावेश करण्यात आला असल्याने मित्र परिवार, कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.
    उपरोक्त पुरस्कार जनतेचे हित जपण्यासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेऊन देण्यात येत असल्याने व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आमदार कृष्णा गजबे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेऊन देण्यात येत असल्याने सर्वच स्तरातून आमदार गजबेंवर अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.आमदार गजबे यांना यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून यासाठी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी आमदार गजबे यांनी होऊ घातलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्या संदर्भात पत्राद्वारे कळवले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - गडचिरोलीत उद्योगांसाठी ५ हजार हेक्टर जमीन नव्याने संपादीत करणार उद्योगमंत्री उदय सामंत


 म.औ.वि.म., उद्योग विभागजिल्हयात येणा-या नियोजित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक

गडचिरोली,- दावोस येथील औद्योगिक परिषदेमध्ये राज्य शासनाच्या वतीने विविध उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या कराराची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तसेच गडचिरोलीमध्ये अनेक मोठे उद्योग येण्यास उत्सुक असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार हेक्टर जमीन संपादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग विभाग, तसेच जिल्ह्यात येणा-या नियोजित प्रकल्पांबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य अधिकारी विपीन शर्मा, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिणा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील, म.ओ.वि.म. चे सहाय्यक मुख्य अधिकारी विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  राठोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दिवाळीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्यात येऊन गेले. त्यांच्या सुचनेवरून येथील उद्योगांचा आढावा घेण्यासाठी आज येथे आलो आहे, असे सांगून उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, लॉयड्स मेटल आणि वरद फेरो या दोन कंपन्या जवळपास २२ हजार कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात करीत आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांना संमतीपत्र देण्यात आले असून दोन दिवसांत अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल. नवीन उद्योगांसाठी चामोर्शी तालुक्यात १ हजार ते २ हजार हेक्टर जमीन, मुलचेरा येथे ५०० ते १००० हेक्टर जमीन, आरमोरी क्षेत्रात ५०० ते १००० हेक्टर, सिरोंचा येथे ५०० हेक्टर व इतर ठिकाणी अशी एकूण जवळपास ५ हजार हेक्टर शासकीय जमीन संपादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे सामंत म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात अंबुजा सिमेंट, जे.एस.डब्ल्यू व इतर कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. उद्योगांच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये नक्कीच येईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत स्कील सेंटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. आगामी काळात उद्योजकांची परिषद गडचिरोलीमध्ये घेण्याचे नियोजन उद्योग विभाग करीत आहे. येथे येणा-या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत, तसेच वनाच्छादित असलेल्या या जिल्ह्यात पर्यावरणाच्या उपाययोजना करूनच उद्योग उभारण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी दिला.

गडचिरोली येथे उद्योग भवन: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योगासंबंधित कार्यालये एकाच ठिकाणी असण्यासाठी गडचिरोली येथे १४ कोटी रुपये खर्च करून उद्योग भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भात वर्धा आणि अकोला येथेसुध्दा उद्योग भवन उभारण्यात येईल.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत अनेक तरुण तरुणींचे १ ते २ लाख रुपयांपर्यंतची कर्जाची प्रकरणे सादर होत असतात. मात्र राष्ट्रीयकृत बँकाद्वारे सदर प्रकरणे नाकारण्याचे प्रमाण ७० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. मोठ्या उद्योगांना कर्ज द्यायचे आणि छोटी-छोटी प्रकरणे नाकारायची, ही अतिशय गंभीर बाब आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर अतिशय कमी रकमेची प्रकरणे असतात, त्यामुळे अशी प्रकरणे त्वरीत मंजूर करावी. याबाबत जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देऊन याबाबत दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा.

पी.एम. विश्वकर्मा योजना: समाजातील १२ बलुतेदारांसाठी राबविण्यात येणारी पी.एम. विश्वकर्मा योजना हा सुध्दा एक उद्योगच आहे. मिशन गडचिरोली अंतर्गत पी.एम. विश्वकर्मा योजना जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा. या योजनेंतर्गत १ लक्ष रुपये देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घराघरापर्यंत पोहचावे. या योजनेमध्ये गावातील सरपंच केंद्रबिंदू असल्यामुळे सरपंच, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांचे प्रशिक्षण घ्यावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी गडचिरोली येथील ग्रीनफिल्ड विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय, वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग, कोनसरी स्टील प्लॉट, सुरजागड प्रकल्प, भुसंपादनाची परिस्थीती आदी बाबत सादरीकरण केले.


PostImage

Rushi Sahare

Nov. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - लोह खाणींविरोधातील आंदोलन चिरडून टाकणे थांबवा... प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीची मागणी 


गडचिरोली : विकासाच्या नावाने लोह खाणी खोदण्यासाठी जिल्ह्यात ग्रामसभा आणि  स्थानिक नागरिकांवर बळाचा वापर करुन वारंवार दडपशाही करुन  ग्रामसभांचे ठराव, निवेदन, मोर्चे, आंदोलनांची दखल न घेता मुस्कटदाबी केली जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी पेसा कायद्याने ग्रामसभांना स्वयंशासनाचे अधिकार दिलेले असल्याने जिल्ह्यातील खाणींविरोधातील आंदोलन, मोर्चे पोलीस कारवाई करुन दडपून टाकणे बंद करण्यात यावे, अशी मागणी प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

मागिल २५० दिवसांपासून तोडगट्टा येथे सुरु असलेले खदान विरोधी आंदोलन नुकताच जिल्हा प्रशासनाने बळाचा वापर करुन उधळून लावला आहे. यापूर्वीही एट्टापल्ली येथे सुरु असलेले आंदोलन बळाचा वापर करुन उधळून लावले होते. इतर पक्ष, संघटनांचे मोर्चे, आंदोलन, कार्यकम जिल्ह्यात व्यवस्थीत पार पडत असतांना केवळ लोह खाणींच्या विरोधात होणारे मोर्चे, आंदोलन, कार्यकमांनाच जिल्हा प्रशासन नेहमी टार्गेट करुन, व्देषभावनेने पोलीस बळाच्या जोरावर दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. ही निषेधार्ह बाब असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

शांततेच्या मार्गाने संविधानिक हक्कांसाठी आंदोलन, मोर्चे करण्याचा अधिकार आदिवासी जनता, ग्रामसभा आणि त्यांची बाजू घेणारे नेते, कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटनांना नाही काय? असा प्रश्न करुन, गडचिरोली जिल्हा मुख्यालयी खदानविरोधी बेमुदत धरणे आंदोलन करण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी. ग्रामसभा आणि पारंपारिक इलाखे, राजकीय पक्ष, संघटना यांनी वेळोवेळी ठराव, निवेदन, आंदोलन, मोर्चे केल्याबद्दल व्देषभावनेने लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. लोह खाणी रद्द करुन एफसेझ म्हणजेच फाॅरेस्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्यात येवून जंगलांवर आधारित उद्योगांच्या माध्यमातून रोजगार देण्यात यावा. लोह खाणींना विरोध करणाऱ्यांना नक्षलसमर्थक भावनेने पोलीस कारवाई करणे बंद करण्यात यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. डॉ.महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, आदिवासी विकास युवा परिषदेचे कुणाल कोवे, विनोद मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा, जयश्री वेळदा, बाजीराव उसेंडी, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपूरे, राजन बोरकर, कोत्तुराम पोटावी, सावजी उसेंडी, दशरत पोटावी, प्रल्हाद रायपूरे, सचिन मोतकुरवार, सुरज जक्कुलवार, मंगेश होळी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - सुरजागड लोह खानीचे समर्थन करण्याचा आरोपावरून नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या


गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोह खाणीचे समर्थन केल्याचा आरोप करुन नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. २३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली. दरम्यान, घटनेनंतर नक्षल्यांनी तेथे पत्रक टाकले असून त्यात गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत.

लालसू वेलदा (६३, रा. टिटोळा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे. हेडरी पोलिस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात हा थरार घडला. गाव पाटील लालसू वेलदा हे स्वतःच्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले.  लालसू यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासमोरच हा थरार घडला. दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे.

हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यात सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा माओवादी गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

खाण समर्थकांना टोकाचा इशारा

आदिवासी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत.
दरम्यान, हत्या झालेले लालसू वेलदा यांचा मुलगा पोलिस दलात कार्यरत आहे. जांभिया गावात अलीकडेच मोबाइल टॉवर उभारले असून ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. गावातील तरुणांना सुरजागड लोह खाणीत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन लालसू वेलदा यांनी अनेकांना खाणीच्या समर्थनार्थ वळवले होते. त्यामुळे त्यांना नक्षल्यांनी निशाणा बनविले, पत्रकात नक्षल्यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.

"एटापल्लीच्या हेडरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाव पाटलाच्या हत्येची घटना घडली आहे. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत, योग्य तो तपास करण्यात येईल!"


PostImage

Rushi Sahare

Nov. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - न्युमोनिया जनजागृतीसाठी जिल्हात राबविण्यात येणार साँस मोहिम


गडचिरोली, :० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांमधील न्युमोनिया प्रतिबंध बचाव व उपाययोजना करण्यासाठी सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करण्याकरीता राज्यात सॉस हि मोहिम दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यत राबविण्यात येणार आहे. न्युमोनिया हा आजार फुफुसांना तीव्र स्वरूपात होणारा तसेच नेहमी दिसून येणारा सर्व सामान्य संसर्ग आहे. हा संसर्ग झालेल्या बालकांना खोकला येणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, छाती आत ओढणे, ताप येणे अशी लक्षणे असतात. न्युमोनिया आजाराची लक्षणे ओळखून तात्काळ उपचार घेतल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो. सध्या भारतात दर वर्षी न्युमोनिया मुळे मोठ्या प्रमाणात बाल मृत्यु होत असतात त्यांचे प्रमाण 2025 पर्यत 3 पेक्षा कमी करावयाचे आहे. सदर मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, आयुषी सिंह यांचे हस्ते महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आला. बालमृत्यु होण्याकरीता न्युमोनिया हे प्रमुख कारण असल्यामुळे बालमृत्य टाळण्याकरीता सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली डॉ. दावल साळवे, यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शनामध्ये न्युमोनिया आजार टाळण्यासाठी लहान बालकांना 6 महिने निव्वळ स्तनपान करावे. व आपल्या बाळाचे ठराविक वयोगटात (पहिला डोज 6 आठवडे दुसरा 14 आठवडे, बुस्टर डोज 9 व्या महिन्यात ) न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन घेतले आहे काय याची खात्री करावी. बाळाचे आरोग्य केंद्रात जाऊन संपुर्ण लसीकरण करून घ्यावे. सदर मोहीमेत आशा घरोघरी जाऊन समुपदेशन करणार आहे, त्यावेळी त्या "न्युमोनिया नाही तर बालपन सही" या घोष वाक्याचा वापर करणारं आहे. तर सर्व नागरिकांनी न्युमोनिया आजाराचा प्रतिबंध करुन वेळेत उपचार करावा व न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दुर करुन न्युमोनिया प्रतिबंधाकरिता आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

सदर मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी. वैद्यकिय अधिकक्ष, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, डॉ. माधुरी किलनाके, निवासी बाहयरुग्ण वैद्यकिय अधिकारी, डॉ. बागराज धुर्वे, बालरोग तज्ञ, डॉ. प्रशांत पेंदाम, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ. रूपेश पेंदाम, तालूका आरोग्य अधिकारी, तालुका गडचिरोली, अमित साळवे, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी तसेच गडचिरोली शहरी विभागातील आशा कार्यकर्त्या व लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद सोनकुसरे, आ. सहा यांनी केले व आभार प्रदर्शन माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके यांनी केले.


PostImage

Rushi Sahare

Nov. 23, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धा संपन्न



व्हॅलीबाल स्पर्धेत  जोगीसाखरा तर कबड्डी स्पर्धेत आरमोरी प्रथम


आरमोरी- गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून पोलीस स्टेशन आरमोरीचे वतीने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात भव्य बिरसा मुंडा व्हॉलीबॉल व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटक डोंगरतमाशीचे पोलीस पाटील गणेश वनवे होते तर अध्यक्षस्थानी आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक ,प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार टेकाम, पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख, पोलीस उपनिरीक्षक  संतोष कडाळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुंनघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्यांचे लाल फीत काटून उदघाटन करण्यात आले.
 उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक म्हणाले की, पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा तसेच  मैदानी'खेळाच्या माध्यमातून संघ भावना वाढते एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. बंधूभाव वाढतो. त्याप्रमाणे सर्वाधिक नेतृत्व गुण खेळाच्या व स्पर्धेच्या माध्यमातून विकसित होतअसतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर खेळ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे खेळाडूंमध्ये खेळांच्या माध्यमातून, स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांविषयी आदर भावना तयार होते, बंधुभाव तयार होतो व नेतृत्वगुणही वाढीस लागत असतात.  खेळ हे मानवाला तनावातून मुक्त करण्याचे काम करत असतात, असेही मंडलिक म्हणाले
    दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व्हालीबाल व कबड्डी सामने खेळविण्यात आले. यात व्हॉलीबॉल च्या आठ तर कबड्डीच्या १२  संघांनी तालुक्यातून सहभाग नोंदविला होता व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज जोगीसाखरा, द्वितीय प्रगती स्पोर्ट्स क्लब मोहझरी तर तृतीय क्रमांक एस.टी बाईज होस्टेल आरमोरी यांनी पटकाविला तर कबड्डी सामन्यात प्रथम क्रमांक शौर्य क्लब आरमोरी  , द्वितीय पार्क कबड्डी क्लब सायगाव तर तृतीय शिवशक्ती कबड्डी क्लब पालोरा  संघाने क्रमांक पटकाविला. प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या व्हॅलीबाल व कबड्डी संघाला प्रत्येकी ३०००,२०००व १०००  रुपयांचे पारितोषिक पोलीस निरीक्षक व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 कार्यक्रमाचे संचालन व आभार पो.हवा. अशोक ठाकरे  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


PostImage

Rushi Sahare

Nov. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - बेकायदेशीर लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार .. प्रागतिक पक्ष आघाडीच्या जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय...


गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ असून पेसा,वनाधिकार कायदे लागू असतांना बेकायदेशीरपणे विविध ठिकाणी लोह खाणी स्थानिक ग्रामसभा आणि जनतेच्या विरोधानंतरही बळजबरीने मंजुर व प्रस्तावित करण्यात येवून त्या खोदण्यात येत आहेत. याविरोधात ग्रामसभांची भूमिका प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या आघाडीतील आमदारांनी येत्या हिवाळी अधिवेशनात लावून धरुन  आवाज बुलंद करावा,असा निर्णय जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

स्थानिक पत्रकार भवन येथे प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या गडचिरोली जिल्हा समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्रीताई वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, प्रतिक डांगे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील डावे, पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि पारंपारिक इलाखे व ग्रामसभा एकत्र येवून  मागील अनेक वर्षांपासून खदान विरोधी आंदोलन चालविण्यात येत आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी काही भांडवलदार प्रेरीत लोकांनी या आंदोलनात फुट पाडून आपला स्वार्थ साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. यातूनच वेळोवेळी आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. याबाबत प्रस्थापित काॅग्रेस, भाजप, सेना, राष्ट्रवादी यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे वनहक्क, पेसा, रोजगार हमी योजना लागू करण्यास सरकारला बाध्य करणारे प्रागतिक पक्ष, यांच्यासह ग्रामसभांनी एकत्र येवून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेकायदेशीर लोह खाणी, पेसा क्षेत्रातील नोकर भरती, नदी,नाले, तलावांर मच्छीमार समाजाची मालकी अशा विविध प्रश्नांवर पाठपुरावा करावा.  प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळात याबाबत आवाज बुलंद करुन जनतेला न्याय द्यावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

तसेच तोडगट्टा आंदोलनाबाबत प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या वतीने जिल्हाप्रशासनाशी निवेदन देवून चर्चा करावी असेही ठरविण्यात आले.

या बैठकीला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र रायपूरे, माजी जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, पत्रकार हेमंत डोर्लीकर, शेकापचे डॉ. गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, तितिक्षा डोईजड, विजया मेश्राम, रेश्मा रामटेके, ग्रामसभेचे नितीन पदा, कोत्तुराम पोटावी, बाजीराव उसेंडी, प्रशांत गोटा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 20, 2023

PostImage

Gadchiroli News - एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता इयत्ता ६ वी ते ९ वी च्या वर्गामध्ये अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन


गडचिरोली,  दि. २० : प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, जि. गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी/मुलचेरा/सिरोंचा हे तीन तालुके येत असुन सदर तालुक्यातील इयत्ता ६ वी, ७ वी, ८ वी, ९ वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्या करीता एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यात अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी व शासकीय / अनुदानित/ आदिवासी मुला/मुलींचे वसतीगृह येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन दिनांक ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सादर करावे. इयत्ता ६ वी ९ वी प्रवेश मिळण्याकरीता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छीत विद्यार्थी अनुसुचित जमाती/आदिम जमातीचा असावा. पालकांचे सक्षम अधिका-याने दिलेले अनुसुचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न ६ लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्या संबंधाचा दाखला जोडावा. शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता ५ वी तसेच ६ वी ते ८ वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन करण्यात येईल. व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणत्याही वेळी रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परीस्थितीत पालकांच्या व पाल्यांचा विनंती नूसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकांनी हमी पत्र सादर करावे. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि. गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 18, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या विस्तारासाठी नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून बोलेरो गाडी भेट


आरमोरी तालुक्यातील गावापातळीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करणे, बूथ समिती स्थापन करणे यासाठी पार्टी पदाधिकारी यांना तालुक्याचा दौरा करणे सुलभ व्हावे यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी  बोलेरो गाडी भेट दिली.

       दिनांक १५ नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम आरमोरी येथे आले असता  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार यांच्याकडे बोलेरो गाडीची चावी सुपूर्द केली.

        याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश संघटन सचिव  मोहम्मद युनूस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर, आरमोरी शहर कार्यकारी अध्यक्ष प्रदीप हजारे, धुरंधर सातपुते, दीपक बैस, तालुका सरचिटणीस देवानंद बोरकर, अनिल अलबनकर, तालुका उपाध्यक्ष योगेश थोराक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, रवि दुमाने,अनुज घोसे, आशुतोष भरणे, तुषार हलामी, सुमित वाडीकर, प्रथमेश कोडापे, वैभव सेलोकर, अंकुल मानकर, अमित जुआरे, तेजस नवघरे, फाल्गुन म्हैसकर, पवण कुकडकार, कुणाल उपथडे, संघर्ष रामटेके, वैभव धदंरे, अमर मानकर, अमण दुमाने, सुमित ठाकरे, सुहास कुकडकर ,विनय देविकार, प्रमय वलथरे, यश नेऊलकर, अनुज निबेंकर, गितेश सोनकुसरे, लुकेश सपाटे, अमोल टेकाम, सचिन कुथे, वैभव टेकाम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 17, 2023

PostImage

Gadchiroli News - एकलव्य शाळेत प्रवेश अर्ज चालू


गडचिरोली,  :  सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास नागपूर अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल मधील इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परीषद, नगरपालिका, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांत इयत्ता 5 वीचे तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते 14.00 या वेळात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,गडचिरोली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सोनसरी या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

            सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 चे वर्गात असलेले परंतु ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न  रुपये सहा लक्ष पेक्षा कमी आहे. अशाच पालकांचे अनुसूचित , आदिम जमातीचे पाल्य (विद्यार्थी) हे सदर स्पर्धा परिक्षेस बसण्यास पात्र राहतील.

            परीक्षेबाबत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, तसेच नजिकच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दिनांक 30 जानेवारी 2024 राहील.एकलव्य प्रवेशासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज सादर करावे , असे विकास राचेलवार,प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

                                

 


PostImage

Rushi Sahare

Nov. 17, 2023

PostImage

Gadchiroli News - चाळीस गावातील नागरिकाकरिता ' एक दिवस समाजासाठी ' अभिनव उपक्रम


 

“एक दिवस समाजासाठी”

 

गडचिरोली, :  गोंडवाणा गोंड समाज मुरुमगाव, मुरुमगाव जमीदारी ईलाका व जयसेवा कर्मचारी संघटना गोंडवाणा यांनी संयुक्तरित्या मुरुमगाव जमीनदारी ईलाकायातील एकुण 40 गावातील नागरीकाकरिता “एक दिवस समाजासाठी” हा अभिनव उपक्रम राबवुन त्या अंतर्गत समाज प्रबोधन, विद्यार्थी करीता शैक्षणीक मार्गदर्शन व समस्त जनते करीता आरोग्य शिबीर चे आयोजन दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी प्रस्तावित गोंड समाजभवन, कटेझरी रोड मुरुमगाव येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमात मुरुमगाव व टिपागड क्षेत्रातील सर्व गावातील नागरीक तसेच रांगी, मोहली, येरकड,सुरसुंडी, मुरमाडी व मालेवाडा क्षेत्रातील नागरिकांनी स्वंयस्फ़ुर्ती ने सहभाग घेऊन शिबीर कार्यक्रम मधील सेवेचा लाभ घेतला.

कार्यक्रम चे उद्घाटक भूपेंद्रशहा  मडावी महाराज (माजी जमीदार,मुरुमगाव क्षेत्र), कार्यक्रम चे अध्यक्ष  अमरशाह मडावी महाराज (अध्यक्ष, गोंडवाणा समाज टिपागड क्षेत्र) यांच्या हस्ते पार पडले. समाज प्रबोधन करीता प्रमुख वक्ते प्रा. नरेश मडावी ईतिहास विभाग प्रमुख, डॉ. प्रमोद खंडाते जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली, डॉ कन्ना मडावी, डॉ सचिन मडावी (समाज कल्याण आयुक्त), डॉ. बागराज जी धुर्व, डॉ. आशिष जी कोरेटी व प्रमुख अतिथी मा श्री नारायण जी वट्टी, मा श्री रविंद्र होळी तहसीलदार, राजेश जी नैताम,  अजमन जी रावटे, गवर्ना जी सरपंच ग्रा.प. मुरुमगाव, कुमार आदित्य व्यवस्थापक, पंजाब नशनल बक, गितेश कुळमेथे चंद्रपुर हे हजर होते. प्रस्ताविक सुरेश नैताम यांनी जयसेवा कर्मचारी संघटना मुरुमगाव व  गोंड समाज यांच्या मार्फ़त आयोजीत “एक दिवस समाजासाठी” या कार्यक्रमाचे उद्देश्य विषद करुन समाजातील व दुर्गम भागातील समाजबांधव यांनी शिक्षणाचे महत्व ओळखुन आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणेबाबत आग्रही व जागरुक रहावे, समाजातील शिक्षित व कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद ठेवुन आपले शासकीय कार्यालयीन कामे वा ईतर कामे करतांना मनात कोणतीही न्यनगंड न ठेवता व आपल्या समाजाचा अभिमान बाळगावा हे नमुद केले. डॉ. आशिष कोरेटी यांनी गोंडी भाषेतुन समस्त  जनतेशी संवाद साधुन आरोग्य शिबीर करीता आलेले मेडीट्रिना हॉस्पीटल, नागपुर, किंग्सवे हॉस्पीटल, एलेक्सीस हॉस्पीटल, आंरेज सिटी हॉस्पीटल यांनी आपली आरोग्य सेवा पुरविल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. समाजातील नविन पिढी ने शिक्षणाचे महत्व ओळखुन आपले शिक्षण घ्यावे, असे भावना व्यक्त केले.

प्रमुख वक्ता डॉ. नरेश मडावी यांनी प्राचीन काळापासुन ईतिहासाचा अभ्यास केल्यास गोंड समाज हा संस्कृतीने, कलेने व पंरपरेने समृध्द असा समाज आहे,गोंड समाजाचा ईतिहास मध्ये गोंड कालीन साम्राज्य हाच खरा रामराज्य होता, असे प्रतिपादन केले.आपण गोंड समाजाचे आहोत ही अभिमानाची बाब आहे, यांचा वारसा चालवितांना आपला उत्तम शिक्षण व त्यासोबत उत्तम संभाषण कला असणे ही काळाची गरज आहे,जेणेकरुन ईतर समाजाला आपले महत्व पटवुन देता येईल. रविंद्र होळी यांनी समाजाचा विकास साधतांना आपले वैभवशाली पंरपंरा, देवीदेवता, ठाकुर देव यांचा अभ्यास करुन त्या लेखणीबध्द करणे ही काळाची गरज असल्याचे नमुद केले. डॉ. खंडाते सर यांनी शिक्षण हेच आपल्या यशाचे व्दार आहेत, शिक्षणाने आपण समृध्द व विकसीत तर होऊच पण वरिष्ठ पदावर विराजमान होऊन आपला समाज बांधवाची सेवा अधिक उत्तमपणे करु शकु, सल्ला उपस्थीत नागरिकांना दिला. प्रमुख अतिथी वट्टी साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, त्यांचा काळात (सन 1980 ते 1990) शिक्षण घेतांना येत असलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात व अभ्यासाची जिद्द व चिकाटी याबाबत विद्यार्थीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक अमरशहा मडावी अध्यक्ष, गोंड समाज टिपागड क्षेत्र यांनी आपला क्षेत्र हा फ़क्त कृषी क्षेत्र असुन पांरपांरीक शेती व काळानुरुप होत असलेला बदल लक्षात घेता शासकीय योजना व आधुनिक शेतीच्या आधारे आपले उत्पन्न वाढविणे, आपला मुलांचा शिक्षणाकडे जातीने लक्ष देऊन त्याचा सर्वागींन विकासाकरीता प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आरोग्य शिबिरात नेत्ररोग तज्ञ, हद्यरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ सह वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ रोग यांनी आपली सेवा दिली. कन्ना मडावी साहेबांनी आपले वैदयकीय सेवा दिली व समाजातील लोकांत मिसळुन त्यांचाशी संवाद साधुन त्याचा समस्या जाणुन घेतल्या. उक्त कार्यक्रमात सचिन मडावी समाज कल्याण आयुक्त गडचिरोली, डॉ. प्रियंका मडावी स्त्रीरोग तज्ञ यांनी आपली सेवा उपलब्ध करुन दिली तसेच 100 ब्लकेंट समाज बांधवाना वाटप करण्याकरीता उपलब्ध करुन दिली.

कार्यक्रमात एकुण 1748 रुग्णांनी नोंदणी करुन आरोग्य सेवेचा लाभ घेतला, पैकी 598 लोकांना मोफ़त चश्मे वाटप करण्यात आला तर 68 लोकांना पुढील उपचाराकरीता नोंद करण्यात आली आहे. उक्त सर्व रुग्णची वैद्यकीय तपासणी करुन मेडीट्रीना हॉस्पीटल, नागपुर येथे मोफ़त उपचार करण्यात येणार आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र शासन यानी आपले विश्वासु पत्रकार गजपुरे मार्फ़त समाजबांधवासाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाबाबत गोंडवाणा गोंड समाज मुरुमगाव व जयसेवा कर्मचारी संघटनेचे अभिनंदन बाबत संदेश समस्त जनतेला दिले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेश जी टेकाम यांनी केले व या कार्यक्रमाबाबत अथक परिश्रम घेनारे डॉ. आशिष कोरेटी, मेडीट्रीना चे चमु, गोंडसमाज मुरुमगाव, रिडवाही,कुलभट्टी, खेडेगाव, बेलगाव, पन्नेमारा, कन्गडी, उमरपाल,कोसमी, देवसुर,गरापत्ती, सावरगाव येथील नागरीक, शासकीय रुग्णालय, गडचिरोली, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, ग्राम पंचायत मुरुमगाव, जंगल कामगार सहकारी सोसायटी, मुरुमगाव, जंगल कामगार सहकारी सोसायटी,बेलगाव व समस्त जनतेचे आभार व्यक्त केले.

                                        

 

 

 

 

 

 
 


PostImage

Rushi Sahare

Nov. 16, 2023

PostImage

Gadchiroli News- गडचिरोलीच्या विकासाला सरकारचे प्राधान्य - ना. धर्मरावबाबा आत्राम ◆ जिल्ह्यातील वैरागड व पोटेगाव येथे "विकसित भारत संकल्प यात्रे"चा शुभारंभ


 गडचिरोली जिल्ह्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून विकासाच्या बाबतीत या जिल्ह्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा त्राम यांनी केले.

पोटेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी, विवेक सालोंके, तहसीलदार संदीप कराडे, महिंद्रा गणवीर व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, “विकसित भारत संकल्प यात्रा" सुरू रण्यात आली आहे, असे सांगून मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आज या मोहिमेचा शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा होत आहे. सदर मोहीम गडचिरोली जिल्हयातील अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, धानोरा, टापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या दहा तालुक्यातील 422 ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.

पुढे ते म्हणाले, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. जिल्ह्यातील रस्ते, पूल व मूलभूत सुविधांसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. शासन आपल्या दारी अंतर्गत जवळपास 4 लक्ष 50 हजार नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि मातीच्या धर्तीवर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्यामुळे सिंचनाची कामे हाती घेण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. यावेळी आमदार देवराव होळी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यात्रेची उद्दिष्टे :  विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद- वैयक्तिक कथा/अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे.


 


PostImage

Rushi Sahare

Nov. 16, 2023

PostImage

Gadchiroli News - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दीपोत्सवाला नवा आयाम ! ● विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात


गडचिरोली, दि. १५ :  गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला.  जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने  दीपोत्सव साजरा केला. नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या या जवानांचे मनोबल उंचावतांनाच त्यांनी आदिवासी बांधवांसोबत भावस्पर्शी एकरूपता साधली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील पिपली बुर्गीला भेट दिली. या भेटीदरम्यान एटापल्ली उपविभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या  पिपली बुर्गी पोलीस ठाण्यांतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन विविध वास्तुचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पिपली चुनीं येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकिय इमारतीचे भूमीपूजन, पोलीस अंमलदार बॅरेक आणि अधिकारी विश्राम गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. तसेच पिपली बुर्गी येथे महा जनजागरण मेळाव्यास  उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी  गडचिरोली पोलीस दलातील  जवान व आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. जवान आणि नागरिकांसोबत फराळ केला.   भाऊबीजेच्या निमित्ताने येथील महिला पोलीस अंमलदार व स्थानिक महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे भावस्पर्शी औक्षण केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महा जनजागरण मेळाव्यात उपस्थित असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक भेट वस्तू व साहित्याचे वाटप झाले. तसेच  विद्यार्थ्यांना सायकल, शालेय व क्रीडा साहित्य देण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या मागील कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत अभिनंदन केले. या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील पोलीस जवान अतिशय निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असून त्यांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, येथील विशेष अभियान पथकाची टीम ही अतिशय सक्षम असून तिच्या कर्तृत्वाची उच्च स्तरावर दखल घेण्यात येत असते. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाकडून पोलीस दादा लोरा खिडकीसारखे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास होण्यास मदत होत आहे. गडचिरोलीचा विकास हा सरकारचा ध्यास असून, नवीन उद्योग आता या जिल्ह्यात येत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. शालेय विद्याथ्यांनी शासनाच्या मदतीचा लाभ घेऊन आपला विकास साधावा असे आवाहनही त्यांनी केले.

गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक  संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल , सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, केंद्रीय राखीव बटालियचे समादेशक परविंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

या भावस्पर्शी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक शिवराज लोखंडे यांनी तर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी आभार मानले.

 


PostImage

Rushi Sahare

Nov. 15, 2023

PostImage

Gadchiroli News - जिल्ह्यातील वैरागड व पोटेगाव येथे आज "विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ


गडचिरोली,   : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या

उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे. सदर मोहीम गडचिरोली जिल्हयातील अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या दहा तालुक्यातील ४२२ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार असून १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील वैरागड (ता. आरमोरी) व पोटेगाव (ता. गडचिरोली) येथील ग्रामपंचायती मध्ये "विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ होणार आहे..

सदर कार्यक्रमादरम्यान आरोग्य शिबीर, कृषी विषयक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला, खेळाडू, विद्यार्थी इत्यादींचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय योजनांची प्रचार प्रसिध्दी करण्याकरीता दहा तालुक्यातील ४२२ ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्दी व्हॅन (वाहने) फिरणार आहेत, असे जिल्हाधिकारी संजय मिना यांनी कळविले आहे.

यात्रेची उद्दिष्टे : विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद- वैयक्तिक कथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे.

 ठळक वैशिष्ट्ये : जनजाती गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर २०२३ रोजी या यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे. सुरूवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ११० जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये/मतदारसंघात, आदर्श आचारसंहिता उठल्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली जाईल. विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक आखताना स्थानिक परिस्थिती उदा. हवामान, सण इ. बाबी विचारात घेतल्या जातील. या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये राहणार आहेत.


PostImage

Rushi Sahare

Nov. 15, 2023

PostImage

Gadchiroli News - महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम - ब योजना लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटींची पुर्तता करावी.. महाऊर्जाचे आवाहन


गडचिरोली : महाकृषी ऊर्जा अभियान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतक-यांचे परिपूर्ण एकूण १ हजार ५९६ अर्ज आजतागायत ऑनलाईन महाऊर्जाच्या कुसुम-ब पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत. या अर्जांपैकी ४२१ लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच ३८३ लाभार्थी शेतकर्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामूळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टल वरून एस.एम.एस त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आलेले आहेत. तसेच महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपुर यांचेकडून अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पुर्तता करण्याकरीता भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही बऱ्याच लाभार्थी कडून त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही.

यामध्ये तालुकानिहाय त्रुटीतील लाभार्थी अर्जाची संख्या पुढील प्रमाणे आहे. वडसा २७, आरमोरी ५४, कुरखेडा १२९, कोरची २६, धानोरा ९, गडचिरोली ५, चामोर्शी १०, मुलचेरा १५, एटापल्ली ९१, भामरागड ३, अहेरी १२, सिरोंचा २ असे एकुण ३८३ लाभार्थी त्रुटीमध्ये आहेत. या व्यतिरीक्त ७०२ शेतक-यांचे अर्ज अपूर्ण आहेत. या अनुषंगाने अपूर्ण व त्रुटी अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या युजरनेम व पासवर्डचा उपयोग करून ऑनलाईन पोर्टलवर आवश्यक त्रुटी असलेले कागदपत्रे अपलोड करुन त्रुटींची व अपूर्ण अर्जाची पुर्तता करावी. या करीता महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/benefshome या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कागदपत्रे अपलोड होत नसल्यास किंवा कुठलीही अडचण संभावतास महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे भेट द्यावी. जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर पत्ता : गाळा क्र. ४ आणि कार्यालय क्र. १ गझ टॉवर वडगाव फाटा, एनफिल्ड शोरूम सामोर नागपुर रोड, चंद्रपूर ४४२४०२ दूरध्वनी : ०७१७२-२५६००८ E-mail: domedachandrapur@mahaurja.com जे लाभार्थी येत्या सात दिवसांत त्रुटींची पुर्तता करणार नाही, त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील व मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा प्रथम त्रुटी पुर्तता करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल. याअनुषंगाने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करून आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटीबाबत विचारणा करावी तसेच प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटी पुर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नितीन पाटेकर यांनी केले आहे.

 

 


PostImage

Rushi Sahare

Nov. 13, 2023

PostImage

Gadchiroli News - ०९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन


गडचिरोली,   : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक ०९ डिसेंबर २०२३ रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली / अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन. आय. अॅक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद,

महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपूर्ण राज्यात ०९ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी दिनांक ०९ डिसेंबर २०२३ रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आर. आर. पाटील यांनी केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 13, 2023

PostImage

Gadchiroli News - १५ व १६ तारखेला बिरसा मुडां जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


आरमोरी - तालुक्यातील जोगीसाखरा येथे आदिवासी गोंड समाज यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  दि.१५  नोव्हेंबर ला क्रांतीवीर बिरसा मुडां जयंती  निमित्त सकाळी १० वाजता रक्तदान  शिबीर व रात्रो आदिवासी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक १६ ला गोंडी रेला नृत्याची रैली, बिरसा मुडां यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन, विवाह सोहळा त्या नंतर रात्रो विदर्भातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार गायक विजय कुमार शेन्डे यांचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे   तरी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी गोंड समाज जोगीसाखरा यांनी केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 12, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - सहारा क्रिकेट क्लब च्या वतीने हाप पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...  खेळाडूंनी कोणत्याही स्पर्धा खेळताना खेळाडू वृत्ती जोपासावी :- आमदार कृष्णा गजबे


आरमोरी दि.12:- आजच्या युगात स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे. खेळात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वासाने खेळाला समोरे जावे, जेणे करून उद्या चालुन आपन आपल्या राज्यासाठी देशासाठी खेळण्यासाठी तत्पर झालो पाहिजे. प्रत्येक खेळाडूने खेळाडू वृत्ती जोपासली तर नक्कीच आपल्याला यश संपादन करता येईल असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

         आरमोरी तालुक्यातील शिवनी बु. येथील सहारा क्रिकेट क्लब यांच्यावतीने हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते.  या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. 
     यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, भाजपा आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरी न. प. चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, पंचायत समिती आरमोरी चे माजी सभापती निताताई ढोरे, ग्रामपंचायत शिवनी बु. चे सरपंच पुरुषोत्तम दोंनाडकर, सुरेश ढोरे उपसरपंच ग्रामपंचायत शिवनी बू., सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, पोलीस पाटील शकुंतला पत्रे,  तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक पत्रे, पुरुषोत्तम ठाकरे शिवनी बु., प्राध्यापक भाग्यवान मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम माकडे, ग्रामपंचायत सदस्य गौरीताई बुल्ले ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई बघमारे, ग्रामसेवक प्रधान, पोहनकर गुरुजी, सोमेश्वर राऊत महेश उईके  व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 12, 2023

PostImage

Gadchiroli News - विकसित भारत व सकल्प यात्रा मोहीम


गडचिरोली,  दि. ११ : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल- मे, २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून ऑगस्ट, २०१८ या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा माहिती गडचिरोली जिल्हयातील अहेरी, आरमोरी, भागरागड, चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या दहा तालुक्यातील ४२२ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. सदर यात्रेचे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहे. विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहीतीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद- वैयक्तिक कथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे. विकसित भारत संकल्प ठळक वैशिष्ट्ये- जनजाती गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी या यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे. सुरूवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ११० जिल्ह्यांना आणि नाव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये / मतदारसंघात, आदर्श आचारसंहिता उठल्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली जाईल. विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक आखताना स्थानिक परिस्थिती उदा. हवामान, सण इ. बाबी विचारात घेतल्या जातील. या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये राहणार आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन सोहळा दिनांक १५ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत वैरागड ता. आरमोरी व ग्रामपंचायत पोटेगाव ता. गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमा दरम्यान आरोग्य शिबिर कृषी विषयक सादरीकरण सांस्कृतीक कार्यक्रम व उत्कृष्ट कामगीरी केलेल्या महिला, खेळाडू, विद्यार्थी इत्यांदीचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत शासकीय योजनांची प्रचार प्रसिध्दी करण्याकरीता दहा तालुक्यातील ४२२ ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्दी व्हॅन (वाहने) फिरणार आहेत. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 11, 2023

PostImage

Gadchiroli News - लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार..विविध कलमान्वये पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.. आरोपी गजाआड


आरमोरी :- तालुक्यातील मौजा मागदा येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच १८ वर्षाच्या मुलीला २ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोलीला रुमवर घेऊन गेला आणी पीडित युतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे. 
              त्यानंतर लग्नाला नकार देत तीला तिथेच सोडुन फरार झाला.खुप उशीर झाला पण तो परत आला नाही,त्यामुळे आपल्याशी धोका झाल्याचे सदर मुलीच्या लक्षात आले. 
         पीडित युवतीने सबब हकिकत आपल्या कुटुंबीयांना सांगितली.आपल्या मुलीवर अन्याय झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीचा मावसभाऊ, वडील,यानी मुलीला सोबत घेऊन आरमोरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.   
              सदर मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीसानी ताबडतोब माहीतीची सुत्रे हलवली आणी दी.८ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोपीला मौजा मागदा येथे अटक करण्यात आली आहे.
                            
           आरोपी शुभम तुलसीदास काशीकर वय २३ वर्ष मु. मागदा,तह.आरमोरी,जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन त्याचेवर भांदवी कलम ३७९(२०२३),,३७६(२)(n),,४१७,,२९४,,३२४,, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन ३ दिवसाचा पिसीआर देण्यात आला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. 
           पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक मंडलिक याचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.


PostImage

Rushi Sahare

Nov. 10, 2023

PostImage

Gadchiroli News - दोन अपघातात एक गंभीर तर एका शिक्षकाचा मृत्यु


वैरागड  दि.10 शुक्रवारला सकाळच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी लोहारा टी पॉईंट येथे बालाजी भरद्वार हे गेले असता यांना एका दुचाकी स्वराने जबर धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले तर सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा गणेशपुर येथील मुख्याध्यापक रवींद्र ठलाल वय 45 हे आपल्या MH 33 AA 9799 या दुचाकीने आरमोरीकडे जात असताना वैरागड येथील आयडिया मोबाईल टॉवर जवळ समोरून येणाऱ्या MH 34 AW 1799 या होंडा कंपनीच्या दुचाकीने अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात करणारे मात्र दवाखान्यात उपचार करण्याच्या बहाण्याने तिथून पसार झाले, आरमोरी पोलीस हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृत्तकाला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे नेण्या आले.अधिक तपास ट्रॉफीक हवालदार पठाण करीत आहेत.


PostImage

Rushi Sahare

Nov. 10, 2023

PostImage

Gadchiroli News - जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन


गडचिरोली,  दि. १०: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. त्याचप्रमाणे सन २०२३-२४ या सत्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली मुख्यालयीन जिल्हास्तर युवा महोत्सवाचे व्यापक स्वरुपात व अधिका अधिक युवकांचा सदर महोत्सवामध्ये सहभाग असावा व महोत्सवाला व्यापकता यावी शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचना नुसार जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. २८ नोव्हेंबर, २०२३ ला जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, गडचिरोली येथे सकाळी ०९.०० वाजता आयोजीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

युवा महोत्सव आयोजनामागील उद्देश युवकांचा सर्वांगिन विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे. युवकांच्या अंगी असलेल्या सप्तकलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मीता वाढील लागणे, करीता युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

तसेच सदर युवा महोत्सव हा जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजीत करण्यात येत असतो. सन २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष घोषीत केले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तरावर युवा महोत्सवात सहभागी युवकांची कलाप्रकारानुसार स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये पुढीलप्रमाणे कलाप्रकार सामाविष्ठ आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये १ समुह लोकनृत्य, २. वैयक्तिक सोलो लोकनृत्य, ३. लोकगीत, ४. वैयक्तिक सोलो लोकगीत. कौशल्य विकासमध्ये १. कथा लेखन, २. पोस्टर स्पर्धा, ३. वत्कृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), ४. फोटोग्राफी. संकप्लना आधारीत स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी १. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, २. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान. युवा कृती या कार्यक्रमाअंतर्गत १. हस्तकला, २. वस्त्रोद्योग, ३. अँग्रो प्रोडक्ट.

उपरोक्त सर्व बाबींच्या जिल्हास्तरावर कलाप्रकारानुसार स्पर्धा आयोजीत झाल्यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त करणारे युवक-युवती / संघ यांना विभागस्तरावर आयोजीत विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीत कार्यालयाच्या वतीने प्रवेश अर्जासह संघ / युवक युवतींना पाठविण्यात येईल. युवा महोत्सवामध्ये युवक युवती चे वय १५ ते २९ या वयोगटातील राहील. कमी अधिक वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येणार नाही. तसेच युवा महोत्सवामध्ये सहभागी हेणारे युवक युवती हे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे राहील. तसेच संघ असल्यास शाळेचा / महाविद्यालयाचा / संस्थेचा प्रवेशअर्ज युवक युवतीच्या नावासह व जन्मतारखेसह व निवासाच्या पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करणे अनिवार्य आहे.

जिल्हास्तरावर सहभागी होणाऱ्या युवक युवतींकरीत यावर्षीपासून प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त करणान्या वैयक्तिक / सांधिक कलाप्रकारानुसार रोख बक्षिसे कार्यालयाच्या वतीने देण्यात येतील. तसेच सहभागी युवक युवतींना कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.

तरी जिल्ह्यातील विविध संस्था / विविध शाळा / विविध महाविद्यालये / कला क्षेत्रात कार्यरत विविध संस्था / कृषी महाविद्यालय / अध्यापक महाविद्यालय / औद्योगीक प्रशिक्षण संस्था / तंत्रशिक्षण महाविद्यालय व जिल्ह्यातील विविध युवक युवती यांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि.२४/११/२०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा व आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा व अधिक माहितीकरीता एस.बी. बडकेलवार, दुरध्वनी क्रमांक ९५०३३३११३३ यांचेशी संपर्क साधावा असे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी आवाहन केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 10, 2023

PostImage

Gadchiroli News - देशाचे फाळणीचे विस्तापितांना भूखंडाचे मालकीहक्क देण्याबाबत लवकरच शासन निर्णय


देसाईगंज : देशाच्या स्वतंत्र्याच्या वेळी हिन्दुस्थान चे विभाजन होऊन पाकिस्तान ची निर्मीती झाली त्यावेस पश्चिम पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हिंदू बांधव विस्थापित होऊन भारतात आले. त्यांना देशातील अनेक प्रांतामध्ये घरासाठी व दुकानासाठी जागा व काही मदत शासन तर्फे देण्यांत आली. परंतु अद्याप पर्यंत त्यांना देण्यांत आलेल्या भूखंडाचे मालकीहक्क शासकीय उदासिनतेमुळे सिंधी बांधवांना मिळालेले नाही. 75 वर्षाच्या कालावधी नंतर विस्थापितांचे प्रमाणपत्र इ. ची मागणी शासना द्वारे करण्यांत येत होती. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील सिंधी कॉलोनी त्या पैकी एक वसाहत आहे. सदर प्रकर्णी आमदार  कृष्णा गजबे यांनी  पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार  देवेंद्र फडणवीस यांना सदर प्रकरणी शासन स्तरावर बैठक घेवून सिंधी समाजाला न्याय देण्यांची मागणी केली त्यावर त्यांनी  नामदार  राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री यांना तात्काळ बैठक घेण्यांचा सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार दि. 7/11/2023 ला मंत्री (महसूल) यांचे दालनात  आमदार  कृष्णा गजबे,  विक्की कुकरेजा, माजी स्थायी समीती सभापती, नागपूर महानगरपालिका,  किशन नागदेवे माजी नगराध्यक्ष देसाईगंज, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा,  मोतीलाल कुकरेजा माजी उपाध्यक्ष, देसाईगंज,  लक्ष्मण रामानी,  प्रेम वसंतानी माजी नगराध्यक्ष, हिंगणघाट,  रामकुमार हरमानी नागपूर इ. यांचे सह  प्रधान सचिव, महसूल,  जिल्हाधिकारी, गडचिरोली व नागपूर इ. सह बैठक घेतली.

बैठकीत लवकरच जरीपटका येथील विस्तापितांचे जमीनीचे मालकी हक्का संबंधात झालेले शासन निर्णय व त्यातील अडचणी दूर करून संपूर्ण महाराष्ट्रातील विस्थापित सिंधी बांधवांचे जमीनीचे मालकी हक्क तात्काळ देण्यासंबंधी लवकर शासन निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले आहे.

शिष्ट मंडाळाचे नामदार  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांची सुध्दा भेट घेवून त्यांचे सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी सुद्धा तात्काळ शासन निर्णय घेवून सर्व सिंधी बांधवांचे फाळणीचे वेळी त्यांना दिलेले सर्व भुखंडाचे मालकी हक्क लवकरात लवकर त्यांना देण्यांत येतील असे आश्वासन दिले आहे.

 नामदार  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री,  ना.  राधाकृष्ण विखे पाटील,  आमदार  कृष्णा गजबे यांनी सिंधी समाजाचे प्रमुख समस्या मार्गी लावण्यासाठी केलेल्या सहकार्या बद्दल सिंधी समाजाने त्यांचे आभार मानले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 9, 2023

PostImage

Gadchiroli News - कर्तव्य बजावतांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविकेचे वारसास ५० लाख रुपयांचा विमा कवच प्रदान


गडचिरोली,  दि.०९: एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प आरमोरी अंतर्गत अंगणवाडी केन्द्र क्रमांक 2750802011 येथील अंगणवाडी सेविका श्रीमती तारा किसन मेश्राम हया कोरोना साथीच्या कालावधीत कोरोना सर्वे कर्तव्य बजावत असतांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु झाला. शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आरमोरी व जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाकडून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुंबई यांचेकडे विमा कवच योजना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विमा कवच योजनेअंतर्गत मंजुर सानुग्रह अनुदान रुपये 50.00 लक्ष, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी कोरोना योध्दाचे वारसदार पती किसन लाकडु मेश्राम यांना सदरील धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली, श्रीमती आयुषी सिंह यांचे हस्ते वितरीत करण्यात आला यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली राजेन्द्र भुयार, तसेच श्रीमती अर्चना इंगोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.). . जि.प. गडचिरोली व बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरमोरी, जी.एल. कुकडे हे उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 9, 2023

PostImage

Gadchiroli News - पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजनासांठी अर्ज करण्याचे आवाहन


गडचिरोली, दि.०९: राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणान्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाव्दारे ग्रामिण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागु करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखादया योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन २०२१-२२ पासुन पुढील ५ वर्षा पर्यंत म्हणजे सन २०२५-२६ लागु ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाज केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरण किंवा इतर बाबीकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजने अंतर्गत दुधाळ गाई / म्हशीचे गट वाटप करणे, शेळी/मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कूट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ:-https://ah.mahabms.com, अँड्राईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नांव:- AH.MAHABMS (Google Play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध), अर्ज करण्याचा कालावधी:- ०९/११/२०२३ ते ०८/१२/२०२३ टोल फ्री क्रमांक:- १९६२ किंवा १८००-२३३-०४१८. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असुन, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणी बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावार अर्जाच्या स्थीतीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थीतीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी(विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विलास गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली व डॉ. सुरेश कुमरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 7, 2023

PostImage

Gadchiroli News - ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोरची तालुक्यात काँग्रेसची सरशी, आठ पैकी तीन जागेवर सरपंच काँग्रेसचे


कोरची - 5 नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील 7  ग्रामपंचायतचे सार्वत्रिक निवडणूक पार पडले व एक ग्रामपंचायत हे बिनविरोध निवडून आलेली होती. आज लागलेल्या निवडणुकीच्या या निकालामध्ये काँग्रेस पक्षाचा वरचष्मा दिसून येत असून आठ ग्रामपंचायत पैकी मुरकुटी, पिटेसूर व जांभळी येथील ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसच्या सरपंचांनी बाजी मारली तर दवंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व कोटरा आणि बोदालदंड येथे भाजप व नवेझरी आणि सातपुती येथे स्थानिक गटाच्या कार्यकर्त्यांनी सरपंच निवडून दिले.

             या ग्रामपंचायत निवडणुकीमधून आता भविष्यातील निवडणुकीची सुद्धा रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसून येत असून निवडून आलेल्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला.त्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे,श्रावण. मातलाम,रूखमन घाटघुमर,वासीम शेख,प्रमेश्वर लोहबरे, राजेश नैताम ,नगरसेवक धर्मा नैताम,युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष दीपक हलामी, तुलाराम मडावी, विठ्ठल शेंडे, दीपक परसो,धन्नालाल अंबादे ,रवि नंदेश्वर,बुधराम फुलकुवर,राजु सहारे सोबत सर्व विजयी उमेंदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Nov. 7, 2023

PostImage

Gadchiroli News - छत्तीसगड व तेलंगणा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२३ - औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनातील व्यक्तींना मतदानाकरीता सुट्टी जाहीर


गडचिरोली,   : महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ अन्वये, छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत, तथापि, त्यांची नावे छत्तीसगड राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मंगळवार, दि. ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी आणि शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्हांमध्ये (गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ व नांदेड) कार्यरत आहेत. तथापि, त्यांची नावे तेलंगणा राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी गुरूवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे. ही सुटी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील, असे अधिसुचनेव्दारे कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 4, 2023

PostImage

Maharashtra News - व्हॉइस ऑफ मीडिया’  अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन ! ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची उपस्थिती


मुंबई  : देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या  ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाच्या लोगोचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, मंत्री शंभूराजे देसाई व संघटनेच्या राज्य कार्यवाहक  यास्मिन शेख प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील लोगोचे प्रकाशन केले.
बारामती येथे होणाऱ्या या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांची देखील उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. 
अधिवेशनाची वेगाने तयारी होत असून अधिवेशनाला येणाऱ्या पत्रकारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
---
संघटनेची कामगिरी कौतुकास्पद : मुख्यमंत्री
जेमतेम तीन वर्षाच्या काळात संघटनेने पत्रकारांसाठी व त्यांच्या समस्या निवारण्यासाठी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण असून शासन दरबारी पाठपुरावा देखील वेगाने होत आहे. या अधिवेशनातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेता येतील व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
------
तळमळ महत्वाची : शरद पवार

मोजकेच पत्रकार वगळता राज्यातील हजारो पत्रकार बांधवांना अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न व विशेष म्हणजे पत्रकारांबद्दलची तळमळ ही महत्त्वाची बाब आहे. अधिवेशनातून त्यांच्या समस्यांना निश्चितच वाचा फुटेल. आमच्यासारख्या नेत्यांनाही एकाच वेळी हजारो पत्रकारांना भेटता येईल याचा आनंद आहे.
-------
अधिवेशनाचे फलित 
होईल :  अजित दादा 

एवढ्या मोठ्या संख्येने राज्यभरातून पत्रकार बारामतीत येणार ही आनंदाची बाब आहे. सर्व पत्रकारांचे स्वागत आहे त्यांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी अधिवेशनातून एकजुटीने होणारे प्रयत्न निश्चितच फलदायी ठरतील.
…….


PostImage

Rushi Sahare

Nov. 3, 2023

PostImage

Gadchiroli News - अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरीता स्पर्धापुर्व प्रशिक्षण


गडचिरोली,  : आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरीता MPSC पूर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवाराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD ) असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.१००० ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवाराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.०२ नोव्हेंबर २०२३ पासुन २८ नोव्हेंबर २०२३ पर्यत या कार्यालयात सादर करावेत. तदनंतर मुलाखत दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र. २ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७१३२- २९५१४३/८४८५८१४४८८ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 1, 2023

PostImage

Gadchiroli News - ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत होणाऱ्या खर्चाच्या टू वोटर अॅपचा वापर करुन निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करा


गडचिरोली,  दि. ०१ : राज्य निवडणूक आयोगाने दि. ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक / पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. सदर निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर अॅपचा वापर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. यासाठी गुगल / अॅपल प्लेस्टोअर वरुन ट्रू वोटर अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करावा.

ट्रू वोटर ॲप बाबतीत काही तांत्रिक अडचणी असल्यास ७७६७००८६१२, ७७६७००८६१३ व ७७६७००८६१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे उप सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी कळविले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Nov. 1, 2023

PostImage

Gadchiroli News - ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


गडचिरोली,  दि. ०१ : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी (सोमवार) दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यत राहील आणि सभेला ३.०० वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र - १ अ ते १ ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 1, 2023

PostImage

Gadchiroli News - गडचिरोली तालुक्यातील २८४ निराधारांना मिळणार अर्थसहाय्य संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न


गडचिरोली, दि. ०१ : विशेष सहाय्य योजने अंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अंपग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्या करीता गडचिरोली तालुक्यात “शासन आपल्या दारी” तसेच जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज तलाठयां मार्फत भरुन घेण्यात येतात.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी संजय गांधी निराधार योजना समिती गडचिरोली समोर ठेऊन समितीचे अध्यक्ष तहसिलदार, गडचिरोली, महेंद्र गणविर यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यात आली. सदर सभेला मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली व संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती, गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते. सभेत पुढील प्रमाणे अर्ज मंजुर / नामंजुर करण्यात आले.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये १४३ प्रकरणे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर प्रकरणे १४१

असून नामंजूर २ प्रकरणे आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना योजनेमध्ये ६७ प्रकरणे

प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर प्रकरणे ६७ आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये

४७ प्रकरणे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर प्रकरणे ४५ असून नामंजूर २ प्रकरणे आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये ३२ प्रकरणे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर प्रकरणे ३१ असून नामंजूर १ प्रकरणे आहेत. सदर सभे करीता डी. ए. ठाकरे नायब तहसिलदार, (सं.गां.यो) तहसिल कार्यालय गडचिरोली, एल. एम. अल्लीवार, अव्वल कारकुन, कु. एस. व्ही. कोडापे, महसूल सहाय्यक व रजनी बांबोळे, (इंगायो) ऑपरेटर यांनी विशेष सहाय्य योजनेची प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तहसिल कार्यालयात तलाठ्यां मार्फत सादर करणेबाबत महेंद्र गणविर, तहसिलदार, गडचिरोली यांनी जाहिर आवाहन केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 1, 2023

PostImage

RN News - मृत अर्भक नालीत सापडले.. पोलीस तपास सुरू..


चिमूर -मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृदय द्रावक घटना आज बुधवारी (1 नोव्हेंबर 2023) ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडदा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसाचे असून  गावातील नसल्याची माहिती जनमानसांच्या चर्चेतून कळते.

हाती आलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात आज बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी साचलेल्या नालित नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच भिशी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांची चम्मू घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृत्तावस्थेत होते. ती बालिका असुन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुण्यातरी महिलेचे असावे असा संशय आला होता, परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावा असा संशय निर्माण केल्या जात आहे.  कुणातरी बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रात्रीच नालीत आणुन टाकले असावे, अशीही चर्चा आहे. आढळून आलेले अर्भक ही बालिका असल्यामुळे तिला उघड्यावर फेकण्यात आले असावे, अशीही शंका व्यक्त केली आहे आहे.


PostImage

Rushi Sahare

Nov. 1, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - मोहफुल दारू काढनारे पसार.. पोलिसांची कारवाई


दिनांक ३१/१०/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी  भुजबळ गडचिरोली व पोलीस निरीक्षक  संदिप मंडलिक यांचे मार्गदर्शना खाली, पो.उप निरी. दिलीप मुनघाटे, पो. हवा. / राजु उराडे, चा.पो.हवा./ विदयासागर बिके, असे व मौजा देलनवाडी येथील पोलीस पाटील  कोमल धुर्वे, वन विभागाचे, क्षेत्र सहाय्यक शेषराव नारनवरे, व त्यांची टिम तसेच मुक्तीपथ संघटनेचे तालुका संघटक  विनोद कोहपरे व त्याची टिम तसेच दोन पंच असे एकत्र मिळून मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे मौजा देलनवाडी जंगल परीसरात कंम्पारमेन्ट कमांक ३१७ मध्ये प्रोव्हिबिशन रेड करीता संयुक्त अभियान राबवित असतांना एका वन तलावाचे बाजूला जंगलामध्ये काटयाचे कंपाऊंडचे आत ३ इसम चुल पेठविण्याचे तयारी करीत असतांना आम्हाला दिसून आले. लपतछपत जात असतांना त्यांनी  पोलीसांना इतर कर्मचारी यांना नमूद इसमानी पाहून जंगलामध्ये पळून जावून लागले तेव्हा सोबत असलेले पंच व पोलीस पाटील यांनी ओळखुन पळून जाणारे इसम हे त्याचे मौजा देलनवाडी गावातील असून त्यांचे नाव १) ईश्वरदास देविदास खेडकर वय ३६ वर्षे, २) सुनिल हरी वाडनकर वय २५ वर्षे, ३) कैलास विठ्ठल वाडेनकर वय ३३ वर्षे निन्ही रा. देलनवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे असल्याचे सांगीतले. तेव्हा ते इसम पळून गेलेल्या काटयाचे कंपाऊड मध्ये जावून पाहिले असता तिथे पंचानी व मुक्तीपथ संघटेनेचे पदाधिकरी यांनी मोहासडवा ड्रमची पाहणी करून हातभट्टी मोहादारू काडण्याकरीता कच्चा माल मोहासडवा असून सदर द्रव्याचा वास आंबट उग्र घाण येत असून मोहा सडवा असल्याचे मत जाहीर केले.

किमंत१) १,००,०००/- वर्णन

मोहासडव्याने भरलेले १०० लिटर क्षमतेच निळया रंगाचे २० ड्रम, त्या प्रत्येकी ड्रम मध्ये १०० लिटर मोहासड़वा या प्रमाणे २००० लिटर मोहासडवा त्यांची प्रती लिटर किमंत ५०/- रू. प्रमाणे

२) २,०००/- हातभट्टी मोहादारू काडण्याकरीता वापरण्यात येणारे जर्मनची मोठी केतली ०१ नग, व ०१ नग जर्मनी मोठा वाटा,

3) 00:00/-एक लाकडी चाटू, प्लास्टीकची नळी करून तपासास आहे.असा माल जप्त करून पो.स्टे. आरमोरी  महा. दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद


PostImage

Rushi Sahare

Nov. 1, 2023

PostImage

Gadchiroli News - गडचिरोली येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील उद्योजकाकरीता निशुल्क निवासी प्रशिक्षण


गडचिरोली, : गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उद्योजकांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. १८ दिवस कालावधीच्या या कार्यक्रमात विविध उद्योगसंधी, व्यक्तीमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, हिशेब ठेवणे, उद्योगाचे व्यवस्थापन, कर्जप्रकरण तयार करणे, यशस्वी उद्योजकांची चर्चा, उद्योगांना भेटी इत्यादी विषयांवर तज्ज्ञ व अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. प्रशिक्षण हा निशुल्क व निवासी स्वरुपाचा आहे.

१८ ते ४० वयोगटातील १० वी पास/नापास अनुसूचित जातीचे प्रशिक्षणार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात. उद्योग व्यवसाय करण्याची तीव्र इच्छाशक्ती व याआधी कर्ज न घेतलेले उमेदवार यामध्ये भाग घेवु शकतील. सदर कार्यक्रमाच्या माहितीकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२३ ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उद्योकता जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रवेश अर्ज व अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, गडचिरोली, देविचंद मेश्राम द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे संपर्क करावा. असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी एक पत्रकाद्वारे केले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 29, 2023

PostImage

Gadchiroli News :- वर्षावास समापण सोहळा संपन्न... भाजप-कांग्रेस वाल्याकडुन देणगी घेऊन विहार बांधु नका :- मनोहर गेडाम


 गडचिरोली -  वर्षावास समापण सोहळा केरोडा येथे संपन्न .  केरोडा  ह्या गावाचा एक इतिहास आहे. जवळच्या जाम गावात बौद्ध बांधवांच्या लोकवर्गणीतून  डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा उभारला परंतु आमचे बौध्द बांधव मात्र भाजप _ कांग्रेस च्या नेत्याकइन देणगी घेऊन किवा बुद्ध मुर्ती दानात घेऊन विहार बांधतात यातच आमचा स्वाभिमान विकल्या जातो. आपल्या कष्टातुन विहार बांधला त्या विहारात खरे धम्माचे कार्य होते. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जेष्ठ नेते मनोहर गेडाम यांनी केरोडा येथील वर्षावास समापण सोहळ्या प्रसंगी केले. वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदा मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अभारिप चे प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास राऊत' रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, संविधान बचाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ,रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड . विनय बांबोळे , सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र पाटिल , उदय गडकरी , किशोर उंदिरवाडे , प्रदिप भैसारे , आदि उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत म्हणाले की , आपण बहुजनांनी बौद्ध धम्म स्विकारला म्हणुन आपण एकत्र येवून आपली शक्ती दाखवित आहात. म्हणुन आज आपण शुट बुटात गाड्या घेऊन फिरतो हे केवळ बौद्ध धम्म स्विकारल्या मुळेच. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की, आषाढी पौणीमा ते वैशाखी पौणीमा ह्या तिन महिण्याचा कार्यकाळ संपून आज आपण वर्षावास सोहळा करीत आहोत. आजच्या दिवशी भन्तेना कठीण चीवरदान देवून भन्ते नी आजपासुन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. उपाषकांनी  विहारात जावून धम्म ऐकावे. परंतु कोठरीचे भन्ते भगीरथ वर्षावास न करता महुला जातात. असेही काही भन्ते आहेत. अश्या व्यक्ती पासुन आपण सावध राहिले पाहिजे. याप्रसंगी गोपाल रायपूरे , अँड ' विनय बाबोळे , भारतीय बौद्ध महासभेचे नरेंद्र पाटिल यांचेही बौध्द धम्मा बाबत विश्रृत मार्गदर्शन केले. वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष गोकुळदास सहारे , कपिल खंडारे , दिलीप ढोलणे , गिरिष ढोलणे , कैलास सहारे , वंदना ढोलणे , गिरिधर सहारे , अनुमाला भैसारे , विजय उंदिरवाडे , कपिल खंडारे सहित बहुसंख्य उपासक _ उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते. रात्रौ विजय शेन्डे यांच्या भिमगिताचा कार्यक्रम पार पडला.


PostImage

Rushi Sahare

Oct. 28, 2023

PostImage

Chandrapur News - रेशनकार्ड समस्या आणि  नागरिकांमधील प्लास्टिक तांदळाचा संभ्रम दूर करण्याचा  प्रयत्न


चंद्रपूर दि:- 27 ऑक्टोबर 2023 रोजी शहराध्यक्ष रवि पुप्पलवार  यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार डॉ. कांचन जगताप  यांची भेट घेऊन त्यांना कळविण्यात आले की शहरातील जनता रेशनमध्ये प्लास्टिकचे तांदूळ असल्याच्या भीतीने संभ्रमात व चिंतेत आहे. नवीन अन्नधान्य शिधापत्रिका बनवणे, रेशन अचानक बंद करणे, नाव अपडेट करणे, रेशन कार्डवर अक्टिव्हेट करणे अशा अनेक समस्या घेऊन तहसील कार्यालयात येणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अगदी तुटपुंज्या समस्यांसाठीही तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात, रेशन अनियमितता दूर करावी व रेशन दुकानदारांनी ग्राहकांना धान्य दिल्यानंतर नियमितपणे पावती द्यावी, व प्रत्येक रेशन दुकानावर संपूर्ण माहिती असलेले फलक लावण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार मैडमकडून मिळालेल्या माहितीनुसार प्लास्टिकचा तांदूळ समजला जाणारा तांदूळ 'फोर्टिफाइड राईस' आहे. या तांदळात सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. तरी याला प्लास्टिकचा तांदूळ समजून भिती बाळगण्याचे कारण नाही असे तहसीलदार मॅडम नी स्पष्ट केले.तहसीलदार डॉ.कांचन जगताप यांनी सर्व समस्या विचारात घेऊन लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

 यावेळी शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार , उपाध्यक्ष अफजल अली , सचिव ज्योती बाबरे, संघटन मंत्री रोहित जंगमवार , प्रवक्ता आसिफ हुसैन शेख, सहसचिव आशिष गेडाम आदी उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Oct. 28, 2023

PostImage

Gadchiroli Armori News : विकासाच्या मुद्यांवर ढिवर समाजाने संघर्ष करण्याची गरज  : भाई रामदास जराते


आरमोरी : परंपरागत मासेमारीच्या व्यवसायात गुंतलेला ढिवर - भोई समाज मोठ्या संख्येने असूनही शिक्षणाचा अभाव असल्याने संघटीत नाही. त्यामुळे ढिवर समाजाने एकत्र येवून प्रगतीच्या मुद्यांवर संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

आरमोरी तालुक्यातील मौजा शिवणी (बु.) येथील जय वाल्मिकी ॠषी ढिवर समाज मंडळाच्या वतीने मुर्ती प्रतिष्ठापना व जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भाई रामदास जराते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सामाजिक परिस्थिती नुसार समाज उन्नतीसाठी आवश्यक मुद्यांना घेवून संघर्ष केला तरच ढिवर - भोई समाजाच्या अडचणी दूर होवून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण करणे शक्य आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुरुषोत्तम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. दुर्वेश भोयर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून जिल्हा मच्छीमार संघाचे सभापती कृष्णाजी मंचार्लावार तर प्रमुख अतिथी म्हणून मोहनजी मदने, सुनील बावणे, डंबाजी भोयर, किशोर बावणे, मिनाक्षी गेडाम, रोहिदास कुमरे, देवेंद्र भोयर, फुलचंद वाघाडे, काॅ. अमोल मारकवार, केशव बारापात्रे, बंदेलवार, शिवणीचे सरपंच पुरुषोत्तम दोनाडकर, सदस्य गौरीताई बुल्ले, प्रभाताई राऊत, पोलीस पाटील शकुंतला पत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजातील युवकांना संधी देवून ढिवर - भोई समाजाची प्रभावी संघटना बांधणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा मच्छीमार संघाचे सभापती कृष्णाजी मंचार्लावार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी डॉ. दुर्वास भोयर, मोहनजी मदने, फुलचंद वाघाडे, मिनाक्षी गेडाम, काॅ.अमोल मारकवार यांनीही समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा दरम्यान ढिवर - भोई समाज संघटनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भाग्यवान मेश्राम आणि जिल्हा सचिव किशोर बावणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व आभारप्रदर्शन भाग्यवान मेश्राम यांनी तर प्रास्ताविक बळीराम दर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते लोमेश दुमाणे, सदाशिव मेश्राम, प्रभुजी मेश्राम, जयंद्र कांबळे, शामराव मेश्राम,श्री.सचिन ठाकरे, राजेंद्र कोल्हे, हरिजी मेश्राम, राजू पत्रे, प्रकाशी मेश्राम, रमेश ठाकरे, सुनिल कोल्हे, रवींद्र मेश्राम, रवि कोल्हे, लक्ष्मण भोयर, घनश्याम भोयर,तुकडोजी कोल्हे, हरी मेश्राम, केवळजी मेश्राम, मुरलीधर मेश्राम, सुधीर ठाकरे, मनोज मेश्राम यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli News - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत


गडचिरोली,  दि. २७ : जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत माहे नोव्हेंबर, २०२३ या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ रुपये 3 प्रति किलो प्रमाणे, गहू 10 किलो 2 रुपये प्रति किलो प्रमाणे, तर 1 किलो साखर 20 रुपये प्रति किलो प्रमाणे. शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये १००/- तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती 3 किलो तांदुळ 3 रुपये प्रति किलो प्रमाणे, 2 किलो गहू 2 रुपये प्रति किलो प्रमाणे. व शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये १००/-.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत दिनांक ०१ जानेवारी, २०२३ ते ३१.१२.२०२३ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरीता पात्र लाभार्थ्यांना रु.३/- प्रतिकिलो तांदूळ, रु. २/- प्रतिकिलो गहू व रु.१/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना "मोफत वितरीत करावयाचे शासन निर्देश प्राप्त आहे.

तसेच शासन पत्र दिनांक १९.१०.२०२३ अन्वये जिल्हयातील रास्तभाव दुकानामर्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी दिवाळी सणानिमित्त ६ शिधान्निस "आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका १ शिधासंच (१ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहे) या ६ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नसंचाचे माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्याकरीता ई पॉस प्रणालीव्दारे रु.१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्यदुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे नोव्हेंबर, २०२३ या महिन्यातील नियमित देय असलेल्या धान्याची (गहू व तांदूळ) मोफत उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावती रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिशिधापत्रिका १ "आनंदाचा शिधा" रु.१००/- प्रतिसंच ची उचल करावी. दुकानांत एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli News - विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व धनगर समाज प्रवर्गातील नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा


गडचिरोली, दि. २७ : विमुक्त जाती भटक्या जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेऊन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास यादीसह प्रस्ताव सादर करावे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे, या उद्देशाने राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज भटक्या जमाती-क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागात किमान १० कुटुंबासाठी सामुहिक वसाहत योजना राबवून अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यासाठी सक्षम अधिका-यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे १०० रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लाभार्थी कुटुंबाचे स्वतः चे मालकीचे घर, भुखंड असल्याचा पुरावा, नमुना-८ किंवा ७-१२ उतारा दस्त नोंदणीची प्रत, घराचे सद्यास्थितीचे छायाचित्र, ग्रामसभेचा ठराव, अर्जदाराचे आधार ओळखपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, जॉबकार्ड, घरकर पावती आदी कागपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे. अधिक माहितीकरीता ०७१३२-२२२१९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli News - आगामी निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी - जिल्हाधिकारी संजय मिना


गडचिरोली  दि. २७ : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी केले.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९. डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्ष केलेल्या नागरिकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे..

प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुद्धा अचुक आहेत का. याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलांमध्ये दुरूस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांक (१/१/२०२४) मतदार नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकतसुद्धा घेता येते. एखाद्या मतदार संघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदार संघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबंधीत मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते.. मतदार यद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणी महत्वाची असते...

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ व १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाच्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या समाज घटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेचा कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे या समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकतील.

२७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती.

लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

२७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदार संख्या ८ लक्ष २ हजार ७९९ एवढी आहे. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६९.५६ इतकी आहे. २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदारसंख्या ४ लक्ष ६ हजार २६४, स्त्री मतदारसंख्या ३ लक्ष ९६ हजार ५२८ एवढी तर तृतीयपंथी समुदायाची संख्या ७ इतकी आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli News - जात वैधता प्रमाणपत्र त्रृटीबाबत ३१ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन


गडचिरोली, : सन २०२३ २४ या शैक्षणिक सत्रात ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक पाठयक्रमातील, सेवा व निवडणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) आवश्यक त्या दस्ताऐवजासह समितीस दिनांक १६ आक्टोबर २०२३ पर्यंत दाखल केलेले प्रकरणे निकाली (त्रुटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. तरी ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ईमेल आय. डी. वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही, अशी सर्व प्रकरणे त्रुटीत असल्याने अर्जदारानी कार्यालयीन वेळेत दिनांक ३१ आक्टोबर २०२३ रोजी मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

सदर त्रृटीची पुर्तता न केल्यास सर्वस्वी जबाबदारी ही अर्जदाराची राहील. तसेच ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थांनी वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेणे चालू आहे. तरी सर्व अर्जदारांनी कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli News - तृतीय पंथी समुदायाच्या कल्याणकरिता नोंदणी अभियान व हेल्पलाईन


गडचिरोली,  : राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी / ट्रांसजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मूलभुत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या समाज घटकांची सर्वागिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, याकरिता गडचिरोली जिल्हयातील तृतीयपंथीयाच्या संस्था, तृतीयपंथीयांच्या मंडळे व तृतीयपंथीयांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनीसह या कार्यालयात नोंदणी करण्याकरिता, तसेच तृतीयपंथी यांच्या समस्या व तक्रारीचे निवारण करण्याकरीता कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक ०७१३२-२२२१९२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli Armori News- नीलगाईच्या पिल्लास मिळाले जीवनदान


आरमोरी:- नजीकच्या रामाळा येथील आंब्याच्या बनाकडील शेत शिवारात आपल्या आई पासून भटकलेळ्या निलगाईच्या पिलास जंगलात सोडून युवकांनी जीवनदान दिले आहे.

रामाला येथील शुभम सुधाकर नैताम यांच्या शेतात धान्य कापणीचे काम सुरू असून काल २६ ऑक्टोंबर ला दुपारच्या सुमारास धान्य कापणी सुरू असताना अचानक धाण्यामधे नीलगाईचा पिल्लू दडून बसलेला दिसला. त्याला धान्य कापणी करणाऱ्या महिलांनी हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र तो जात नव्हता, याबातची माहिती आरमोरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी अविनाश मेश्राम यांना देण्यात आली. त्यानंतर त्या निलगाईच्या पिलास वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी येथे नेण्यात आले व त्याला कही जखमा वगैरे पाहण्यात आले मात्र त्याला काहीही झालेले नव्हते तर तो अपल्या आईपासून भटकल्याने व कुत्र्यांच्या भीतीने धान्यात दडून बसल्याचे समजून आले. त्यानंतर त्याला त्याच शेतातील जंगल परिसरात सोडून देत जीवनदान देण्यात आले. यावेळी शुभम नैताम, मिथुन धोडरे, अक्षय दामले उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli News-, वाघाची शिकार करणारे गजाआड, वनविभागाची मोठी कारवाई


गडचिरोली -. जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने वाघाची शिकार केल्याची घटना गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील मिर्झा बिटात मंगळवारी (ता. 24 ) उघडकीस आली होती. या घटनेने वनविभागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, शिकार केलेल्या वाघाचे डोकेतीन पंजे गायब होते. त्यामुळे या प्रकरणाचा वनविभागाकडून गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी वनविभागाने 6 शिकारींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद मनोहर मडावी (29, मरेगाव टोली, ता. धानोरा), सुनील उसेंडी (28), दिलीप उसेंडी ( 28 ), प्रकाश हलामी ( 42 ), चेतन आलम ( 25 ) आणि निलेश्वर (रा. मोहटोला ) यांचा समावेश आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनविभागाचे उप वनसंरक्षक मिलिश दत्त, वनरक्षक संकेत वाठोरे करीत आहेत.

विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार केल्यानंतर आरोपींनी वाघाचे डोके व तीन पंजे कापून घेऊन गेले होते. वनविभागाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून 6 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मृत वाघाचे पंजे, नखे आणि दातांसह शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत वाघाचे शीर सापडले नसल्याची माहिती समोर येत आहे...

शुक्रवारी करणार न्यायालयात हजर

वाघाची शिकार करून डोके व पंजे कापण्यात आल्याप्रकरणी वनविभागाने गुरुवारी 6 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संदर्भात अजून आरोपी संख्या वाढेल की काय हे सांगता येत नाही.-   मिलिष शर्मा वन संरक्षक गडचिरोली


PostImage

Rushi Sahare

Oct. 27, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - महर्षी वाल्मीक जयंती उत्सव आजपासून


आरमोरी: महर्षी वाल्मीकी देवस्थान व ढिवर/ भोई समाज आरमोरी च्या वतीने महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मूर्ती अभिषेक व घटस्थापना, सायंकाळी ५ वाजता भजन व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महर्षी वाल्मीक ऋषींच्या प्रतिमेची मिरवणूक, दुपारी ३ वाजता गोपालकाला, सायंकाळी ६ वाजता महाभोजन कार्यक्रम होईल. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अंकुश दुमाने व श्रीराम ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा, तसेच महर्षी वाल्मीक ऋषी यांची भव्य जयंती उत्सवाला सर्व ढिवर व भोई समाज बांधवांनी आपल्या उत्सव व निघणाऱ्या रॅली ची शोभा वाढविण्याकरिता उपस्थित राहण्याची महर्षी वाल्मीक ऋषी संस्थान समिती  कडून आव्हान करण्यात आले आहे. असे आयोजकांनी कळविले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 26, 2023

PostImage

Gadchiroli News -अनुसूचित क्षेत्रातून गावे वगळण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही ! .. नाराज ओबीसींना खुश करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न .. पत्रकार परिषदेत आरोप


 

गडचिरोली :-राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील २८६ गावे वगळले असल्याची माहिती देवून गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी येणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींची दिशाभूल करण्याचे प्रश्न चालविले असल्याची टिका शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केली.

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई रामदास जराते यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केलेला दावा खोडून काढतांना म्हटले की, भारतीय राज्य घटनेच्या कलम २४४(१) नुसार पाचवी अनुसूची अस्तीत्वात आली असून पाचव्या अनुसूचीच्या भाग ख मधील कलम ४ (२) नुसार जनजाती सल्लागार परिषदेला केवळ राज्यपालांनी निर्देश दिल्यास जनजातींच्या कल्याण आणि उन्नती यासंबंधीच्या बाबींवर सल्ला देण्याचे कर्तव्य नमुद केलेले आहे. अनुसूचीत क्षेत्रातून गावे वगळणे किंवा भर घालण्यासाठीचे अधिकार हे केवळ राष्ट्रपतींना आहेत. आणि राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी अजूनतरी यासंबंधाने कोणतेही आदेश निर्गमित केलेले नाही. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला हाताशी घरुन गावे वगळण्याचा आव आणणे हा केवळ येणाऱ्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून ओबीसींच्या मतांसाठी हवा निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टीचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टिकाही भाई रामदास जराते यांनी आहे.

पाचव्या अनुसूचीच्या भाग ग मधील कलम ६ (२) (ख) नुसार कोणत्याही अनुसूचित क्षेत्रात फेरबदल हा सीमांच्या दुरुस्तीच्या रुपाने करु शकण्याची तरतूद आहे. ही तरतूद केवळ नविन राज्य, जिल्हा निर्मीतीसाठीच लागू होते. त्यातही अनुसूचित क्षेत्र वाढविण्याचीच तरतूद आहे. मात्र लोकसंख्येची अट लावून काही गावे वगळण्याची संविधानिक तरतूद नसतांना आम्ही गावे वगळली असा बाऊ करुन आदिवासी विरुध्द गैरआदिवासी असा वाद निर्माण करून ओबीसींची मते मिळतील या आशेने भाजप खटाटोप करीत आहे. जिल्ह्यातील गावे अनुसूचित क्षेत्रात असणे आणि ओबीसींचेआरक्षण याचा काहीही संबंध नसतांनाही २०१४ साली पेसा विरोधी वातावरण निर्माण करून आदिवासी विरुध्द गैरआदिवासी असा वाद भाजपने निर्माण केला आणि डॉ. देवराव होळी आमदार झाले होते. आता त्यांची हवा गोल झाल्याने पुन्हा ती निर्माण करण्यासाठी पेसा कायद्याच्या आडून ओबीसींना मुर्ख बनविण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरु केले आहे. मात्र भाजप सरकारच्या घोरणांना कंटाळलेली ओबीसी जनता भाजपला घडा शिकविणार असल्याचेही भाई रामदास जराते यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समिती सदस्य तुकाराम गेडाम, बिआरएसपीचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी, मारोडाचे सरपंच जगदीश मडावी, तोहगाव ग्रामसभेचे संतोष वड्डे, मुकेश पोटावी, ग्रामसभा केळीगट्टा चे गणेश मट्टामी, नथू उसेंडी  प्रामुख्याने उपस्थित होते.
------------------
 कमी झालेले ओबीसी आरक्षण आणि पेसा कायद्याचा काही संबंध नाही

ओबीसींचे आरक्षण कमी होण्याला पेसा कायदा कारणीभूत असल्याचे सांगून नेहमीच जिल्ह्यात आदिवासी आणि गैरआदिवासी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होते. मात्र पेसा कायद्याच्या कोणत्या कलमात ओबीसींचे आरक्षण कमी करण्याची तरतुद आहे, ते कोणीही का सांगत नाही. नोकर भरती संबंधातील ९ जूनची अधिसूचना ही राज्यपालांनी काढली, त्याला अनुसूचित क्षेत्रातील पदे रिक्त राहणे, कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती कमी असणे, कर्मचाऱ्यांनी कामात रस न घेणे, कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसणे अशी कारणे होती. सदरच्या अधिसुचनेत सुधारणा करण्याचे सोडून सत्ताधारी भाजप या अधिसूचनेचा वापर मतांच्या राजकारणासाठी करुन ओबीसींना पेसाच्या नावाने मुर्ख बनवित असल्याचा घणाघात भाई रामदास जराते यांनी केला.

 अनुसूचित क्षेत्र असल्यामुळेच जिल्ह्यात विकास

गडचिरोली जिल्हा आणि जिल्ह्यातील अनेक गावांचा अनुसूचित क्षेत्रात समावेश असल्याने आजपर्यंत हजारो कोटींचा निधी जिल्ह्याला मिळू शकला आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागात स्वातंत्र्याच्या कित्येक दशकांनी रस्ते, पुल आणि इतर सुविधा निर्माण होवू शकल्या. गोंडवाना विद्यापिठ ५०० कोटी, महिला रुग्णालय १०० कोटी, कृषी महाविद्यालय १०० चिचडोह बॅरेज, कोटगल बॅरेज अशा कित्येक कोटींच्या सुविधा या पेसामुळेच आदिवासी उपयोजनेतून उभ्या झाल्या आहेत. ज्याचा लाभ सर्वांनाच होत आहे. मात्र न वाचताच कायद्याला काही जण बदनाम करीत आहेत. यामध्ये स्थानिकांच्या नोकऱ्या लाटणारे आणि बाहेर जिल्ह्यातून येवून या जिल्ह्यात राजकारण करणारे आघाडीवर आहेत, असा आरोपही भाई रामदास जराते यांनी केला.


PostImage

Rushi Sahare

Oct. 25, 2023

PostImage

Gadchiroli News - फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गतच्या सामान्य ज्ञान चाचणी


गडचिरोली,  दि. २५ : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन २०१९ पासून करण्यात येत आहे. सन २०२२ मध्ये Fit India Quiz २ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळण्याविषयक असलेले ज्ञान, कौशल्य इ. साठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. भारतीय खेळांचा समृद्ध इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू इ. बाबत विद्यार्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश असून यामध्ये रु. ३.२५ कोटींच्या बक्षीसांचे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले.

याप्रमाणेच केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे Quiz ३ चे आयोजन करण्यात येत आहे. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच आहे. पुर्ण भारतभर यासाठी विद्यार्थांची नोंदणी ५ सप्टेंबर, २०२३ पासून सुरु झाली आहे आणि ५ ऑक्टोंबर २०२३ ही नोंदणी करण्यासाठीची शेवटची तारीख होती. परंतु जास्तीत जास्त सहभागाकरीता नोंदणी करण्याच्या अंतिम तारीख दि. ३१ ऑक्टोंबर, २०२३ ही तारीख करण्यात आलेली आहे. सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in/ या कार्यालयीन वेबसाईटवर त्यांच्या विद्यार्थांची नोंदणी करु शकतात.

उपरोक्त प्रश्नमंजुशामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व शाळा यांनी सहभाग नोंदवावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे आवाहन करीत आहेत.


PostImage

Rushi Sahare

Oct. 25, 2023

PostImage

Gadchiroli News - आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना मिळणार दहापट रक्कम


गडचिरोली, दि. २५ : राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडूं आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री  बनसोडे म्हणाले, 19 व्या चीन येथील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस 1 कोटी रूपये, मार्गदर्शकास 10 लक्ष, रौप्यपदका विजत्या खेळाडूसाठी 75 लक्ष रूपये, मार्गदर्शकास 7 लक्ष 50 हजार रुपये, कांस्यपदक प्राप्त खेळाडूस 50 लक्ष रुपये मार्गदर्शकास 5 लक्ष रुपये रोख असे बक्षिस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स ) सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस 75 लक्ष, मार्गदर्शकास 7 लक्ष 50 हजार, रौप्यपदक विजत्या खेळाडूस 50 लक्ष, मार्गदर्शकास 5 लक्ष तर कास्य पदक विजेत्यास 25 लक्ष, मार्गदर्शकास 2 लक्ष 50 हजार देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

यापूर्वी सुवर्णपदकासाठी 10 लाख मार्गदर्शकास 2 लक्ष 50 हजार, रौप्यपदकासाठी 7.5 लाख, मार्गदर्शकास | लक्ष 87 हजार, कांस्यपदकासाठी 5 लाख, मार्गदर्शक 1 लक्ष 25 हजार रुपये दिले जात होते. मात्र आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिक स्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजितदादा पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असे  बनसोडे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसापुर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाची आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा करण्यात आली होती. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री  बनसोडे यांनी यावेळी सांगितले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - विद्युत प्रवाहाने वाघाचा मृत्यू की झाली शिकार... वाघाचे तोंड, तीन पंजे व मिशा गायब


 जंगलात विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याची घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. मृत वाघाचे तोंड आणि तीन पंजे गायब असल्याने या घटनेत शिकार करणाऱ्या टोळीचा हात तर नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली वन विभागांतर्गत चातगाव वनपरिक्षे
त्रातील जंगलात वाघाचा वावर असून, काही
जण ठारदेखील झाले आहेत. विशेषतः अमिर्झा
बिटात वाघाचे अधूनमधून दर्शन होत असते. अशातच
आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका गुराख्याला
जंगलात वाघ मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.
त्याने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर वनाधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली वन विभागाचे उपवन संरक्षक मिलिशदत्त शर्मा व अन्य वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी
केली. मृत वाघाचे तीन पंजे, तोंडाचा जबडा
आणि मिशा गायब होत्या. शिवाय विद्युत
प्रवाहाच्या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू
झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे तपास करीत आहेत. विद्युत प्रवाह रानटी डुकरांसाठी सोडला होता की वाघाची शिकार करण्यासाठी, हे तपासाअंती कळेल. मृत वाघाचे वय ३ ते ४ वर्षे असून, विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भोयर यांनी काढला आहे, अशी माहिती वनविभागाने आज संध्याकाळी उशिरा काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

बावरिया टोळीचा हात ?

बावरिया टोळी वाघाची शिकार करण्यात निष्णात असून, यंदाच्या उन्हाळ्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास पाच वाघांची शिकार केल्याप्रकरणी १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. ही टोळी पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमिर्झा बिटात झालेल्या वाघाच्या शिकारीत बावरिया टोळीचा हात आहे की आणखी कुणाचा, हे तपासाअंती समजेल.


PostImage

Rushi Sahare

Oct. 24, 2023

PostImage

Gadchiroli Chandrapur News - मुलगी व भावाच्या मदतीने पत्नी ने केला पतीचा खून


नगिनाबाग प्रभागात राहणारे 52 वर्षीय नीलकंठ चौधरी असे मृतकाचे नाव आहे, आरोपी मध्ये मृतकाची पत्नी, मुलगी व मेव्हण्याचा समावेश आहे.

विजयादशमी ला सकाळी 8 वाजता मंगला चौधरी यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ विलास लटारु शेंडे रा. सुशी दाबगाव तालुका मूल वरून आला होता, घरी आल्यावर नीलकंठ चौधरी यांनी विलास ला अश्लील शब्दात शिवीगाळी करीत भांडण सुरू केले, वाद वाढत गेला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

त्यावेळी मुलगी शिल्पा ने लोखंडी रॉड व मंगला यांनी बांबू ने नीलकंठ यांच्या डोक्यावर वार केला, ही नेहमीची कटकट आहे, याला मारून टाका असे उदगार विलास ने काढले असता नीलकंठ चा जबर मारहाणीत मृत्यू झाला.

याबाबत रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

यावेळी तपास अधिकारी स्वप्नील गोपाले यांच्या माहिती वरुन  मृतक नीलकंठ मजुरीचे काम करायचा, त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी कुटुंबासोबत भांडण व पत्नी मंगला ला मारहाण करायचा, पत्नी कडील नातेवाईक घरी आले की त्यांना नीलकंठ हाकलून लावायचा, या नित्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी, मुलगी व मेव्हण्याने नीलकंठ ची हत्या केली.

याबाबत तिघांवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - देशी दारू ची अवैद्य वाहतूक करणाऱ्या इसमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या


गडचिरोली जिल्हयामध्ये दारू बंदी असताना काही इसम अवैध्य रित्या दारू विकतात त्यांचे वर अंकुश लावण्या करिता पोलीस कारवाई करीत असतात. खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने एक इसम लाखांदुर येथून देसाईगंज - करखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक  रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, विलेश ढोके, संतोष सराटे, नरेश कुमोटी यांनी सापळा रचून इसम नामे अश्विन भागवत मेंडे वय २३ वर्षे रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली यास पकडले व त्यांचे ताब्यातून १ ) अॅक्टीव्हा निळया रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ यु ४७५६ किं. अं ७००००/- रु. २) रॉयल स्टॅग कंपनीचे डिलक्स व्हिस्की १८० मि.ली. मापाच्या दोन खरड्या रंगाचे बॉक्स ९६ नग सिलबंद निपा किं.अं. २८,८००/-रु. असा एकुण ९८,८००/- रू किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई  पोलीस अधीक्षक  निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी  साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक  किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, संतोष सराटे, विलेश ढोके, नरेश कुमोटी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश राऊत हे करित आहेत.


PostImage

Rushi Sahare

Oct. 24, 2023

PostImage

Gadchiroli Armori News - अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ


 पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2 कि.मी. अंतरावर असणाऱ्या बर्डी येथील जिवानी राईस मिल परिसरात 22 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. बर्डी येथील राहुल तुमसरे यांना जीवानी राईस मिल परिसरात एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. आजूबाजूचे कोणीही त्या व्यक्तीला ओळखत नसल्याने याबाबतची माहिती पोलिस स्टेशन आरमोरी येथे दिली.

पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून सदर इसमास खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले. मृत इसमाच्या अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट आहे. गळ्यात पांढऱ्या रंगाचा धागा बांधलेला आहे. वर्ण सावळा, डोक्यावर पुढील बाजूस टक्कल व मागील बाजूस काळे केस आहेत.

सदर इसम आरमोरी परिसरातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह हा सध्या उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे प्रिसर्व करून ठेवण्यात आला आहे. सदर इसमाची ओळख पटल्यास नातेवाईकांनी पोलिस स्टेशन आरमोरी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार संदीप मंडलिक यांनी केले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 24, 2023

PostImage

Gadchiroli News - मोठा अनर्थ टळला..ट्रक वैनगंगा नदीपात्रात कोसळला..चालक व वाहकास वाचविण्यात यश


 जिल्ह्याला लागून असलेल्या आष्टी येथील वैनगंगा नदीवर आज सायंकाळी सहाच्या सुमारास एक रिकामा ट्रक वैनगंगा नदीमध्ये कोसळला. चालक व वाहक दोघेही नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आष्टी पोलिसांना याची माहिती मिळतात आष्टी पोलिसांनी डोंगा टाकून त्या दोघांना नदीपात्रातून वाचवण्यात यश मिळविले आहे. दोघांनाही सुखरूप वाचवून त्यांना गोंडपिपरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

नदीच्या पुलावर अनेक खड्डे पडलेले आहेत आणि नदीच्या पलीकडे गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथे देशी दारूची दुकाने तसेच अनेक बार  आहेत. ट्रक चालक वाहन थांबवून दारू पिऊन येत असतात. अधिक तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत. 

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 24, 2023

PostImage

Gadchiroli News -आदिवासी समाजाचे भारत देशा करीता अमुल्य योगदान


रामायण,महाभारत,व देशाच्यास्वातंत्र्यात भारताल्या आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे.याची सरकार मध्ये  वन मंत्री म्हणून मी केन्दातील,महाराष्ट्रातील सरकार  सदैव जानीव ठेउन आदिवासी समाजाला न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करतो.मग ते आदिवासी समाजाला बजेटमध्ये 9% निधी असेल,पेसा ग्रामपंचायत करीता 5% अबंध निधी असेल,विर बाबुराव शेडमाके यांचे टपाल तिकीट कडने असेल,कंत्राटदारी पध्दती रद्द करने असेल,गैर आदिवासी ना आदिवासी मध्ये स्थान नदेण्याचा निर्णय असेल,आदिवासी समाजाला केन्द्रात व महाराष्ट्रत पुरेश्या प्रमाणात मंत्री मंडळात स्थान देणे असेल.भगवान बिरसामुंडा यांची शासकीय जयंती साजरा करण्याचा निर्णय असेल,जनजातीगौरव दिवस जाहीर करण्याचा निर्णय असेल किंवा राष्ट्रपती पदी आदिवासी समाजाला सन्मानाने स्थान देण्याचा निर्णय असेल अस मत महाराष्ट्र चे वन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यानी व्यक्त केल

                        आदिवासी गोटुल समीती,गडचिरोली.च्या वतीने गोटुलभुमी चांदाळा रोड गडचिरोली येथे आयोजित "आदिवासी देवतंची महापुजा" "आदिवासींच्या भव्या मेळाव्यात" ते उदघाटक म्हणून बोलत होते

महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतीक, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे गडचिरोलीत आगमणा नंतर जिल्‍हयात आगमन झाले असता ठिकठिकाणी त्‍यांचे आदिवासी पध्‍दतीनुसार व परंपरेनुसार उत्‍स्‍फुर्त स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी जिप्‍सीमध्‍ये त्‍यांची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. तसेच काही ठिकाणी जेसीबी द्वारे पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली. रॅलीमध्‍ये आदिवासी, गोंडी बांधवांकडून ढेमसा नृत्‍य सादर करण्‍यात आले                     

 या सर्व कार्यक्रमात व मंचावर खा अशोक नेते, आ. देवराव होळी, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष प्रा. प्रशांत वाघरे, जिल्‍हाध्‍यक्ष गोटूल समिती नंदू नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली तथा जिल्हाकोषाध्यक्ष, आदिवासी गोटुल समीती, गडचिरोली. रविंद्र ओल्‍लालवार,   एम.एम. आत्राम, कुमरे , मारोतराव इचोडकर, दिलीप चलाख, लताताई पुनघाटे, गोवर्धन चव्‍हाण, डॉ. नरेंद्रचंद्र काटोले, मुक्‍तेश्‍वर काटवे, अँड.  मोहन पुराम, अविनाश पाल, कोडपे, प्रभूदास येरमे,वर्षाताई शेडमाके,लक्ष्मीताई येरमे,मनीषाताई मडावी,सौ कन्नाके ताई व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव,युवक,महिला,नागरिकांची उपस्थिती होती


PostImage

Rushi Sahare

Oct. 23, 2023

PostImage

Gadchiroli News - तुमच्याकडेही असेल 5 रुपयांची अशी नोट, तर तुम्ही व्हाल लखपती..पण काही नियम व अटी मान्य कराव्या लागतील


गूगल वर प्रकाशित बातमी आहे.


आता तुम्हाला एक पाच रुपयांची नोट लखपती बनवू शकते. खरंतर जुन्या नोटा आणि चलनी नाण्यांच्या लिलावातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. देशात विशिष्ट नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारे खूप शौकिन आहेत.

आपल्या छंदासाठी अनेकजण नाणी आणि नोटांसाठी लाखो रुपये मोजण्यास तयार असतात. समजा आता तुमच्याकडे पाच रुपयांची नोट असेल तर तुम्ही घरी बसून 6 लाख रुपयांची कमाई निश्चितपणे करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील.

समजा तुम्ही 5 रुपयांची नोट ठेवली असल्यास तर सर्वात अगोदर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहेत, त्यानंतरच तुम्हाला त्या नोटेची विक्री करता येईल. यामध्ये सर्वात अगोदर या नोटेच्या पुढील बाजूस अनुक्रमांक लिहिलेला असावा, समजा तुम्ही काही कारणास्तव नोट विकण्याची संधी गमावली तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार आहे. जाणून घ्या याबाबत

जाणून घ्या 5 रुपयांच्या नोटेची खासियत

5 रुपयांच्या नोटेची विक्री करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे खूप गरजेचे आहे. सर्वात अगोदर म्हणजे या नोटेच्या पुढील बाजूस अनुक्रमांक 786 लिहिलेला असणे गरजेचे आहे. खरं तर, अनुक्रमांक 786 मुस्लिम समाजात खूप भाग्यवान आणि खूप पवित्र मानण्यात येतो.

तसेच इस्लामिक धर्माच्या लोकांना देखील आनंद आणि समृद्धीसाठी अनुक्रमांक 786 असणाऱ्या नोटा खरेदी करायला खूप आवडतात. समजा जर तुमच्याकडे ही नोट असेल तर नोट विक्री करण्यास उशीर करू नका. ही नोट तुम्ही सहज 6 लाख रुपयांना विकू शकता. इतकेच नाही तर तुम्ही अशा 3 नोटा ठेवल्या असतील तर तुमचे 18 लाख रुपये कमावण्याचे स्वप्न साकार होईल.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 23, 2023

PostImage

Gadchiroli News : शहरातील रस्त्यावर बेवारस भटकंती मनोरुग्णांच्या पुनवर्सन शोध मोहिम


गडचिरोली,  दि. २३: गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि पोलीस प्रशासन तसेच दिव्यवंदना आधार फाऊडेंशन यांच्या संयुक्त विदयमानाने 23 ऑक्टोंबर 2023 रोजी गडचिरोली शहरातील रस्त्यावर बेवारस भटकंती करुन भिक मागुण, वाईट अवस्थेत वावरत असलेल्या मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांच्यावर उपचार करुन त्यांचे पुनवर्सन करण्याकरिता शोध मोहिम राबविण्यात आली. गडचिरोली शहरात दररोज रस्त्यांवर फिरणारे, भिक मागणारे, बरेच मनोरुग्ण फिरतांना दिसतात. अनेक समस्या असल्यामुळे आपण त्यांच्या जवळ जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा त्याचा त्रास सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील काही दिवसात अशीच शोध मोहिम अभियाना राबविण्यात आली होती तेव्हा शहरात फिरणा-या मनोरुग्णांना ताब्यात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांची स्वच्छता करुन न्यायालसमोर सादर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशाअन्वये त्यांच्यावर उपचार करण्याकरिता पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा काही मनोरुग्ण शहरात फिरत असल्याबाबत नागरिकांनी त्यांची माहिती दिली होती त्यानंतर प्रशासनाच्या वतीने आज गडचिरोली शहरातील चंद्रपुर रोड परिसर, गांधी चौक, मारकेट लाईन एरिया, आठवडी बाजार, बस स्टॉप परिसर, पंचायत समीती, लांजेडा एरिया, आरमोरी मार्ग, चामोर्शी मार्ग, याठिकाणी शोधमोहिम अभियान राबवून एकुण 04 मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना दवाखान्यात वैदयकीय उपचार करुन जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. सदर शोधमोहिम अभियान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल, प्राधीकरणाचे सदस्य सचिव आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. अभियान राबवितांना विनोद पाटील जिल्हा परिविक्षा अधिकारी महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली, गडचिरोली पोलिस स्टेशन येथील मेश्राम मेजर व टिम, दिव्यवंदना आधार फाऊडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, सुनिल चौधरी, कांचन निखोडे, प्राची गजभिये पोणिर्मा खोब्रागडे, अस्मीता सरपाते यांनी यशस्वीरीत्या शोधमोहिम अभियान राबविली. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 23, 2023

PostImage

Gadchiroli Armori News : वाघीण T-13 जेरबंद. रामाळा इथ महिलेचा घेतला होता बळी


आरमोरी तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावात दिनांक - १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काळागोटा येथील सात ते आठ महिला शेतात धान कापणी करीत असतांना दबा धरून बसलेली वाघीण टी- १३ हिने अचानकपणे शेतात काम करीत असलेल्या महिलांवर हल्ला चढविला होता. सदर वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात आरमोरी तालुक्याच्या काळागोटा येथील महिला ताराबाई एकनाथ ढोडरे अंदाजे वय ६० वर्षे नामक महिलेस वाघिणीने काही अंतरावर दूर फरफटत नेऊन नरडीचा घोट घेतला होता सहकारी महिलांनी आरडा- ओरड करून महिलेची सुटका तर झाली मात्र ताराबाई यांची प्राणज्योत मावळली होती. महिला मजुराला वाघिणीने ठार केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. लोकांचा रोष पाहून वन विभागाने टी- १३ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाची एक व गडचिरोली येथून दोन रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. वाघिणीचे लोकेशन, पग मार्क शोधण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात २५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.तसेच घटनास्थळाजवळ शिकार सापळे (बेट) सुद्धा लावण्यात आले.शुक्रवारपासूनच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.त्यानुसार रामाळा, चामोर्शी, ठाणेगाव, वैरागड, वनखी, चामोर्शी, रामपूर,आष्टा,कनेरी परिसरातील नागरिकांना जंगलात जाण्यापासून रोखले जात होते. तसेच त्यांच्यात जागृती करण्यासाठी वन विभागतर्फे अभियान राबविण्यात आले. वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदीप भारती, परीविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, आरमोरीचे कार्यतत्पर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम हे टी- १३ वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार आज सोमवार दिनांक- २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या रवी बिटातील मुलूरचक जंगल परिसरातील मधोमध टी- १३ वाघिणीला जेरबंद करण्यात आले असूनपरिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वाघिणीच्या दहशतीतून सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 23, 2023

PostImage

Gadchiroli News : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकित इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याकरिता मुदत वाढ द्या.   - मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष भारतीय कॉंग्रेस कोरची 


कोरची :- तालुक्यात 8 ग्रामपंचायतिचे निवडूका असून उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत 20/10/23 सायंकाळी 5: 30 पर्यंत होती. परंतु आज सकाळपासून कोरची तालुक्यातील इंटरनेट सुविधा बंद असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याकरिता फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे उमेदवारांना अर्ज करण्याकरिता विलंब होत असून ,याकरिता मुदत वाढ देण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून तालुका अध्यक्ष भारतीय कॉंग्रेस कोरची चे मनोज अग्रवाल यांनी तहसीलदार मार्फत जिल्हा अधिकाऱ्यांना केली आहे. 

               निवेदन देतांना कोरची तहसीलकार्यालयाचे नायब तहसीलदार सोनवणे व बोदेले ,तालुका अध्यक्ष भारतीय कॉंग्रेस कोरची चे मनोज अग्रवाल व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Gadchiroli Wadsa News : अवैद्यरित्या दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर  पोलीसांची कारवाई.


गडचिरोली जिल्हयामध्ये सुरू असलेल्या नवरात्रेत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक  नीलोत्पल, यांचे अवैद्य दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक २१/१०/२०२३ रोजी पो.शि. ४०३२ सराटे पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने एक इसम मौजा कोरेगाव येथून कुरखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैद्यरित्या देशी दारूची वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक  रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार ढोके, सराटे यांनी सापळा रचून इसम नामे टिकाराम दुधराम राऊत वय - २४ वर्षे रा. कोरंबी टोला, ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया यास पकडले व त्याचे ताब्यातून १) अॅक्टीव्हा काळया रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ ए ई ३८७१ किं. ७००००/- रु. २) देशी दारु संत्री कंपनीच्या ९० मि.ली. मापाच्या प्लॅस्टीकच्या ४०० नग सिलबंद बॉटल किं.अं. ३२०००/- रु. असा एकुण १,०२,००० /- रु. किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक  रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार संतोष सराटे, विलेश ढोके यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करित आहेत.


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Maharashtra News : गांवात राजकीय पुढाऱ्यांना बंदी.. चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष..


 महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. सरकार आलं पडलं पुन्हा आलं या सर्व गोंधळात सामान्य माणूस भरडला जातो. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न असताना राजकीय नेते मात्र स्वत:चा स्वार्थ साधताना दिसतात. जनतेचं कोणाला काहीच पडलेलं दिसत नाही. अनेक ठिकाणी नागरिक राजकारण्यांवर संताप व्यक्त करताना दिसतात.

महाराष्ट्रातील राजकारणाला वैतागून तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या इगतपुरी तालुक्यातील अधरवड गांवच्या नागरिकांनी राजकारण्यांना थेट गांवात यायची बंदी घातली आहे. गावकऱ्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली असून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.

चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता फक्त मराठा आरक्षण लक्ष अशा पद्धतीचा  बॅनरवर लिहिण्यात आला आहे. व ते बोर्ड गांवयाच्या येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही राज्यातले अनेक.राज्यातील अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना मूलभूत गोष्टींसाठी भांडावं लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी येऊ नये, असा आक्रमक पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. प्रतिक्रिया मराठा समाजाचा शैक्षणिक विचार केला तर मार्क्स असतांना व परिस्थिती नसतांना अवाढव्य रक्कम मोजावी लागते त्या मुळे शिक्षणात समाज अधोगतीला चालला असून समाज उभा करायचा असेल मराठा समाजाला नोकरी ,शैक्षणिक आरक्षण देणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.         

 यावेळेस गांवातील सरपंच ज्ञानेश्र्वर डमाळे, ग्रा.पं.सदस्य  उमेश ब-हे, पोलीस पाटील . ज्ञानेश्वर ब-हे, ज्येष्ठ नागरिक सुरेश ब-हे,डॉ.घन: श्याम ब-हे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ धोंडू ब-हे, नवनाथ ब-हे,संदीप ब-हे,भाऊसाहेब ब-हे,बाळू ब-हे, विष्णू राक्षे,सोपान तळेकर, सोमनाथ ब-हे,अजय ब-हे,सुदाम ब-हे आणि गांवातील सर्व सकल मराठा समाज समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते...


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Gadchiroli wadsa News : अवैधरित्या जुगार खेळणा-या इसमांवर पोलीसांची कारवाई


गडचिरोली जिल्हयामध्ये सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक  नीलोत्पल यांचे अवैधरित्या जुगार खेळणा-यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक २१/१०/२०२३ रोजी पो.शि.५५३८ ढोके पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून नविन लाइज येथील जंगल परिसरात काही इसअवैधरित्या पैशाची बाजी लावून तीन पत्त्याचा हारजीतचा जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक  राशकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर,पोलीस अंमलदार ढोके, पो / अं ४०३२ सराटे, यांनी सापळा रचून इसम नामे १) अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार शेख रा. शिवाजी वार्ड, देसाईगंज जि. गडचिरोली

 २ ) शहेबाज जैनुददीन खान रा. कन्नमवारवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली

३) मिलींद श्रावण फटींग रा. गांधीवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली

 ४) गोवर्धन प्रल्हाद पत्रे रा. चिंचोली ता. ब्रम्हपुरी. जि.चंद्रपूर

 ५) मंगेश तुलसीदास पगाळे रा. हनुमानवार्ड ता. देसाईगंज जि. गडचिरोली

 ६) टिंकु जितेंद्र बडोले.रा. गांधीवार्ड, देसाईगंज जि. गडचिरोली यांस पकडून त्यांचे ताब्यातून १४४८० /- रोख रक्कम व एकुण ०६ दुचाकी वाहने असा मिळून एकुण ४,३४,४८०/- रूपये किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक  निलोत्पल,  अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता,  अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक  किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार संतोष सराटे, विलेश ढोके यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करित आहेत.


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Gadchiroli Armori News : दुर्गा उत्सव बघायला आलेल्या तीन मित्रांचा अपघात... दोन ठार तर एक गंभीर...


आरमोरी - गडचिरोली वरून आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्पर चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोन युवक जागीच ठार तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आरमोरी गडचिरोली मार्गावरील आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावानजीक दिनांक 21 ऑक्टोबरला रात्रौ १० वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक युवकाचे नाव मनीष नेताजी मेश्राम वय वर्षे १९ रा.विकासनगर ता.ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर, सुरज विलास म्हशाखेत्री वय वर्षे 23 रा. इंदिरानगर चंद्रपूर असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव तुषार दशरथ मडावी वय वर्षे 23 राहणार संजयनगर चंद्रपूर असे आहे.

 मृतक सुरज म्हशाखेत्री, मनीष मेश्राम व तुषार मडावी हे तिघे मित्र आरमोरी येथे दुर्गा उत्सव बघण्यासाठी आले होते. हे तिघेही मित्र दुर्गा उत्सव बघून एम.एच. 34 बी. डब्ल्यू. 3702 एन. एस. 220 पल्सर या क्रमांकाच्या मोटरसायकलने आरमोरी वरून गडचिरोली मार्गे जात होते. दरम्यान किटाळी- चुरमुरा गावाजवळ गडचिरोली वरून आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच 33 डब्ल्यू 0555 या क्रमांकाच्या टिप्परच्या चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मनीष मेश्राम, सुरज म्हशाखेत्री हे टिप्पर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तुषार मडावी हा दुचाकीवरून उसळून पडल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व टिप्पर चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅफिक हवालदार पठाण यांनी पंचनामा झाल्यावर मृतकाचे नातेवाईक यांना शव सुपूर्द केले. अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Maharashtra News : ॲड. प्रकाश आंबेडकर व शरद पवार एकत्र आले तर...


वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर महाराष्ट्रात परिवर्तन नांदी नांदेल असे अनेकांचे मत असेल पण  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे एका कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर त्यांनी आपसात सामाजिक विषयावर चर्चा केली  व चहापान घेतले. ही भेट घडवून आणण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेतला. या भेटीतून  महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन जनतेची  इच्छा आहे की, हे दोन मातब्बर नेते  एकत्रित आले तर महाराष्ट्र विकास आघाडी खंबीरपणे अगदी मजबुत होईल व महाराष्ट्रात  सत्ता परिवर्तन नक्कीच होईल  यात शंका नाही . हे दोन्ही नेते एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शंकाना जन्म देऊन जाते यात दुमत नसावे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Gadchiroli News : धरणाचा पुल खचला.. वीस गावातील शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका


महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील पोचमपल्लीनजीक तेलंगणा सरकारच्या कालेश्वरम मेडीगड्डा धरणावरील पुलाचा पाया २१ ऑक्टोबरला रात्री खचल्याने अचानक गोदावरील नदीत विसर्ग केला. त्यामुळे महाराष्ट्रातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे
.महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्रातील शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. या धरणाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा अचानक मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०,२१ व २२ क्रमांकाचे खांब खचले. त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दोन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यत आला.

सिंचन विभागाचे तज्ज्ञ अभियंता व वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत, सध्या युध्दपातळीवर दुरुस्तीकाम सुरु आहे. तथापि, आनक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनू, संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिचंनासाठी विद्युतपंप, पाईप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मडागड्डा प्रकल्प सिराचा तालुक्याताल लोकांसाठी नुकसानकारक आहे. बॅकवॉटरमुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होते. आता पूल खचल्याने अचानक विसर्ग केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीन भरपाई द्यावी. - चंद्रशेखर पुलगम, सामाजिक कार्यकर्ते

मेडीगड्डा धरण तेलंगणाचे अन् नुकसान महाराष्ट्राचे... अशी परिस्थिती आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावेत. सरकारने लोकांचे आयुष्य जोखमीत टाकू नये. परिसरातील सर्व गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन भरपाई तात्काळ द्यावी. - संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

रात्री पुलाचा ही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने रहदारी बंद केली. तेथे सिंचन विभागाकडून दुरुस्तीकाम सुरु आहे. नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे. - जितेंद्र शिकतोडे, तहसीलदार


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Gadchiroli maharashtra News : या गावचा घ्या आदर्श बिनविरोध निवडणूक करून परंपरा केली कायम


नगर तालुक्यातील बारादरी ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम लागलेला असुन आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदी एकमेव व सर्व जागांसाठी तेवढेच अर्ज भरुन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे. बारादरी ग्रामपंचायत मध्ये एक लोकनियुक्त सरपंच व सात जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सरपंच पद महिला राखीव असुन त्या जागेकरिता सौ. सुरेखा संजय पोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी निवड निश्चित झालेली आहे.

तसेच सदस्य पदाकरिता नवनाथ बबन राठोड द्वारका अर्जुन बडे, मंदा बाबासाहेब पोटे, शेख नौशादबी रफिक, पुजा मुरलीधर पोटे, गणेश मिठु गर्जे नितीन बबन वाघचौरे यांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत.

 निवडणुक बिनविरोध झाल्याने गावाच्या विकासावर याचा चांगला परिणाम होणार असुन निवडणुकीमुळे येणारी कटुता संपुष्टात येते व गावातील वातावरण खेळीमेळीचे व सौहार्दाचे राहते त्यामुळे गावामध्ये एकोपा राहतो व त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. गेल्य तीस वर्षापासुन प्रत्येकवेळी बारदरी गावात बिनविरोध निकवडणुक परंपरा कायम आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 22, 2023

PostImage

Gadchiroli Gondia News:घरा-घरातुन माती संकलन व पंचप्राण प्रतिज्ञा अभियान 


गोंदिया - मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत आज गोंदिया तालुक्यातील ग्रामीण भागात माती संकलन आणि पंचप्राण प्रतिज्ञा अभियान राबविण्यात आले. या अभियानात खा. सुनील मेंढे यांनी सहभागी होवून, नागरिकांना उपक्रमाचे महत्व पटवून दिले. विविध ठिकाणी जाहीर सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

देशा प्रती स्वाभिमान जागृत व्हावा आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण चिरकाल स्मृतीत राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत देशभरातील गावागावातून आणि घरातून संकलित माती दिल्ली येथे नेली जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज गोंदिया तालुक्यातील कुडवा, कटंगी, रावणवाडी, नागरा, सावली, रजेगाव, सतोना, बिरसोला, काटी, तेवढा, दासगाव, गिरोला, पांढराबोडी येथे माती संकलन व पंचप्राण प्रतिज्ञा अभियान राबविण्यात आले. यावेळी तयार करण्यात आलेल्या रथाच्या माध्यमातून उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. दरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी प्रत्येक गावात  घरोघरी जात माती संकलन केले. जाहीर कार्यक्रमात गावकऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खासदार सुनील मेंढे यांनी हे अभियान म्हणजे मातृभूमी प्रति स्वाभिमान आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या विरांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष येशूलालजी उपराडे, माजी आमदार गोपलदासजी अग्रवाल, 
संजयजी टेंभरे सभापती, जि.प गोंदिया, नेतरामजी कटरे माजी अध्यक्ष जि.प गोंदिया, विजयजी शिवणकर लोकसभा प्रमुख भंडारा-गोंदिया, सुनीलजी केलंका जिल्हा महामंत्री भाजपा गोंदिया, नंदुभाऊ बिसेन जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, धनलालजी ठाकरे तालुका अध्यक्ष भाजपा गोंदिया, धर्मिष्ठाताई शेंगर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, अमितजी झा शहर अध्यक्ष भाजपा गोंदिया, गजेंद्रजी फुंडे जिल्हा अध्यक्ष ओ. बी.सी भाजपा आघाडी, योगराजजी राहंगडाले जिल्हा परिषद प्रमुख नागरा, अर्जुन नागपुरे, कुणालजी बिसेन, तीजेशजी गौतम, पुरुजी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य, पं. स सदस्य, सरपंच, उपसरपंच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Oct. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - एस.आर.पी.एफ. मुख्यालयात पोलिस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली


 व्यसनमुक्तीकुटूंब समुपदेशन कार्यक्रमाचेही आयोजन

गडचिरोली,  दि. २१ : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा, ता. वडसा येथील गट मुख्यालयात समादेशक विवेक मासाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहीद पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी केन्द्रीय राखीव पोलीस दलातील १० जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात १० जवानांनार वीरगती प्राप्त झाली. वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनिय शौर्यापासून इतरांना स्फुती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी. म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने वडसा येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ शहीद पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच "सर्च" संस्था गडचिरोली अंतर्गत मुक्तिपथ अभियान कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. गडचिरोली जिल्हयातील बाराही तालुक्यामध्ये दारु आणि तंबाखूचे प्रमाण कमी करण्याकरिता सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गट क्र. १३ येथे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार करिता व्यसनमुक्ती व कुटूंब समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता प्राजू गायकवाड, संघटक भारती उपाध्याय, संयोजक नयना घुंगुसकर,संयोजक स्वप्निल बावणे आदी उपस्थित होते. त्यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांना व्यसनमुक्ती व कुटुंब समुपदेशनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच सदर कार्यक्रमाकरीता गटाचे समादेशक सहाय्यक ललित मिश्रा, सहाय्यक समादेशक मारोती लांबेवार, पोलीस निरिक्षक (मुख्यालय) संजय गाडेकर, पोलीस निरिक्षक (कल्याण) मनोज परिहार, पोलिस उपनिरीक्षक निलेश फणसे,चंद्रशेखर धनविज व तुकाराम ढाले उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्व पोलीस अमलदारांना,समादेशक सहाय्यक ललित मिश्रा यानी मोलाचे मार्गदर्शन केले. भविष्यातही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ वडसा येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ललित मिश्रा यांनी सांगितले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 21, 2023

PostImage

Kurkheda News: हिंस्त्र पशु ने केलेल्या हल्यात महिला ठार


कुरखेडा तालुक्यातील  ढुशी या गावातील शेतशिवारात  शेतीवर गवत कापण्या करिता गेलेल्या महिलेवर हिंस्त्र पशू ने अचानक हल्ला करुन ठार केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

                प्राप्त माहितीनुसार सायत्रा अंतराम बोगा असे  महिलेचे नाव असुन ती धुशि ता.कुरखेडा येथील रहिवासी असल्याचे समजते. सदर घटनेची माहीती मीडताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मोका चौकशी करून पंचनामा केला असल्याचे समजते.

               सदर महिला धूशी येथील शेत शिवारात गवत कापणीच्या कामाकरता गेली असताना कक्ष क्र.२७८ वनपरिक्षेत्र देलनवाडी राऊंड सोन्सरी येथील जंगल परिसरात लपुन बसलेल्या हिंस्त्र पशूने महीलेवर अचानक बेसावध हल्ला करुन ठार केले ही घटना आज दी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०:३० वाजताच्या सुमारास घडली. 

                   सदर घटनेमुळे परिसरातील जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले असून शेतीचे काम करायची कशी असा प्रश्न शेतकर्‍यांत निर्माण झाला आहे. यावर वनविभागाने जातीने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी सदर सबंधित हिंस्त्र पशू जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 21, 2023

PostImage

Gadchiroli News - कंत्राटी पदभरतीचा जीआर काढणाऱ्या महाविकास आघाडीचा भाजपकडून निषेध


त्यांच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही- खासदार अशोक नेते

गडचिरोली : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी पदभरतीचा जीआर विद्यमान महायुती सरकारने रद्द केल्यानंतर शनिवारी भाजपच्या वतीने इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून महाविकास आघाडीचा निषेध केला. शरद पवारांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. स्वत: सारे करुन आमच्याविरुद्ध आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे, युवकांची माथी भडकावून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यानंतर सुद्धा उघडे पाडणार, असा ईशारा यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, वर्षा शेडमाके, पल्लवी बारापात्रे, कविता उरकुडे, सुधाकर पेटकर, मधुकर भांडेकर, बंडू झाडे, दीपक सातपुते, विवेक बैस, विनोद देवोजवार, रविंद्र भोयर, डंबाजी झरकर, गणेश दहेलकर, हर्षल गेडाम, आशिष रोहणकर, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2003 पासून सुरू आहे कंत्राटी भरती

2003 पासून राज्यात कंत्राटी भरती सुरू आहे. 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सर्वशिक्षण मोहीमेत, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, तांत्रिक पदे, लिपिक, शिपाई यांची 2010 पासून 400 पदे, तेच मुख्यमंत्री असताना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात 2010 पासून वाहनचालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लेखा लिपिक, शिपाई, साधनव्यक्ती, प्रकल्प समन्वयक, विशेष शिक्षक, मोबाईल टीचर आदी 6000 पदे भरली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2011 मध्ये 405 एमआयएस को-ऑर्डिनेटर, 405 डेटा एन्ट्री ऑपरेटर, 2156 लेखापाल आणि सहाय्यक पदे, तसेच राजीव गांधी जीवनदायिनी योजनेत कंत्राटी पदभरती केली. 2013 मध्ये सामाजिक न्याय विभागात समतादूत, सफाईगार, लिपीक, विशेष कार्य अधिकारी, वाहनचालक, शिपाई, तालुका समन्वयक, वसतिगृह रक्षक, प्रकल्प अधिकारी, स्वयंपाकी इत्यादी 1069 पदे, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदिवासी विकास विभागात 2020 पासून 300 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. 

आता जो विषय सुरु झाला ती संपूर्ण प्रक्रिया, सप्टेंबर 2021 पासून सुरु झाली. त्यात 1 सप्टेंबर 2021 रोजी आरपीएफ मसुद्याला सरकारची मान्यता, 2 सप्टेंबर 2021 रोजी महाटेंडर पोर्टलवर आरपीएफ मसुदा प्रकाशित झाला. 9 सप्टेंबर 2021 रोजी निविदापूर्व बैठक, 31 जानेवारी 2022 रोजी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत होती. 25 एप्रिल 2022 रोजी एजन्सीसोबत वाटाघाटीची पहिली बैठक, 27 एप्रिल रोजी दुसरी बैठक झाली आणि 23 मे 2022 रोजी वित्त विभागाने मान्यता दिली. महाराष्ट्रात कंत्राटी भरतीसाठी जे दोषी आहेत, तेच आज गदारोळ करीत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.

कंत्राटी भरतीचे 100 टक्के पाप हे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आता त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, त्यांनी ती न मागितल्यास आम्ही त्यांना जनतेत उघडे पाडू, अशी भावना व्यक्त करण्यात आली.


PostImage

Rushi Sahare

Oct. 21, 2023

PostImage

Mumbai News : अखेर राज्यातील कंत्राटी नोकर भरती जी आर रद्द


बेरोजगारांच्या तीव्र विरोधनेच या सरकार ने जी आर रद्द केला - विजय वडेट्टीवार 
 

मुंबई - राज्यातील कंत्राटी नोकरभरतीबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, बेरोजगारांच्या तीव्र विरोधामुळे अखेर या सरकारला जीआर रद्द करणे भाग पडले.  राज्यभरात तरुणांनी आंदोलने केली आणि पेचप्रसंगातून स्वतःला वाचवण्यासाठी सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन.  शेवटचा जीआर आपणच काढला आणि आता आपणच अर्थमंत्री असल्याचे ते म्हणाले.  काँग्रेसने अ, व्ही आणि ड संवर्गातील 15 संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या सरकारने शिपाई, अभियंता, तहसीलदार आणि पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आणि ती रद्द करावी लागली.

 *दुबईहून चालणारी कंपनी* 

 वडेट्टीवार म्हणाले की, आघाडीच्या काळात 9 कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली, तेव्हा भाजप विरोधात होता.  मग त्यांनी विरोध केला नाही कारण कंपनीचे हित भाजप आणि पुण्याशी संबंधित आहे.  ब्रिक्स ही कंपनी कोणाची आहे हे उघड झाले पाहिजे.  दुबईत एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असून तेथूनच कंपनीचा कारभार सुरू आहे.  या कंपन्याकंपनीने 134 कोटी रुपये जमा केले तिजोरीत गेले.  त्यात किती वाटा घ्यायचा हे देखील सार्वजनिक करा.

 राज्यात 27,000 ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर
 दरमहा 12,500 रुपये पगार निश्चित केला
गेले पण 6,900 अशा प्रकारे दिले आहेत,

या कडे कोण लक्ष देणार?


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, आदिवासी बांधवाचा आक्रोश मोर्चा.......


 

गडचिरोली :- विशाल जनसागर मोर्चा ज्याने आजपर्यंत चे सर्व रेकॉर्ड मोडले

खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये गैरआदिवासी धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणीसाठी जिल्ह्यातील २५ आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हजारो आदिवासी बांधवांनी शुक्रवार दी. २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा धडकला.

          गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातून आदिवासींच्या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'आरक्षण आमच्या हक्काचा..., आदिवासी बचाओ, संविधान बचाओ, जय सेवा, भारत माता की जय' यासह विविध घोषणा मोर्चेकरूंनी दिल्या. विविध घोषणांनी शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन येत होते. 

           जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोर्चेकरूंसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प., जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील विविध रस्ते पोलिसांनी बंद केले होते. कसलाही अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी केवळ नवेगाव टी-पॉइंट ते सोनापूर रस्ता सुरू ठेवला होता. 

             आंदोलनात आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, तसेच काँग्रेसचे नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे, विकास कोडापे, नंदू नरोटे, डॉ. नितिन कोडवते, छगन शेडमाके, माधव गावळ, भरत येरमे, कुणाल कोवे, सैनू गोटा, सदानंद ताराम, दौलत धुर्वे, गंगाधर मडावी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य व आदिवासीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

                  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध घोषणा दिल्या त्यानंतर संयोजक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या नेतृत्वात विविध २६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 
              यावेळी समितीचे सचिव भरत येरमे, कार्याध्यक्ष माधवराव गावळ, उपाध्यक्ष प्रशांत मडावी, सहसचिव गुलाबराव मडावी, कोषाध्यक्ष नामदेव उसेंडी, चंद्रकुमार उसेंडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News : वन विभागाच्या धाडीत दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त


घोट वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र मक्केपल्ली मधील नियतक्षेत्र कोठरी - २ वनखंड क्रमांक ५७७ मधील अरण्यवास बुध्द विहार येथे सागवान व रेती अवैधरित्या साठवून ठेवली असल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून एकंदरीत २ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आघारावर वनकर्मचाऱ्यांची चमू तयार करुन धाड टाकली असता सदर ठिकाणी सागवान फ्रेम १४ नग ०.३७६ घ.मी., साग चिराण माल ९ नग ०.१६६ घ.मी. इतर किसम फाटे तसेच ३०.८९ ब्रॉस रेती साठा अवैधरित्या जमा करुन ठेवल्याचे निदर्शनास आले. वनाधिकाऱ्यांनी २ लाख पन्नास हजार रु.किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 ही कार्यवाही आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी आलापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . सदर कार्यवाहीमध्ये गडचिरोली वनविभागाचे विभागीय वनाधिकारी पाटोळे, घोटचे वनपरीक्षेत्र अधिकारी . एस. वाडीघरे, मकेपल्लीचे क्षेत्रसहाय्यक ए. गुज्जेवार, वनपाल पि. के. इटकेलवार, वनपाल व्हि. एम. ठाकरे, आर. आर. मेश्राम, वनपाल ए. एस. येनगंटीवार, उसेंडी, धुळे, राठोड, कोठारे, परसा. मानकर, भसारकर, मडावी, तुमरेटी तसेच इतर वनकर्मचारी सहभागी झाले होते. पुढील तपास घोट वनपरीक्षेत्रातील अधिकारी करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. 


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News : जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू


गडचिरोली, दि. २० : गडचिरोली जिल्ह्यात दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पासुन नवरात्र उत्सव व दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी दसरा (विजया दशमी) उस्तव साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ व दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्तीसगढ राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक असल्याने सदर निवडणूक दरम्यान नक्षलवादी सीमावर्ती भागात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक १९.१०.२०२३ चे ००.०१ वा. ते दिनांक ०२.११.२०२३ चे २४.०० वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक १९.१०.२०२३ चे ००.०१ वा. ते दिनांक ०२.११.२०२३ चे २४.०० वा. पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे.

शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक १९.१०.२०२३ चे ००.०१ वा. ते दिनांक ०२.११.२०२३ चे २४.०० वा. पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही.

सदर आदेश दिनांक १९.१०.२०२३ चे ००.०१ वा. ते दिनांक ०२.११.२०२३ चे २४.०० वा. वाजेपावेतो संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News :वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा


गडचिरोली, दि. २० : वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी चंद्रपूरहून मोटारीने गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी गोटुल भूमी, चांदाळा रोड, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी महाराजा पॅलेस लॉन, धानोरा रोड गडचिरोली येथे आगमन व ग्रामसभा व जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी मोटारीने गडचिरोलीहून मार्कंडाकडे प्रयाण. दुपारी मार्कंडा येथे आगमन व श्रीक्षेत्र मार्कंडा देवस्थान विकास आराखडा आढावा बैठकीस मार्कंडा देवस्थान परिसर येथे उपस्थिती. सायं. मोटारीने गडचिरोलीहून चंद्रपूरकडे प्रयाण.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News: बार्टी पुणे मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री


गडचिरोली, दि. २० : ६७ वा धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत, उपकेंद्र नागपूर मार्फत दि. २३ व २४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे स्टॉल क्रमांक २६२ व २६३ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार ग्रंथाचे ८५ टक्के सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 सोबतच सामाजिक न्याय भवन येथे बार्टीच्या विविध योजनांची माहीती सांगण्यात येणार आहे. योजनांशी सबंधीत माहितीपत्राचे वाटपही केल्या जाणार आहे.

दिनांक २३ ऑक्टोबर रोजी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात सकाळी दहा वाजता सामाजिक न्याय भवन ते दीक्षाभूमी असे समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजिक न्यायभवन येथे भिमवादळ या ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आहे. दुपारी तीन नंतर सामाजिक न्याय भवन येथे खुल्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

संध्याकाळी पाच नंतर संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व कार्यक्रमात अधिक संख्येनी नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंचालक बार्टी तर्फे करण्यात आलेले आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रवर्ग जाहीर


गडचिरोली, दि. २० राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक- माह जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूक न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचातीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी पुढीलप्रमाणे आरक्षण प्रवर्ग जाहीर करण्यात आले आहे..

अहेरी तालुक्यातील आलमारी ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण, अनु. जमाती स्त्री सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण प्रवर्ग आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुजाती स्त्री आज सर्वसाधारण, अ.ज. स्त्री, प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ.ज. सर्वसाधारण, अ.ज. स्त्री. सर्वसाधारण आरक्षण प्रवर्ग आहेत. राजाराम ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये अ. सर्वसाधारण, अ.ज. स्वा. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ मध्ये अ.ज. सर्वसाधारण, अण. स्त्री. अ.ज. स्व. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ.जा. स्त्री, अ.ज. सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री.कॉड ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये अण. सर्वसाधारण, आदा ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये अ.ज. रखी. पल्लं ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये अ. स्त्री राखीव प्रभाग क्रमांक मध्ये रेगुलग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ.ज. स्त्री असे आरक्षण प्रवर्ग आहेत. निवडणूकीचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत तहसिलदार यांनी नीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक ०६/१०/२०२३(शुक्रवार). नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ ( मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी दिनांक १६/१०/२०२३ (सोमवार) ते दिनांक २०/१०/२०२३ (शुक्रवार) सकाळी ११.०० ते दु ३.०० वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय आहे ) दिनांक २३/१०/२०२३ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० वाजतापासून छाननी संपेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) दिनांक २५/१०/२०२३ (वार वेळ दुपारी २.०० वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद करण्याचा दिनांक व वेळ दिनांक २५/१०/२०२३ (बुधवार) वेळ दुपारी ३.०० वाजेनंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०५/११/२०२३ (रविवार) सकाळी ७.३० वा. पासून ते दुपारी ३.०० वा. पर्यंत आहे.

१) अहेरी तालुक्यातील सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक ०३/१०/२०२३पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.

 २) संभाव्य उमेदवारांना सॉप्टवेअर द्वारेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र भरणे अनिवार्य असल्यामुळे http://panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे. या करीता अहेरी तालुक्यातील महाऑनलाईन सुविधा केंद्रात नामनिर्देशपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. त्यामध्ये उमेदवारांनी स्वतःची नोदणी करून घ्यावी व नामनिर्देशनपत्राची घोषणापत्राची माहिती भरून त्याचे प्रिंट आऊट काढावे व त्यावर स्वाक्षरी / अंगठा करून निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे.

३) संभाव्य उमेदवारांना पारंपारीक पदतीने नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे असल्याने कार्यालयातून नामनिर्देशन पत्र प्राप्त करून परिपूर्ण भरून स्वाक्षरी / अंगठा करून निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे.

४) उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी नामनिर्देशपत्र, मत्ता व दायित्त तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीव घोषणापत्र आवश्यक प्रमाण सत्यप्रती तसेच राखीव जागेकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वैचता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व निवडूण आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावी.

५) नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाच्या घोषणापत्रातील कोणत्याही रकान्याची माहिती कारो न ठेवता संपूर्ण रकान्याची माहिती भरणेत यावी. 

६) ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या उमेदवाराने करावयाची सुधारीत मर्यादा सदस्य संख्या ७ ते ९ करिता २५,००० रुपये १११३ सदस्य संख्या ३५,००० रुपयेच १५ ते १७ सदस्य संख्या करीता ५०००० आहे. 

७) ग्रामपंचायत आवलमारी व राजाराम येथिल सदस्य पद / चेट सरपंच पदाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे..

८) ग्रामपंचायत रंदा पाल्ले व रेगुलचाही पोथल रिक्त सदस्य पदाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करणा-याउमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे.

 ९) नामनिर्देशन पत्रासोबत अनु. जाती किंवा अनुजमाती यांच्यासाठी राखीव जागेकरीता रूपये १०० (अक्षरी रुपये शंभर फक्त) व सर्वसाधारण जागेकरीता रुपये ५००अक्षरी रुपये पाचशे फक्त) एवढी अनामत रक्कम रोखाने भरणे अनिवार्य आहे.

१०) नामनिर्देशनपत्र दाखल करणा-याउमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

११) उमेदवार दुस-या प्रभागातील मतदार असल्यास त्याबाबतचा सातबारा सोबत जोडणे आवश्यक आहे. १२) केंद्र व राज्य शासनाकडून कोविड-१९ च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक  उपाययोजना व दक्षता घेण्याबाबतच्या सूचना/निबंध लागू झाल्यास मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 

१३)नामनिर्देशनपत्रासोबत अपत्याबाबत घोषणापत्र व शौच्छालयाचा वापर करीत असल्याबाबत सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र जोडावे असे तहसिलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Chandrapur News : महाकाली महोत्सवात "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचे आयोजन. 


 Gadchiroli : गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागड च्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या  "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचा प्रयोग दि . २१ ऑक्टोंबर २०२३ ला दु . २ वा. चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात भव्य दिव्य स्वरुपात सादर होत असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने या नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत आहेत.

             झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून, प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी  त्यांच्या लोकजागृती संस्था, चंद्रपूर च्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे.
           सिनेस्टार मुन्ना बिके, निखिल मानकर, राजरत्न पेटकर,  संजीव रामटेके, सुरज चौधरी, गुरू मोहूर्ले, अविनाश कडूकर, अमित दुर्गे, यश शेंडे, वेदांत मेहता, अंकुश शेडमाके, भाष्कर मडावी, शुभम गुरनुले, गणेश मडावी, मयुर मस्के, अनुराग मुळे, स्नेहल वाडगुरे इ. पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम, रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे, प्रियंका सिडाम, माधुरी ढोरे, मनिषा बावणे, प्रविण लाडवे, संजना येलेकर, राजश्री, स्मिता, भावना इत्यादी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली यांचे "नाट्य प्रशिक्षण शाळेत" प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत. रेला नृत्य, आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर साकारणारे क्रांतियुध्द अंगावर रोमांच उभे करणारे आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News :अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार तर पत्नी गंभीर जखमी ..



लग्नाला झाले होते फक्त सात महिने

Gadchiroli दि: 20- विवाहानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या युवकाला विवाह झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच अपघातात जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना घडली.

चंद्रपूर येथून महाकाली मातेचे दर्शन घेऊन आपल्या पत्नीसह दुचाकीचे परत येत असताना सावली जवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 19 ऑक्टोंबर गुरुवारी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली प्रमोद देवराव जयपूरकर रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली असेअपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर प्रणाली प्रमोद जयपूरकर वय 23 वर्ष असे गंभीर जखमी चे नाव आहे.

 आष्टी येथील प्रमोद जयपूरकर हा गडचिरोली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात कंत्राटी आर्किटेक्टर म्हणून कार्यरत होता. तो आपल्या पत्नीसह चंद्रपूर येथे महाकाली मंदिरात आयोजीत कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेला होता तिथून तो दुचाकी क्रमांक एम एच ३३ यु ३६०८ ने परत गडचिरोली कडे येत असताना सावलीजवळपास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यात प्रमोद जयपुरकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी प्रणाली हीचा पायाला जबर मार लागला. तीला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


प्रमोद याचा विवाह तेलंगणातील प्रणाली हिच्याशी मार्च महिन्यातच पार पडला विवाहाला केवळ सात महिने पार पडले असताना दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असताना प्रमोद च्या अशा अकाली जाण्याने जयपूरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो मनमिळावू स्वभावाचा म्हणून परिचित होता. या घटनेची आष्टी येथे माहिती कळताच एकच शोककळा पसरली असून त्याच्या मागे पत्नी, आई, वडील, मोठा भाऊ, बहीण असा आप्तपरीवार आहे.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Armori News : बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम


 

आरमोरी -
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन, दिल्ली आणि अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील २५ गावांमध्ये १६ आक्टोंबर बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून  शपथ देणे, रॅली काढणे तसेच गावातील महिला, युवक, युवती यांचे सहकार्याने कॅंडल मार्च काढणे, जेणेकरून गावातील लोकांना बाल विवाहाचे दुष्परिणाम काय आहेत, मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी करू नये तसेच मुलाचे लग्न २१ वर्षांपूर्वी करू नये याची माहिती व्हावी व बाल विवाह प्रथेला आळा बसावा. बाल विवाह मुक्त भारत अभियानात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,पेसा मोबिलायझर, उमेद प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन अकिल शेख सचिव-अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्ये निकेश ताडाम,  प्रेमिला कुमोटी, मंदिरा किरंगे यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023

PostImage

Gadchiroli News : रानटी हत्तीचा दुसरा बळी शेतकरी... बाप लेकाचा संसार उद्ध्वस्त


गडचिरोली : छत्तीसगड मधून गडचिरोली जिल्ह्यात आलेले रानटी हत्ती कोरची, कुरखेडा, आरमोरी तालुक्यात धुडघुस घालून आता गडचिरोली तालुक्यात हैदोस माजवित आहेत. एका वन कर्मचारी चा बळी घेऊन आता घेतला शेतकऱ्याचा बळी.

धान कापणी करायची आहे. रानटी हत्तींकडून धानपिकाची नासधूस होऊ नये म्हणून हत्तींच्या कळपाला जंगलाच्या दिशेने पांगविण्यासाठी गेलेल्या दिभना येथील होमाजी बाबाजी गुरनुले (५५) यांचा रानटी हत्तीने आपटून व चिरडून बळी घेतला. हत्तींनी परिसरातील शेतकऱ्यांचे धान तर तुडविलेच; नव्वद वर्षीय वयोवृद्ध बाबाजी नानाजी गुरनुले यांची म्हातारपणाची काठी राहिलेला त्यांचा मुलगा होमाजी यांनाही हिरावून घेतले. आरमोरी तालुक्यातून पहिल्यांदाच गडचिरोली तालुक्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींनी काटली, साखरा गोगावच्या जंगलातून दिभना जंगलात सोमवारी प्रवेश केला. याच दिवशी दिभनापासून दोन किमी अंतरावरील काही शेतकऱ्यांच्या धानाची नासधूस केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिभना अमिर्झा मार्गावरील एका बोडीलगतच्या शेतांमध्ये धुडगूस घातला. ही बाब माहीत होताच दिभनातील जवळपास १५-२० शेतकरी सायंकाळी ७ वाजता हत्तींना जंगलात पांगविण्यासाठी गेले. हत्तींचा कळप जेफ्रा च्या दिशेने पूर्वेकडे जात होता.त्याच्यामागे हे शेतकरी होते. मागेहून होमाजी गुरनुले व अशोक कुमरे हे दोघे जात होते. याच वेळी पश्चिमेकडून तीन हत्ती आले. यापैकीच एका हत्तीने अशोक कुमरे यांना सोंडेने उचलून फेकले, तर होमाजी गुरनुले यांना उचलून आपटले. होमाजी हे पळू शकले नाहीत. त्यामुळे हत्तीने त्यांना पायाखाली घेतले. यात त्यांचे शरीर भिन्नविच्छिन्न झाले.

बाप-लेकाचा संसार झाला उध्वस्त ..

बाबाजी गुरनुले यांना एक मुलगा व मुलगी, होमाजी यांचा दोनदा विवाह झाला; परंतु तो काही कारणास्तव टिकला नाही. त्यामुळे बाबाजी व होमाजी या दोघांचाच कौटुंबिक संसार सुरू होता. वडिलोपार्जित थोडी-फार असलेली शेती ते कसत होते. आता बाबाजीच्या जगण्याची उमेदव संपली आहे. मिळणारे पंचवीस लाख मातीमोल...

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 19, 2023

PostImage

Gadchiroli News : पंतप्रधानांच्या हस्ते जिल्ह्यातील १२ ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन


गडचिरोली,  दि. १९ : आजच्या तरुण तरुणींना शिक्षणासोबतच कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना - रोजगाराभिमुख करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १२ केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यात विसोरा असरअली, गेंदा, मुरुमगाव, पोर्ला, आष्टी, कढोली, वैरागड, सुंदरनगर, कोटगुल, आरेवाडा आणि आलापल्ली येथील ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा समावेश आहे.

वैरागड येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते उपस्थित होते. तर पोर्ल येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच वैरागड येथे जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, आरमोरीचे तहसीलदार माने यांच्यासह वैरागडचे सरपंच, उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, जगात भारतातील कार्यक्षम आणि प्रशिक्षित युवकांची मागणी वाढली आहे. बांधकाम, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, वाहतूक व संदर्भीय सेवा या क्षेत्रात विशेष मागणी आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण तरूणी रोजगाराभिमुख प्रशिक्षित होतील. महाराष्ट्रात बांधकाम आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठे काम असल्यामुळे भविष्यातही अनेक केंद्र स्थापन होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने लघु प्रशिक्षणाकडेसुध्दा लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी प्रशिक्षणाचे ऑनलाईन सत्र आयोजित करावे. प्रशिक्षित लोकांना उद्योगांचे प्रथम प्राधान्य असते. भारतात केंद्र सरकारने कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून वेगळे बजेट त्यासाठी दिले आहे. कौशल्य विकासाचा सर्वाधिक लाभ गरीब कुटुंबांना होतो. केंद्र सरकारने पी.एम. विश्वकर्मा योजना सुरू केली असून यासाठी १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातून ही योजना पुढे जाणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

 


PostImage

Rushi Sahare

Oct. 19, 2023

PostImage

Gadchiroli News : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जिल्हा दौरा


गडचिरोली, दि. १९ : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे मोटारीने प्रयाण. सकाळी प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने सिरोंचा हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी सिरोंचा हेलिपॅड येथे आगमन व रंगापल्ली, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मोटारीने प्रयाण. सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, रंगापल्ली येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी रंगापल्ली येथून राजराजेश्वरी लॉन, सिरोंचाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी राजराजेश्वरी लॉन, सिरोंचा येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी स्नेहधर्म बंगला, सिरोंचाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी स्नेहधर्म बंगला, सिरोंचा येथे आगमन व राखीव. दुपारी सिरोंचा हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व उपजिल्हा रुग्णालय, अहेरीकडे प्रयाण. दुपारी उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी राजवाडा निवासस्थान अहेरी येथून स्नेहा लॉनकडे प्रयाण व तेथील कार्यक्रमास उपस्थिती. रात्री राजवाडा निवासस्थान, अहेरीकडे प्रयाण. रात्री राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व मुक्काम.


PostImage

Rushi Sahare

Oct. 19, 2023

PostImage

Gadchiroli News : संपाच्या 2 ऱ्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे विशाल धरणे आंदोलन


 Gadchiroli .शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा,किमान वेतन,दिवाळी भाऊबीज लागू करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा आयटक चा इशारा!

 

गडचिरोली:- महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटक च्या वतीने गट प्रवर्तक कर्मचारी यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनश्रेणी,वार्षिक वेतन वाढ,अनुभव बोनस तर आशा वर्कर ला किमान वेतन,दिवाळी भाऊबीज आणि ऑनलाईन कामावर बहिष्कार या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालय वर विशाल धरणे आंदोलन करत आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी तीव्र नारेबाजी  करून सरकारवर रोष व्यक्त केला. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन दिले.यापूर्वी सुधा मोर्चा काढून मागण्या मंजूर कराव्यात याकरिता अनेकदा निवेदन दिले होते.परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समिती द्वारे 18 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केले आहे.त्या अनुषंगाने 18 ऑक्टोंबर रोजी जिल्हाभर पंचायत समिती समोर आंदोलन केले तर आज 2 र्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय समोर आयटक च्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , कॉ.ड्रॉ.महेश कोपुलवार  राज्य कार्यकारणी सदस्य भाकप , कॉ.देवराव चवळे जिल्हा सचिव आयटक, कॉ.अँड जगदीश मेश्राम नगर सेवक आरमोरी, कॉ.संजय वाकडे,बाळकृष्ण दुमाने,अमोल दामले,रजनी गेडाम,कविता दरवाडे,संगीता मेश्राम, माया दिवटे,माया कांबळे,ज्योत्स्ना रामटेके यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंन दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे  आज (18 ऑक्टोंबर)पासून महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन सुरू केले. त्या अनुषंगाने आयटक च्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.


यावेळी विविध प्रमुख व स्थानिक मागण्या करण्यात आल्या.ज्यामधे गट प्रवर्तक कर्मचाऱयांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात  नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.तसेच कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्कर ला किमान वेतन ,दिवाळी भाऊबीज दहा हजार रु.लागू करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून थकीत देण्यात येणारा मासिक हजार रुपये त्वरित देण्यात यावा.आभा कार्ड,गोल्डन ई कार्ड काढण्याची शक्ती करण्यात  येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.


 सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा. शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये यासह विविध मागण्या करण्यात आल्या आणि जोपर्यत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा भरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक उपस्थित होत्या.


PostImage

Rushi Sahare

Oct. 19, 2023

PostImage

Gadchiroli News: सत्ताधाऱ्यांनी आरोग्य व्यवस्था खिळखिळी केली : जयश्री जराते


गडचिरोली : सध्याचे सरकार सामान्य माणसासाठी नव्हे तर अदानी - अंबानीच्या फायद्यासाठी काम करीत असल्याने सरकारने  आरोग्य व्यवस्थेकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा निर्माण होवून आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी केला.

शेकाप तर्फे शिवणी येथे मोफत चष्मे वाटप

तालुक्यातील मौजा - शिवणी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरादरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी,  पुरोगामी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, शेकाप गाव शाखेचे चिटणीस वसंत चौधरी, विनोद गेडाम, उमाजी मुनघाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली ताटपल्लीवार, किशोर गेडाम, कवींद्र देशमुख, विनोद मोहुर्ले, पोलीस पाटील कालिदास राऊत, तमुंस अध्यक्ष निलकंठ पेंदाम, एकनाथ मानकर, सुरेश गेडाम, चंद्रकांत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.

राजकारणाचे व्यावसायिकरण झाल्याने आता गरिबांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्थापित पक्षांना वेळ नाही. मात्र शेतकरी कामगार पक्ष सदैव गरीबांच्या कल्याणासाठी सातत्याने झटत असल्याचेही जयश्रीताई जराते यांनी सांगितले.

यावेळी ८१ रुग्णांना चष्मे व ३१ रुग्णांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. शिवणी गावात मोतीबिंदूचे ४५ रुग्ण आढळून आले. तपासणी सेवावृत्त डॉ.नानाजी मेश्राम यांनी केली. आकाश आत्राम, रेवनाथ मेश्राम, बादल दुधे, वैभव मानकर आणि शेकाप गाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी शिबिराकरीता परिश्रम घेतले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 19, 2023

PostImage

Armori News: वाघाच्या हल्यात महिला मजूर ठार


Armori Ramala News: रामाळा शेतशिवारात धान कापणारी मजुर महीला वाघाच्या हल्यात ठार

धान कापणिच्या कामाला वेग आले असल्याने सर्वत्र धान कापणी अगदिच जोमात सुरु झाली आहे. अशातच आरमोरी वरुन अवघ्याच पाच किमी अंतरावर असलेल्या रामाळा शेतशिवारात धान कापण्याकरिता गेलेल्या मजुर महिलेवर वाघाने अचानक हल्ला करुन ठार केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

                प्राप्त माहितीनुसार ताराबाई एकनाथ धोडरे असे मजुर महिलेचे नाव असुन ती (काळागोटा) आरमोरी येथील रहिवासी असल्याचे समजते. सदर घटनेची माहीती मीडताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मोका चौकशी करून पंचनामा केला असल्याचे समजते.

               सदर महिला रामाळा येथील शेत शिवारात धान कापणीच्या कामाकरता गेली असताना लपुन बसलेल्या वाघाने महीलेवर अचानक बेसावध हल्ला करुन ठार केले ही घटना आज दी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास घडली. 

                   सदर घटनेमुळे परिसरातील जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले असून शेतीचे काम करायची कशी असा प्रश्न शेतकर्‍यांत निर्माण झाला आहे. यावर वनविभागाने जातीने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी सदर वाघास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.