नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
12-11-2023
गडचिरोली, दि. ११ : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल- मे, २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून ऑगस्ट, २०१८ या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा माहिती गडचिरोली जिल्हयातील अहेरी, आरमोरी, भागरागड, चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या दहा तालुक्यातील ४२२ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. सदर यात्रेचे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहे. विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहीतीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद- वैयक्तिक कथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे. विकसित भारत संकल्प ठळक वैशिष्ट्ये- जनजाती गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी या यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे. सुरूवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ११० जिल्ह्यांना आणि नाव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये / मतदारसंघात, आदर्श आचारसंहिता उठल्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली जाईल. विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक आखताना स्थानिक परिस्थिती उदा. हवामान, सण इ. बाबी विचारात घेतल्या जातील. या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये राहणार आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन सोहळा दिनांक १५ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत वैरागड ता. आरमोरी व ग्रामपंचायत पोटेगाव ता. गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमा दरम्यान आरोग्य शिबिर कृषी विषयक सादरीकरण सांस्कृतीक कार्यक्रम व उत्कृष्ट कामगीरी केलेल्या महिला, खेळाडू, विद्यार्थी इत्यांदीचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत शासकीय योजनांची प्रचार प्रसिध्दी करण्याकरीता दहा तालुक्यातील ४२२ ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्दी व्हॅन (वाहने) फिरणार आहेत. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments